दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 26
©®चैत्राली यमगर लिखीत..
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 26
©®चैत्राली यमगर लिखीत..
" पण नाही आशी... नक्कीच काहीतरी सुटतय... " ती दोन घास icecream चे खातच नाही की, तीच मन परत तिला विचार करायला मजबूर करत होते... राग ही आता तिचा icecream मुळे थंडावला जो होता... " icecream च चल ठीक आहे, सोडून दे... पण.. पण त्यांनी असं का केल असेल...?? का मला परत भाजीत मीठ टाकायला लावले असेल..?? आणि सगळे माहीत असून ही त्या आंटी समोर असं का वागले असतील...?? " तिच्या मनात आता अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती..जे रूम मध्ये कोणीच नसल्याने ती थोडे मोठ्याने च बोलत होती...
" सोप्प आहे..." तोच तिला एका मुलीचा आवाज कानावर ऐकू येतो... ती तशी त्या दारात असलेल्या मुलीकडे पाहायला लागते... तिने मिनी स्कर्ट घातला होता... आणि टॉप सुद्धा तिचा क्रॉप होता... तिचे ते तोकडे कपडे पाहून आशी ने लगेच मान वळविली...
" कारण तो तुझा फक्त hate करतो.. " तस तीच मुलगी आता क्रूर हसू चेहऱ्यावर आणत म्हणते, " तिरस्कार... मराठीत... " तीच बोलणे ऐकून, आशी ने फक्त तिच्याकडे गोंधळून पाहिले.. तस त्या मुलीला वाटले हीला इंग्लिश कळाले नसेल म्हणून ती परत मराठीत बोलते...
" hate, तिरस्कार... " पण आशी मात्र वेगळ्याच गोष्टीचा विचार करत होती... " प्रेम कधी होते आमच्यात की त्यांनी माझा तिरस्कार करावा... आणि आम्ही तर आता पहिल्यांदा भेटलो होतो... मग तिरस्कार का...?? " पण ती आता ह्याने अजूनच गोंधळली.. एकतर आधीच हे करार लग्नाचं कोडे सुटत नव्हते. जरी तो तिला म्हणाला असला की त्याच दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तरी ही...तो आपल्या घरच्यांना नक्कीच मनाऊ शकला असता असच तिला आता पर्यंत वाटत होते...
" हॊ तिरस्कार च.. कारण प्रेम तर तो... " ती मुलगी आता तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या प्रश्नांनी, थोडी गोंधळली होती ती सुद्धा पण तरी ही चेहऱ्यावर तस न दाखवता बोलते..
" ओह्ह.. नट्स... " तोच तीच बोलणे मध्येच काटत, आता तिथे अर्णव येत बोलतो..." तू कधी आलीस... " म्हणत तो तिच्या गालावर किस करत हग करतो...त्याला असं इथे पाहून आशी पटकन उठून उभी राहते पण, त्याने तीच असं केलेल वेलकम, का माहीत नाही तिला थोडे ऑकवर्ड करून जाते. तर दुसरीकडे, नताशा ला ही त्याच वागणे अनपेक्षित असल्याने ती ही सरप्राईज झाली होती...
" चल मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे... " तर ह्याला ही आपण काय करतोय हे लक्षात येताच, तो पटकन तिच्या मिठीतून दूर होत बोलतो.. आणि तिचा हात घट्ट पकडतो... " बाय दी वे... नट्स, तुझी आणि हिची ओळख करून देतो... " पण तोच समोर आशीला पाहून आता तो बोलतो..." आशी, ही माझी गर्लफ्रेंड.. तुला म्हटले होते ना, माझी लंडन वाली... " आता तो हसून तिला पुढे बोलतो.. आशी समोर तो आता असं ऍकटिंग करत होता की त्याने तिला पाहीले च नाही.. प्रत्यक्षात तिथे आल्यापासून त्याची नजर फक्त तिच्यावर च येऊन थांबली होती...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा