Login

विवाह एक अनोखे नाते 27

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने हे लग्न केल पण टिकेल का हे लग्न..??
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते  27
©®चैत्राली यमगर लिखीत..


" हेय हॅलो...मी तुझी गर्लफ्रेंड कधीपासून झाले...?? " इकडे तिची ओळख करून देताच, अर्णव मुद्दाम तिला घेऊन आपल्या रूममध्ये गेला... तस नट्स त्याच्या त्या किंग साईझ बेड वर आरामात बसत बोलते..

" काल पासून... " आणि त्याने ही बेफिकीर पणे म्हणत आपल्या साऊंड सिस्टिम ला एक छान, रोमॅंटिक सॉंग लावत म्हटले..


" व्हॉट...?? " पण त्याच असं उत्तर ऐकून ही ताडकन उभी राहिली..." पण तुला तर आशी च आवडते ना..?? "


" हॊ.. अजून ही आवडते... " आता ही तो कूल होऊन बोलत होता आणि नट्स मात्र गोंधळात पडली होती...ह्याला नक्की म्हणायचं तरी काय आहे ह्या अंदाजात...


" चिल.. सांगतो मी तुला सर्व... " तो आता तिला खाली,  बेडवर बस म्हणून खुणावतो... आणि बोलायला लागतो.. दोघे बराच वेळ बोलत असतात..


" ही नट्स... नट्स खरंच त्यांची गर्लफ्रेंड असेल...?? " इकडे मात्र आपल्या रूम मध्ये येऊन, आशी टीव्ही लावून बसली होती..पण मनात मात्र नट्स आणि अर्णव चा विचार करत होती.. उगाच हातातल्या रिमोटवर बटणं दाबत चॅनेल बदकत बसली होती... कान मात्र शेजारच्या रुम कडे लक्ष जास्त होते.. त्यात त्याने लावलेल्या रोमँटिक गाण्याने ती अजून अस्वस्थ होत होती..


" पण मी का अस्वस्थ होत आहे...?? त्यांची गर्लफ्रेंड आहे हे त्यांनी आधीच सांगितलं आहे आपल्याला.. " हा प्रश्न आता तिच्या ही डोक्यात इकडून तिकडे फिरत होता..." चिल आशी... हे लग्न करार लग्न आहे... चिल... " आणि ती स्वत: च्या च मनाला शांत करत होती...जे त्या गाण्यातील lyrics ने ती अजून च अस्वस्थ होत होती... की त्याच नादात ती रूमच्या बाल्कनीत गेली...


" सो प्लीज आय request यू... यातून मला बाहेर पडण्यासाठी मदत कर... " आशीच्या कानावर आवाज आला आणि तिला तिच्या मोहावर कंट्रोल न करता आल्याने हळूच त्याच्या रूमचा दरवाजा तिने पुश केला.. आणि समोरच दृश्य पाहून तिने मोठा आ च केला.. कारण चक्क अर्णव नताशा च्या पाया पडून कसलीतरी विनंती करत होता... काल पर्येंत तिला वाटतं होते की हा फार गर्विष्ठ.. कुणापुढे ही न झुकणारा असा असावा... पण आता त्याला असं पाहून तिला चांगलाच धक्का बसला होता..तिला बाल्कनीत ही दम निघाला नाही म्हणून ती पाणी पिण्यासाठी किचन कडे जातच होती की, तिच्या कानावर आवाज आला..  गाणी ही आता ऐकायला येत नव्हती..


" लोक म्हणतात ते काही खोटे नाही... या प्रेमात लोकांना किती झुकावे लागते... " आणि त्याला असं पाहून, तिच्या मनात त्याच्यासाठी केविलपणे ची भावना निर्माण झाली...


" सॉरी मी ते... " पुढे काय झालं तिला स्वतः लाच कळाले नाही आणि ती डायरेक्ट आता त्याच्या रूम मध्ये शिरत बोलते...


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all