Login

विवाह एक अनोखे नाते

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने लग्न केल पण पुढे काय होईल या नात्याचे
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते  29
©®चैत्राली यमगर लिखीत...

" मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की माझ्यात आणि ह्यांच्यात काहीच रिलेशनशिप नाही.. आणि कधीच नसेल... तुम्ही निर्धास्त राहा..." एव्हडं बोलून ती आल्या पावली निघून ही गेली...हे दोघे मात्र आश्चर्य चकित होऊन तिच्या जाण्याकडे फक्त पाहत होते की, हे सर्व नक्की काय होते..


           तो दिवस तसाच सरला.. दुपारचं जेवण च उशिरा झालं  होते आणि इकडे, रात्री च जेवण जास्त कुणी घरात या घेत नसे त्यामुळे तिला जास्त काही बनवायला कष्ट पडले नाही...आणि नाही आता रात्री शॅली तिला डिवचायला येणार होती... कारण नटस आली असल्याने ही सुद्धा दोन दिवसा साठी घरी गेली होती... तिच्यापुढे आता एकच वादळ होते त्यामुळे नटस... आणि ते आपण आरामात निपटू असं तिला सध्यातरी वाटत होते...


" घरात पूजा वैगेरे नाही करणार का... " पण मनात मात्र एक गोष्ट तिच्या सलत होती... आणि ती म्हणजे लग्नानंतर ची पूजा...   लग्नानंतर जोडपे ही पूजा करतात हे तिला चांगलेच माहीत असल्याने तिने आपले नॉर्मल टोन मध्येच, किचन मध्ये आवरत असलेल्या सोनू बाईला.. आपली कॉफी घेत घेतच विचारते..


" इथे 6 महिन्याच्या करार नात्याला ही पहा लोकं किती अपेक्षा ठेवतात, अर्णव... " तोच मागून तिच्या एका मुलीचा आवाज ऐकू येतो... जे ती आता चांगलाच ओळखते की कोण आहे ते...पण तरी ती फक्त आता तिच्याकडे पाहते...अर्णव आणि नट्स, हातात हात गुंफून उभे असतात...अर्णव ने ब्लॅक शर्ट आणि खाली बर्मुडा घातला होता, चेहऱ्यावर कुटील हास्य होते.. जे तिला चिडवायला काफी होते तर नट्स ने आता वन पीस घातला होता, ब्लॅक कलर चाच पण तो खूप च शॉर्ट होता.. अगदी गुडघ्याच्या ही वर आणि गळा सुद्धा तिचा डीप होता...


" तेवढं तरी कशाला घालायचं होते... " आशी तिचा तो ड्रेस पाहून पुटपुटली आणि तोंड ही वाकडे केले..


" काही बोललीस का...?? " तीच पुटपुटणे दोघांना ऐकायला गेले नव्हते त्यामुळे अर्णव ने तिच्यावर नजर रोखत म्हटले... खरंतर त्याला अंदाज आला होता की साधारण ती काय म्हणाली असेल.. कारण तिची ती भिरभिरती नजर त्याने कॅच केली होती... पण तरी ही त्याने सिरिअस टोन मध्ये विचारले,


" एनिवेज, आम्हाला तू काय बोलली ते ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही.. कारण सध्या आम्हाला आमचा क्वालिटी टाइम स्पेंड करायचं आहे... सो बाय... " त्याने तिला उत्तर ही देऊन नाही दिले आणि लगेच नट्स चा हात घट्ट पकडून तो निघून ही गेला..नट्स ने ही फक्त तिच्याकडे हसून पाहिले..


" काय आहेत ही दोघ... " आता असं म्हणण्याची वेळ आणि अवाक होण्याची वेळ आपल्या आशीवर होती..." जाऊ दे आशी.. तुला कुठे या घरात राहायचं आहे... आणि तस ही आपल्याला एन्जॉय करायला कोण रोखणार आहे तर आपण ही चिल करूयात... " असा विचार करून ती ही मनोमन खुश होऊन लगेच आपल्या रूम मध्ये जाते...


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all