दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 31
©®चैत्राली यमगर लिखीत...
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 31
©®चैत्राली यमगर लिखीत...
" मी ही येणार... " पण ती व्यक्ती आता ठामपणे बोलते... " मला ही जाणून घ्यायचे आहे की... इतका मोठा धोका तिने मला दिला च कसा... " ती व्यक्ती बोलते...
" नाही सुशील... तू नको येऊ प्लीज... " पण आता स्नेहा खूप पोट तिडकीने त्याला बोलत होती... हॊ, ती व्यक्ती सुशिलच होती... त्याला अजून ही विश्वास बसत नव्हता की, आशी... आशी आपल्याला असं काही करेल... अशी आपल्या आयुष्यातून निघून जाईल...आणि त्यामुळेच तो स्नेहा ला भेटायला आला होता...
हे सांगायला की आशी शी बोलून तिच्या मनात नक्की काय चालले आहे ते विचारायला... कारण त्याला ही चांगलेच माहीत होते की स्नेहा ला ती सगळे सांगेल... आणि तसेच घडले होते... नेमका तो तिथे आला असताना आशीचा तिला कॉल आला होता..
" बर जा तू... " तो वर वर म्हणाला पण मनात मात्र त्याने ठाम केल होते की तो ही या दोघींच्या ही नकळत तिथे जाणार म्हणून...स्नेहा ला त्याच ते वर वरच बोलणे आहे असं का कुणास ठाऊक वाटले.. ती जशी आशीला चांगले ओळखत होते तशीच सुशील ला ही... त्यामुळे आता त्याने जरी तिच्या मताला होकार दिला असला तरी तो नक्कीच येईल असं का कुणास ठाऊक वाटतं होते...
" बर मी निघते " म्हणून ती ही मग जास्त काही न बोलता तिथून जाते... कारण जिथे ते दोघे आता भेटले होते, तिठून पब जरी अर्ध्या तासावर असले तरी ट्रॅफिक मुळे तिला तेवढा वेळ लागणारच हे तिला ही चांगले माहीत होते.
" हा बोल आता... " पुढच्या तासाभरात च दोघी, त्या पब मध्ये भेटल्या होत्या... एका कोपऱ्यात बसण्याची व्यवस्था होती जी शांतपणे बिअर लोकं एन्जॉय करू शकतील आणि आरामात गप्पा टप्पा ही... खास त्या मालकाने ही अशी जागा बनवली होती...आणि आता त्या दोघी सॉफ्ट ड्रिंक घेत होत्या पण लगेच स्नेहा ने मेन मुद्द्याला हात घातला...
" तुला काय वाटले स्नेहा... मला काहीच माहीत नसेल... " पण तीच उत्तर देण्यापेक्षा, तिने तिलाच कोडे घातले...
" काय माहीत आहे तुला... " पण तिचा असा पलट प्रश्न ऐकून, का माहीत नाही स्नेहा ला थोडी उगाच भीती वाटली... " तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल... " पण तरी ही मनावर पूर्ण कन्ट्रोल ठेवत आता स्नेहाने तिलाच दर्डावले...
" अहं... " आणि तिचा तो ओव्हर कॉन्फिडन्स आणि ते बोलणे ऐकून आता कुटील हसू आणत, आशी बोलली...
" माझ्या बाबाचा दहावा होता... त्याच दिवशी माझी बेस्ट फ्रेंड आणि माझा पास्ट.. माझा क्स माझ्याबरोबर होते काय...?? माझ दुःख वाटून घ्यायला...?? " तिने आता तुच्छ नजरेने पाहात म्हटले...पण ज्यात वेदना च जास्त होत्या...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा