Login

विवाह एक अनोखे नाते 32

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने लग्न केल पण टिकेल का हा संसार...??
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते  32
©®चैत्राली यमगर लिखीत...

" माझ्या  बाबाचा दहावा होता... त्याच दिवशी माझी बेस्ट फ्रेंड आणि माझा पास्ट.. माझा क्स माझ्याबरोबर होते काय...?? माझ दुःख वाटून घ्यायला...?? " तिने आता तुच्छ नजरेने पाहात म्हटले...पण ज्यात वेदना च जास्त होत्या...

" काही काय बोलते...?? मी तर तुझ्या बरोबर... " ती पुढे बोलणार... तस शांत बसते...


" प्लीज स्नेहा... " पण तिला आता एक हात दाखवत ती आता बोलायला लागते, " तू आणि सुशील.. एकाच रूममध्ये... त्यादिवशी... " ती पुढे बोलायला जाते पण तिला बोलताच येत नव्हते... खूप hurt झालं होते तिला...हे तिच्या डोळ्यावाटे आलेल्या अश्रूमुळे सहज दिसून येत होते...


" तुझा काही तरी गैरसमज... " स्नेहा बोलते..


" गैरसमज...?? " आणि ते ऐकून आता आशी तुच्छतेने हसत बोलते... तिला आज ती बोलूच देणार नव्हती असच आता वाटत होते..." तो जर आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला असेल.. कानाने ऐकले असेल तरी तो गैरसमज असावा..?? " ती पुढे आपले बोलणे कंटिन्यू करणार तोच,


" हेय यू... " तोच तीला एक ओळखीचा आवाज ऐकू आला... म्हणून तिने समोर पाहिले... " तू आमचा पाठलाग करत इथपर्येंत आली ना.... " पण तिने काही बोलण्याआधी च, एक मुलगी पूर्ण नशेत येऊन आता तिच्याशी बोलत होती..नशेत असल्याने तिला साधं उभा ही राहता येत नव्हते...


" नताशा ताई... " आणि ती मुलगी तिच्या अंगावर कोसळणार च की आशी ने तिला सावरण्याचा प्रयन्त केला.. पण तिला एकटीला ते काही जमत नव्हते. हॊ नताशा होती ती मुलगी जी इतक्या नशेत होती...


" तू आता फक्त माझ तोंडच पाहत राहणार आहेस की मदत ही करणार आहेस.. " आणि तिने मग रागातच स्नेहा कडे पाहत म्हटले..


" आम... हॊ... " स्नेहा मात्र गोंधळून गेली होती आधी पण तिने तस म्हणता, ती उठून तिला मदत करते. दोघी मग तिला एका सोफ्यावर बसवतात...


" तू हिच्यापाशी थांब.. मी आलेच... " आशी ला वाटते नट्स इथेच आहे तर इथेच कुठे आजूबाजूला अर्णव ही असेल... त्यामुळे इकडे तिकडे पाहत च ती बोलते...


" पण तू कुठे चालली आहेस... " आणि ती आशी घाईत बोलण्याने आता स्नेहा गांगरून गेली होती... " तू ओळखतेस का हीला... " आणि तोच हीला ती मुलगी हिच्याशी काहीतरी नशेत पण रागात बोलत होती ते आठवले... ज्यामुळे या दोघी एकमेकींना ओळखतात असं तिला वाटून गेले..


" अं.. हॊ.. ती माझ्या नवऱ्याची होणारी बायको आहे... " पण आशी अजून ही अर्णव चा नजरेने च शोध घेत असल्याने पटकन बोलून जाते.. आणि त्याच धुंधीत निघून ही जाते. आपण आता कुणाला काय बोलून गेलो हे सुद्धा तिच्या लक्षात आले नाही....


" काय म्हणाली ही... " ती गेलीच नव्हती की इत्का वेळ तिथेच बसून ऐकत असलेला, सुशील स्नेहा जवळ येत बोलतो...


" सुशील तू...?" आणि त्याला पाहून स्नेहा अजून च घाबरते. तसा तिला अंदाज होताच की येईल म्हणून पण तरी ही कुठंतरी एक मन म्हणत होते की नाही येणार कदाचित...


" हेय सुशी.... तू इथे. " पण सुशील काही बोलणार तोच नट्स त्याच्या गालावरून हात फिरवत बोलते... चेहऱ्यावर आनंद होताच त्याला पाहून जे तिच्या त्या चमकणाऱ्या डोळ्यात दिसत होते...


नट्स आणि सुशील एकमेकांना ओळखतात का.. जाणून घेण्यासाठी वाचत राहा विवाह एक अनोखे नाते.

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all