दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 34
©®चैत्राली यमगर लिखीत...
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 34
©®चैत्राली यमगर लिखीत...
" पण आपण तर तो हीला कस ओळखतो हे विचारलंच नाही... " कॅब मध्ये निम्म्या रस्त्यात आली होती... सुशील पाहून तिथे आपले जुने दिवस आठवत असतानाच आता तिला त्याने तिचे नाव घेतलेले आठवले आणि तो कसा काय ओळखतो याचाच आता ती नट्स चा विचार करत होती...दुसरीकडे नट्स " तू त्याला माझ्या पासून हिरावले..." असं काहीतरी बरगळत होती... जे अस्पष्ट असल्याने तिला नीट ऐकायला ही येत नव्हते...
" ती माझ्या भावाची बायको आहे... " ती सुशील चाच विचार करत होती की तिला सुशिलचा च मेसेज येऊन धडकतो...
" व्हॉट.. " आणि तो मेसेज वाचून ती हैराण होते... " याच्या भावाची बायको... शक्यच नाही... ही तर अर्णवची गर्लफ्रेंड आहे... " तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो...
" तिला सगळे कळाले आहे आपल्याबद्दल... " इकडे, स्नेहा सुशील ला बोलत होती..
" काही प्रॉब्लेम नाही... तिला कस गुंडाळायचं हे मला चांगले माहीत आहे..." पण हा गालात हसत म्हणाला, " तीचं म्हणे हे करार लग्न आहे... सो डोन्ट वरी, ती परत माझ्याकडे चं येईल अशी मी आतापासून चं फिल्डिंग लावून ठेवली आहे... यू नो ना, तीन वर्ष.. तीन वर्षाचा उगाच नाही मला एक्सपेरियन्स... " तो कुचकट हसत म्हणाला...
" हम्म.. आय होप सो.. " त्यावर स्नेहा ही किंचित हसली पण तिला तिच्याकडे परत गेलेलं नव्हते आवडणार... असं तिच्या चेहऱ्या वरून तरी वाटतं होते...
" हम्म.. बस ती बडी हस्ती कोण आहे जी हिच्या प्रेमात पडली आहे... ते कळाले पाहिजे... " त्याने पुढे दात ओठ खात म्हटले...
" यू बीच... " इकडे, आशी ड्राइवर च्या मदतीने नट्स ला हॉल मध्ये तरी सोफ्यावर आणून टाकते.. पण त्यामुळे हीला थोडा होश येतो.. आणि समोर हीला पाहून आता नट्स राग उफाळून आला होता... तिचा हात दाबून आता बोलत होती... " तुला माहीत आहे, अर्णव तुझ्या वर खुप प्रेम करतो... अगदी वेड्यासारखं..." ती नशेत चं बोलत होती पण दात ओठ खाऊनच... आणि ऐकून जाणारी आशी जागीच थबकली.. कारण तिच्यासाठी खूप शॉकिंग होते..
" अगं हॊ.. गेले वर्षभर फक्त तो तुझाच नामजप करत होता... " पण तिला आता असं दचकून आपल्याकडे पाहताना ती फिसकन हसत बोलली..." माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर... पण, पण अर्णव ला कधीच कळाले नाही...माझ प्रेम हिरावून घेतले त्याने... " ती बोलत होती पण नक्की ती कुणाबद्दल बोलत आहे.. हेच तिला कळाले नाही... ती नुसती पाहत होती तिच्याकडे एकटक...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा