Login

विवाह एक अनोखे नाते 41

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने विवाह केला पण टिकेल का हे लग्न...

विवाह एक अनोखे नाते  41
©®चैत्राली यमगर लिखीत...

" सॉरी म्हणजे तीच माझ्यावर प्रेम आहे... माझं तुझ्यावरच आहे... " तो आता परत एकदा सावरासावर करत बोलत होता... पुढे काही बोलणार तोच..


" तुमचं बोलून झालं असेल तर आपण जाऊ शकता... " ती त्याला मध्येच हात दाखवून बोलते.. जे त्याच्यासाठी अपेक्षित होते यावेळी.. त्यामुळे तो काही ही न बोलता मान खळी घालून आला.. खरंतर तो इथे येताना किती आनंदी होऊन आला होता.. आपले पहिले प्रेम अधुरे नाही राहिले हे समजताच त्याच्या मनात मोर थुई थुई नाचला होता..कस ही करून तो आता तिला आपल्या आयुष्यात परत आणू पाहायची स्वप्ने पाहत होता..पण नट्स आपल्यावर प्रेम करते हे सांगून त्याने थोडी मनात जी आशा बागळली होती ती सुद्धा आता काहीच उरली नव्हती...


" हे काय चालले आहे बाबा नक्की माझ्या आयुष्यात... " इकडे ते ऐकून ती ही कोसळळी होती... त्याच आपल्यावर प्रेम आहे हे ऐकून नाही तर आता अजून ही ती सुशील नावाच्या जाळ्यात अडकली होती... " इतके काही करून ही याला अजून मला मिळवायचे आहे... पण का आणि कशासाठी...?? " ती अर्णव एवढे काही बोलून गेला होता, नट्स चं त्याच्यावर प्रेम आहे हे सांगून गेला होता... पण तिची गाडी मात्र अजून ही सुशील नावावर अडकली होती...


         तिला तसही नट्स अर्णव वर प्रेम करते की नाही याच्याशी काय मतलब होता ना...?? कारण अर्णव बाबा बद्दल अजून तिला काहीच फीलिंग्स नव्हत्या आणि स्वतः तिला यात परत पडायचं चं नव्हते.. ज्यात ती आधीच होरपळून गेली होती...


      रात्र दोघांची तशीचं सरली होती... अर्णव ला आता ही काय करेल याची काळजी लागून राहिली होती... तिने एकदा आपल्याला बोलायची संधी द्यावी असच त्याला वाटत होते.. पण ती देईल का आता हा प्रश्न त्याला सतावत होता.. आपण नट्स च्या फीलिंग्स आपल्याबद्दल च्या सांगून खूप मोठी चूक केली असं त्याला इकडे वाटत असताना... ती मात्र तिकडे वेगल्याचे विचारात गुंतली गेली होती...


" हॅलो... " आपल्या नशिबाचा ती विचार करत असतानाच तिला एक अनोळखी नंबर वरून कॉल आला आणि जे समोरची व्यक्ती तिला सांगत होती ते ऐकून खूप आंनद झाला...


" हॊ मी आजच येते.. अगदी तासाभरात " असं सांगून तिने आनंदाने फोन कट केला... आणि पुढच्या चं क्षणी तिने स्वतःच आवरायाला निघून गेली...


" कुणाचा फोन होता तिला...?? आणि ती एवढी का आनंदी होती...?? " तिला सॉरी बोलायला आणि तिला परत एकदा आपली बाजू मांडायला आलेला, अर्णव तिला असं आनंदात पाहून हैराण झाला... " तिच्या क्स तर नाही ना आला... " तो आता आपल्या खोलीत येऊन हे वाक्य बोलला... तिचा तो आनंदी चेहरा त्याला सारखा आठवत होता आणि उगीच त्यामुळे तो डिस्टर्ब होत होता...

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
0

🎭 Series Post

View all