Login

श्रीयुत सौरव जोशी

सौरव जोशीने आता थांबायला हवं का? पण आपण हे ठरवणारे कोण?
काही दिवसांपासून युट्युब क्रियेटर सौरव जोशी बद्दल सोशल मीडियावर अति म्हणजे अति चर्चा सुरू आहे. त्याची बायको दिसते कशी खाते काय बोलते काय किती बारीक किती जाड, त्याला ती शोभते, तिला तो शोभत नाही. बापरे असे दिसत आहे जणू काही प्रत्येक जण आपल्या भाकऱ्या भाजून घेतोय सौरभ जोशीच्या कंटेंट वर.

मान्य आहे त्याने कमी वयात खूप प्रसिद्धी कमावली आहे आणि जितके तुम्ही प्रकाश झोतात जाता तितके तुमचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर येते. पण त्याच्या बायकोवर, व्हिडीओ, फोटो आणि क्लिप्स वर त्याच्या नावाने बोटं मोडत बसल्यापेक्षा, कमेंट व शेअर करण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा तरुण पिढीनेच काय पण जे अजूनही क्या कहेंगे लोग च्या भवऱ्यात फसले आहेत त्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपलं काहीतरी काम सुरु करण्यावर भर द्यायला हवा. आपला वेळ आपले आत्मपरीक्षण करून काय नवीन करता येईल किंवा जुन्याच गोष्टीत काय नाविन्य आणून स्वतःलाही एका उंचीवर नेता येईल ते पाहायला हवे.

अरे निगेटिव्ह कमेंट करण्याआधी त्याचा प्रवास बघा, अभ्यास करा. 2020 मध्ये मी पहिल्यांदा माझ्या मुलाने दाखवलेला त्याचा व्हिडिओ बघितला. मला खूप कमाल वाटली त्याची. अगदी कमी वयात त्याने vloging ची सुरुवात केली. तेव्हाही लोकांनी त्याची खूप गंमत उडवली, शेजारीपाजारी हसले. त्याच्या आईनेही त्याला म्हटले की आपल्यावर लोक हसत आहे. तेव्हा तो एकच बोलला,

"मला पुढे जायचे आहे, दुसरे घर घ्यायचे आहे. मला इथेच थांबायचे नाही. मला खूप प्रगती करायची आहे."

आणि खरंच तो थांबला नाही. ३८ मिलियन सबस्क्राईब असेच नाही मिळाले त्याला. निराशा त्यालाही आली असेल. तेव्हा नक्कीच त्यांनी पास घेतला असेल मात्र आपले रड गाणी लोकांना ऐकवण्यात वेळ वाया घालवला नाही. म्हणूनच तर एखाद्या बॉलिवूड हीरो हीरोइन च्या लग्नापेक्षाही जास्त फुटेज त्याच्या लग्नाला सर्वत्र मिळाला आणि अजूनही मिळतच आहे.

लग्न समारंभाच्या एका क्लिप मध्ये सौरवची बायको अवंतिका डान्स करता करता की चालतांना पडल्याची फुटेज दिसली आहे. बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की त्याने ती फुटेज टाकायला नको होती. मित्र-मैत्रिणींनो एक लक्षात घ्या तेव्हा तिथे बरीच पत्रकार व पापाराजी मंडळी आलीच असेल. अशा त्याने ती फुटेज टाकली नसती तर इतर कोणीतरी नक्कीच टाकली असती. हे त्याच्या बायको अवंतिकालाही चांगले कळत असेल की सौरभच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा एक कंटेंट आहे व त्यावर त्यांना भरपूर पैसा मिळणार आहे म्हणूनच जे काही दाखवणे योग्य आहे ते सर्व तो दाखवतो व आपण पाहतही आहोत. त्याने स्वतःला क्या कहेंगे लोग या भवर्यातून काढून टाकले आहे. आता पाळी आहे आपली स्वतःला या भवऱ्यातून काढायची.

नवीन वर्ष 2026 उंबरठ्यावर आशा आहे तुम्हीही काहीतरी नवीन सुरुवात नक्की करणार स्वतःला एका उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा लावणार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
0