Login

वृद्धाश्रम की आनंदाश्रम ( भाग 2 )

केया काही न बोलता बसून होती. विलासराव नकळत भूतकाळात हरवले. केया सुद्धा त्यात सहज गुंतली...साधीशी नोकरी असणारा विलास वंदना सोबत लग्न करून शहरात आला.तुटपुंज्या पगारात सुद्धा वंदना संसाराचा गाडा छान ओढत होती. सणावाराला गावी जाणं, सगळ्यांशी छान मिळून मिसळून वागणं यामुळे वंदना सगळ्यांची लाडकी होती.काही वर्षात त्यांच्या संसार वेलीवर सुखदा आणि सोहम नावाची गोंडस फुले उमलली आणि संसार परिपूर्ण झाला.मुलं हळूहळू मोठी होऊ लागली तशी वंदना शिवणकाम करून संसाराला हातभार लावू लागली.खूप सुंदर कपडे शिवायची ती त्यामुळे चांगले पैसे घरात येऊ लागले.विलास राव सुद्धा खूप मेहेनत घेऊन चांगली कमाई करू लागले.आपल्या मुलांना काहीही कमी पडू द्यायचं नाही ही दोघांचीही इच्छा होती.सोबतच आपल्या आई वडिलांना सुद्धा त्यांनी कधीच अंतर दिलं नाही.मुलं हुशार होती त्यामुळे त्यांना हव्या त्या ठिकाणी अभ्यास करण्याची संधी मिळत गेली.वृद्धापकाळाने विलासरावांचे आई वडील एहलोकीची यात्रा संपवून निघून गेले.आता फक्त मुलं आणि वंदना हेच त्यांचं आयुष्य बनलं.
वृद्धाश्रमात जाण्याचा बाबांचा निर्णय सोहम आणि केयासाठी खूपच धक्कादायक होता. तसं त्याचं नातं खूप छान होतं.बाकीही काहीच प्रोब्लेम नव्हता.कधी कधी थोडे वाद व्हायचे पण घर आणि तीन पिढ्या एकत्र आल्यावर भांड्याला भांडं हे लागणारच.पण त्यामुळे त्यांच्यात कटूता कधीच आली नव्हती.केयासुद्धा सासऱ्यांना अगदी वडीलांप्रमांणे मानायची आणि त्यांनीही तिला मुलगीच मानलं होतं.मग प्रोब्लेम कुठे होता?
"अरे मुलांनो तुमचा काहीच प्रोब्लेम नाही.फक्त मला एकट्याला करमत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला आहे." विलासराव म्हणाले पण त्यांचं बोलणं पूर होऊ न देताच केया म्हणाली , " अहो बाबा पण हे काय नवीन खुळ काढलात एकदम ? तुम्हाला हवं ते करता येईल की घरीच."
"आणि लोक काय म्हणतील बाबा? आम्हालाच दोष देतील की सगळे.म्हाताऱ्या बापाला वृद्धाश्रमात ठेवलं म्हणून.आणि आम्ही कुठे कमी पडतोय का? इतका मोठा निर्णय कसा काय घेतला तुम्ही? ते काही नाही हा विषय बंद म्हणजे बंद.चला झोपा सगळे." सोहम काहीसा रागावून वरच्या आवाजात बोलला आणि तणतणत आत निघून गेला.
केया काही न बोलता बसून होती. विलासराव नकळत भूतकाळात हरवले. केया सुद्धा त्यात सहज गुंतली...
साधीशी नोकरी असणारा विलास वंदना सोबत लग्न करून शहरात आला.तुटपुंज्या पगारात सुद्धा वंदना संसाराचा गाडा छान ओढत होती. सणावाराला गावी जाणं, सगळ्यांशी छान मिळून मिसळून वागणं यामुळे वंदना सगळ्यांची लाडकी होती.काही वर्षात त्यांच्या संसार वेलीवर सुखदा आणि सोहम नावाची गोंडस फुले उमलली आणि संसार परिपूर्ण झाला.
मुलं हळूहळू मोठी होऊ लागली तशी वंदना शिवणकाम करून संसाराला हातभार लावू लागली.खूप सुंदर कपडे शिवायची ती त्यामुळे चांगले पैसे घरात येऊ लागले.विलास राव सुद्धा खूप मेहेनत घेऊन चांगली कमाई करू लागले.आपल्या मुलांना काहीही कमी पडू द्यायचं नाही ही दोघांचीही इच्छा होती.सोबतच आपल्या आई वडिलांना सुद्धा त्यांनी कधीच अंतर दिलं नाही.मुलं हुशार होती त्यामुळे त्यांना हव्या त्या ठिकाणी अभ्यास करण्याची संधी मिळत गेली.
वृद्धापकाळाने विलासरावांचे आई वडील एहलोकीची यात्रा संपवून निघून गेले.आता फक्त मुलं आणि वंदना हेच त्यांचं आयुष्य बनलं.
सुखदा आर्किटेक्ट झाली आणि दोघानीही तिच्या लग्नाचे मनावर घेतले.नीरज बरोबर लग्न होऊन ती लंडनला गेली.दोघांचा सुखी संसार सुरू झाला.सोहम सुद्धा इंजिनियर होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला. आता दोघांनाही सोहमच्या लग्नाचे वेध लागले.
केया माप ओलांडून घरात आली आणि सईच्या आगमनाने त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण झाले.
विलासराव रिटायर झाले आणि नातीसोबत दोघेही आपला वेळ आनंदात घालवू लागले.केया दोघांनाही आई वडील मानायची आणि ते दोघेही तिला मुलगीच मानायचे.
कधी सुखदा मुलांना घेऊन सुट्टीत यायची आणि कधी हे सगळे तिच्याकडे जायचे.आपली संसारात रमलेली मुले आणि नातवंडे बघून विलासराव आणि वंदनाबाई आनंदाने आपले आयुष्य जगत होते.सिनियर सिटिझन ग्रुप सोबत त्यांची धमाल सुरू असायची.कधी ट्रीप,कधी वृध्दाश्रम भेट,हास्य क्लब आणि रोजच्या सकाळ संध्याकाळच्या गप्पा हा तर ठरलेलाच कार्यक्रम असायचा. सईला सुद्धा ते छान सांभाळायचे.आनंदी आदर्श जगणारे म्हणून सगळे त्यांचं उदाहरण द्यायचे.
सगळं छान सुरू असतानाच अचानक तो काळा दिवस उगवला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं...

असं काय भयंकर घडलं होतं ? जाणून घेऊया पुढील भागात.
0

🎭 Series Post

View all