"मुलांनो उद्या सुट्टी आहे ना तुम्हाला, मग घाई नसेल सकाळची, थोडा वेळ या गच्चीत. मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे.दोघंही हवे आहात मला.तेव्हा फ्रेश व्हा, जेवण करा आणि मग मस्त बसुया आपण."
ऑफिस मधून आल्या आल्या बाबांचं बोलणं ऐकून केया आणि सोहम थबकले.
"हो बाबा.येतो आम्ही थोड्या वेळात.काही काळजीचं नाही ना? तब्येत बरी आहे ना तुमची? नाहीतर बोला आता लगेच." सोहम काळजीच्या स्वरात बोलला.
केयां सुद्धा लगेच तिथे बसली.
"बाबा, जेवण झालं ना तुमचं? गोळी घेतली ना तुम्ही ? परवा जाऊन आलो आपण डॉक्टर कडे सगळ्या टेस्ट झाल्या.तरीही काही वाटत असेल तर लगेच जाऊया आपण."
"अरे इतकं काहीच झालेलं नाहीये. मी जेवण केलं, गोळ्याही घेतल्या आहेत.मी मस्त आहे. फक्त काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मला तुम्हा दोघांशी. जा मस्त फ्रेश व्हा.मी जेवण गरम करतो.नंतर बोलू निवांत."
बाबांचं बोलणं ऐकून दोघांना हायस वाटलं.दोघेही फ्रेश व्हायला रूममध्ये गेले.पण तरीही बाबांना नक्की काय बोलायचं असेल याचा विचार मात्र त्यांच्या मनातून जात नव्हता.
"काय बोलायचं असेल ग बाबांना?ट्रीपला जायचं असेल का? मागच्यावेळी मी नाही म्हणालो आणि घेऊन जाईन म्हणालो पण अजून जमलं नाही.त्याचं वाईट वाटलं असेल का त्यांना?अग पण नुकताच अटॅक येऊन गेलेला त्यांना आणि आपण कोणी सोबत नाही म्हणून नाही म्हणालो ना मी.पण वाईट वाटलं त्यांना हे नक्की.आता जाऊया आपण नक्की लवकरच." सोहम म्हणाला.
"हो रे पण नंतर कधी विषय काढला नाही त्यांनी.मला वाटतं त्यांना आईंची आठवण येत असणार.या वयात एकटं राहणं अवघड असतं अरे.आपण घरी नसतो दिवसभर. मनू पण मोठी झालिये त्यामुळे त्यांना साहजिकच रिकामेपण भासत असेल.बघुया काय म्हणतात ते.चल आवर लवकर." केया म्हणाली आणि दोघेही आवरून जेवायला बसले.दोघांचही आजिबात लक्ष नव्हतं.कसंबसं आवरून दोघेही बाल्कनीत आले.
विलासराव वाटच बघत होते.
"हां बोला बाबा.काय म्हणताय?मोकळेपणाने बोला." सोहम शक्य तितकं वातावरण नॉर्मल ठेवायचं प्रयत्न करत बोलला.
"हो,बोलूच आपण पण मी आधी मस्त कॉफी करतो सगळ्यांसाठी.विषय जरा नाजूक आहे.तेव्हा कॉफी गरजेची आहे." विलासराव कॉफी करायला गेले.
दोघेही पुन्हा विचारत पडले.असं इतकं काय सांगायच असेल बाबांना?
दोघं विचारत हरवले असतानाच विलासराव तीन वाफळते कप घेऊन आले.
"सोहम, केया मी आता जे काही सांगणार आहे ते तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो.मी जो निर्णय घेतला आहे तो आपल्या सगळ्यांसाठी योग्यच असा आहे.तेव्हा तुम्ही तो मान्य करावा.त्यात कोणाची चूक नाही आणि तुमच्यापासून दूर जावे असाही त्यामागे उद्देश नाही..."
"बाबा , पुरे करा ना प्रस्तावना.सांगा काय ते पटकन.आता धीर नाही निघत.आणि हे काय असं बोलता आहात दूर जायचं? कोणता निर्णय घेतला आहे तुम्ही? काही चूक झाली का आमची?" बाबांचं बोलणं पूर्ण होऊ न देताच सोहम काकुळतीने म्हणाला.
"हो हो ऐका! मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आहे..."
बाबांचा निर्णय ऐकून दोघानाही धक्का बसला.सगळं व्यवस्थित असतानाही बाबांनी हा निर्णय का घेतला असेल हे दोघांनाही कळेना.

नक्की काय कारण असेल ? विलासरावांनी अचानक घर सोडून वृद्धाश्रमात जाण्याचं का ठरवलं असेल? जाणून घेऊया पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा