Login

वृध्दाश्रम की आनंदाश्रम ( अंतिम भाग )

" बाबा,तुम्हाला खरंच वाटतंय तर जा तुम्ही.तुमच्या आनंदात आमचा आनंद.पण दर शनिवार रविवार तुम्ही इकडे येणार आणि आम्हाला आणि तुम्हाला वाटेल तेव्हा इकडे यायचं प्रॉमिस करा.आणि तब्येतीची काळजी घ्याल याचही वचन द्या." केयाचे डोळे पाणावले होते." आता तुम्ही ठरवलं आहेच तर मी तयार आहे.तुमच्यासाठी लोकांची पर्वा आम्ही कधीच करणार नाही.पण बाबा आधी एक महिना बघू आपण.मग ठरवू पुढचं..." सोहमच्या डोळ्यातही पाणी होतं.बापलेक एकमेकांना बिलगली आणि विलासरावां नवीन घरात प्रवेश करते झाले.सोहम आणि केया सईबरोबर दुरूनच त्यांना बघत होते.रोज व्हिडिओ कॉल वरून बाबांना आनंदात बघून सगळेच आनंदी होते.घरातील वृद्ध माणसांनी वृद्धाश्रमात राहणे हा कधीकधी खूप चांगला पर्याय असू शकतो.फक्त 'लोक काय म्हणतील ' हे सोडून आपलं मन काय म्हणतं याचा विचार केला तर हे वृध्दाश्रम नक्कीच आनंदाश्रम ठरू शकतील.
रोजच्याप्रमाणे विलासराव आणि वंदनाबाई हास्यक्लबला जायला निघाले आणि अचानक वंदनाबाई धाडकन जमिनीवर कोसळल्या.सोहमने ताबडतोब अँब्युलन्स बोलावली आणि केया धावत खाली राहणाऱ्या डॉक्टर जोशींना घरी घेऊन आली.पण काळाने डाव साधला होता.वंदनाबाईंची प्राणज्योत मावळली होती...
सोहम,केया बाबांकडे बघून आपलं दुःख लपवत होते तर विलासराव मुलांकडे बघून आपण ठीक आहोत असं भासवत होते.दिवस चालले होते काळ सगळ्या दुःखावरच औषध असतो असं म्हणतात त्याप्रमाणे सगळेजण हळूहळू नॉर्मल झाले होते. वंदनाबाईंचं जाणं आता सगळ्यांनी स्वीकारलं होतं.कटू असलं तरीही हे सत्य आता त्यांनी पचवल होतं.
विलासराव थोडे थकत चालले होते.केया ,सोहम त्यांना जपत होते पण त्यांनाही जवाबदारी होती.त्यांना एकट्याला बाहेर जास्त पाठवणे मुलांना सेफ वाटतं नसायचे आणि घरीही एकटे दिवसभर राहिले तरीही त्यांची काळजी वाटायची.सई आता मोठी झाली होती त्यामुळे ती सुद्धा आजोबांची काळजी घ्यायची.
एक दिवस विलासरावांना ' आनंदाश्रम ' बद्दल कळलं. त्यांच्या ग्रुप सोबत ते तिकडे गेले आणि तिथे राहत असलेले त्यांचे समवयस्क लोक बघून त्यांना खूप छान वाटलं.तिथे सगळ्या छान सोयी होत्या.मुख्य म्हणजे सगळेजण आपल्या जीवनातली संध्याकाळ खूप छान जगत होतं.
घरी मुलांनाही त्यांची काळजी वाटण्याची गरज नव्हती आणि इथे वेळ कसा घालवायचा हा ही प्रश्न पडणार नव्हता.
पण मुलांना हे पटवून देण्यात विलासराव असमर्थ होते.
त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली.त्यांचा वाढदिवस 'आनंदाश्रमात ' साजरा करायचा म्हणून ते केया, सोहम आणि सईला घेऊन तिकडे गेले.
तिथलं वातावरण खूप छान होतं.सुंदर बाग फुललेली होती.सकाळची वेळ असल्यामुळे योगा आणि नंतर हास्य क्लब मध्ये सगळेजण खळखळून हसले.नंतर सगळ्यांनी मस्त सात्विक नाश्त्याचा आस्वाद घेतला.सगळे एकमेकांशी गप्पा गोष्टी करत मजेत बागडत होते.
सगळ्यांना तिथे खूप छान वाटलं.कुठलीही मरगळ,तणाव याचा लवलेश नव्हता.
परत आल्यावर विलासरावांनी परत एकदा विषय काढला.
" पोरांनो,तुम्ही खूप चांगले आहात.माझ्यासाठी खूप करता पण खरंच माझं एकट्याच मन लागत नाही.तुम्हालाही माझी काळजी वाटते.त्यामुळे हा पर्याय खरंच योग्य आहे.तुम्ही तिथलं वातावरण,सोयी सगळं प्रत्यक्ष बघितलं ना?तुम्हालाही ते आवडलं ना?मग आता मला तिकडे जाऊ द्या. लोकांना काय वाटेल ?ते काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला मी आनंदात राहावं वाटतं की नाही? मग इतकं करा माझ्यासाठी.अरे तो वृध्दाश्रम नाही तर खरंच आनंदाश्रम आहे."
विलासराव तिथे आनंदात राहतील याची दोघांनाही खात्री पटली होती.
" बाबा,तुम्हाला खरंच वाटतंय तर जा तुम्ही.तुमच्या आनंदात आमचा आनंद.पण दर शनिवार रविवार तुम्ही इकडे येणार आणि आम्हाला आणि तुम्हाला वाटेल तेव्हा इकडे यायचं प्रॉमिस करा.आणि तब्येतीची काळजी घ्याल याचही वचन द्या." केयाचे डोळे पाणावले होते.
" आता तुम्ही ठरवलं आहेच तर मी तयार आहे.तुमच्यासाठी लोकांची पर्वा आम्ही कधीच करणार नाही.पण बाबा आधी एक महिना बघू आपण.मग ठरवू पुढचं..." सोहमच्या डोळ्यातही पाणी होतं.बापलेक एकमेकांना बिलगली आणि विलासरावां नवीन घरात प्रवेश करते झाले.
सोहम आणि केया सईबरोबर दुरूनच त्यांना बघत होते.रोज व्हिडिओ कॉल वरून बाबांना आनंदात बघून सगळेच आनंदी होते.

घरातील वृद्ध माणसांनी वृद्धाश्रमात राहणे हा कधीकधी खूप चांगला पर्याय असू शकतो.फक्त 'लोक काय म्हणतील ' हे सोडून आपलं मन काय म्हणतं याचा विचार केला तर हे वृध्दाश्रम नक्कीच आनंदाश्रम ठरू शकतील.
एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या कथेतून केलेला आहे .यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.