Login

व्यभिचाराची किंमत ४

लोभ आणि व्याभिचारातून झालेला खून
भाग ४ 


मनीषा आणि दिनेशच्या नात्याची मर्यादा आता वाढली होती. त्यांच्या प्रेमात आता निखिल हा अडथळा बनला होता. रोजची भांडणे, आणि निखिलचा वाढता राग यामुळे मनीषा मानसिकरित्या थकली होती.

एक दिवस मनीषा थेट म्हणाली, 

"आपण असे किती दिवस लपूनछपून भेटणार, दिनेश? निखिल काही वेगळा निर्णय घेणार नाही… आता आपणच काहीतरी ठरवायला हवे."

दिनेश गप्प होता, पण त्याच्या डोक्याने काहीतरी वेगळा विचार करायचा प्रयत्न सुरु केला होता.

त्याने त्या रात्री त्याच्या भावाला संदीपला फोन लावला. संदीप आधी गुन्हेगारी गटांशी संलग्न होता.

"दादा, एक काम आहे… पण फार गडबड नको. आपले विश्वासू लोक हवेत."

"बोल... कोणाला त्रास द्यायचा आहे का?" संदीपने थेट विचारले.

"त्याचे नाव निखिल शेख आहे, तसा पाहायला गेले, तर तो एकदम साधा गृहस्थ आहे… फक्त माझ्या आणि मनीषाच्या आयुष्यातला तो एक मोठा अडथळा ठरत आहे."

संदीप थोडा थांबला. "तुला खात्री आहे का? कारण ही वाट एकदा धरली की मग मागे फिरता येणार नाही."

"होय, हे नाते  संपवले की मगच आम्हाला आमचे नाते जगासमोर आणता येईल, त्यासाठी त्याला सद्गती मिळालीच पाहिजे," दिनेश ठामपणे म्हणाला.

संदीपने पुढच्या दिवशी दिनेशची ओळख सचिन, राज्या आणि मुक्ता या तिघांशी करून दिली. हे तिघे पेशाने सुपारी किलर होते.

एका बंद गोडाउनमध्ये ते एकत्र भेटले.

संदीप: "हा सचिन प्लॅनर आहे. हा राज्या , एकदा टार्गेट हातात आले की त्याला संपवल्याशिवाय राहत नाही, आणि ही मुक्ता कोणाचेही लक्ष एका मिनिटात विचलित करू शकते."

दिनेश: "काम नीट झाले पाहिजे… कुठेही माझे नाव यायला नको, आणि हे घ्या..." 
त्याने त्याच्या गळ्यातील चैन, घड्याळ आणि काही रोख पैसे दिले.

"हे सगळे घ्या… सुमारे चाळीस हजाराचे आहे, बाकीचे  काम झाल्यावर देईन."

सचिनने सावधपणे चैन हातात घेत विचारले

"कधी आणि कुठे?"

दिनेश: "तो दर मंगळवारी रात्री सातला ऑफिसमधून एकटाच घरी परततो. स्टेशन रोडवर आल्यावर पुलाचा एक भाग असा आहे, तिथे नेहमी अंधार असतो, ती वेळ तुम्हाला साधायची आहे."

राज्या: "काम होईल, पण लक्षात ठेव, पुढचे पैसे मिळाले नाहीत तर एका खुनाची शिक्षा फाशी आणि दोन खुनाची शिक्षा देखील फाशीच असते, त्यामुळे तू देखील सांभाळून रहा."

मुक्ता: (हसत) "आणि पोलिसांशी संबंध लागला, तर आमची नावे घ्यायची नाहीत!"

दिनेश: (थोडा थरथरत) "ठीक आहे... पण सगळे शांतपणे व्हायला हवे, या कानाची त्या कानाला बातमी नाही गेली पाहिजे."

गोडाउनच्या बाहेर येताना दिनेशच्या मनात काही क्षण अपराधाची जाणीव झाली. पण मनीषाचा चेहरा आठवून त्याने ती भावना झटकली. मनीषाला नेहमीच्या जागेवर भेटून तो म्हणाला,

"लवकरच आपले आयुष्य नव्याने सुरू होणार आहे... फार लवकर."

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®
0

🎭 Series Post

View all