अखेर तो दिवस उजाडला . किती दिवस राणी या सगळ्याची तयारी करत होती. शब्दांची जुळवाजुळव करून किती वाक्य तिने पाठ केली होती, आरशासमोर जवळजवळ १०० वेळा रंगीत तालीम झाली होती . तरीही मनात एक हुरहूर आणि भीती तिला स्वस्थ बसू देत नव्हते. एक मन तिला थांबवत होते आणि दुसरे मन राजेश च्या हो साठी आतुरले होते.
राजेश मात्र अजूनही लाल गुलाब हातात घेऊन तसाच उभा होता, राणीकडे एकटक बघत. आता राणी ला राग आला. “अरे काही बोलणार आहेस की नुसताच उभारणार आहेस? जा इथून आणि जिच्यासाठी गुलाब आणला आहेस तिला दे जा ना , मला कशाला दाखवत आहेस? ” राजेश आता अजून जास्त तिच्या चेहऱ्याकडे बघु लागला आणि हळूच बोलला ,” तुझ्याचसाठी आणला आहे गुलाब, मला तू खूप आवडतेस राणी!!” हाय रे देवा आता चकित व्हायची वेळ राणीची होती. याला मी आवडते मग इतके दिवस हा शांत का होता ? “ मला तू कॉलेज च्या फर्स्ट डे पासूनच आवडतेस, जेव्हा तुला प्रथमदर्शनी पहिले तेव्हा खरच वाटले कि तू फक्त माझ्यासाठी कॉलेज मध्ये आली आहेस. फक्त माझ्यासाठी तुला देवाने बनवले आहे. पांढरा सलवार आणि त्यावर तुझी छोटीशी लाल टिकली या सगळ्यांनी मला पुरता घायाळ केले. तुला बगण्याचा मोह आवरनेच मला खूप कठीण होत होते . त्याच क्षणी मी ठरवले हीच असेल माझी राणी, माझ्या आयुष्याची राणी आणि योगायोगाने नंतर तुझं नाव राणी असल्याचं कळलं. खूप प्रयत्न केला तुला बोलायचं पण भीती वाटायची. त्या दिवशी लायब्ररी मध्ये तू दिसली आणि मनात आले आज नाही बोललो तर कधीच नाही बोलू शकणार. हळू हळू कळले की तुला पण मी तेवढेच आवडतो . मग आज सकाळी च मंदिरात जाऊन बोललो , आज राणी जर मला हो बोलली तर तिला घेऊनच तुझ्या कडे येईन संध्याकाळी. बोल येशील माझ्याबरोबर देवळात? होशील फक्त माझी राणी?”
राणी ला आता फक्त घेरी यायचे बाकी होती. तोंडातून शब्दच फुटत नव्हते . मनात असंख्य भावना आल्या होत्या पण तोंडातून फक्त राजेश एवढेच बाहेर पडले आणि दुसऱ्या क्षणी राणी, राजेश च्या मिठीत होती.
त्यांनतर राणी आणि राजेश कधीच वेगळे दिसले नाही. कॉलेज, लायब्ररी, सहल सगळीकडे एकत्र. नेहमी एक दुसऱ्याच्या बरोबर . पुढचे ४ वर्षे एकमेकांच्या सानिध्यात कशी पाखरासारखे उडून गेले ते दोघांना हि कळले नाही. राणी फक्त राजेशचीच आणि राजेश फक्त राणीचा या वचनामध्ये दोघेही आपसूकच बांधले गेले होते. या ४ वर्षात तिने समीर दादाला राजेश बद्दल सगळे सांगितले होते आणि समीर सुद्धा राजेश च्या स्वभावामुळे त्या दोघांसाठी खुश होता. राजेश ला नोकरी लागलाच समीर अप्पाना त्या दोघांबद्दल सांगणार होता.
काही दिवसातच राणी ला जवळच्याच एक कंपनी मधून नोकरी लागल्याचे कळले तेंव्हा तिनेच पुढे होऊन
तिच्या सरांना शिफारशी करून राजेश ला हि त्याच ऑफिस मध्ये लावले.
राजेश हुशार होता लवकरच त्याने सरांची मर्जी मिळवली आणि बढती घेत घेत मॅनेजर झाला. पण राणी मात्र जेमतेम आहे त्याच हुद्दयावर राहिली पण म्हणून त्या दोघांचे प्रेम काही केल्या कमी झाले नव्हते . ऑफिस मध्ये काही कळायला नको म्हणून दोघेही खबरदारी घेत. प्राजु राणी बरोबर ऑफिस मध्ये लागलेली , राणी च्याच वयाची त्यामुळे काहीच दिवसात दोघींची घट्ट मैत्री झाली आणि राणी ने राजेश बद्दल तिला सांगितले.
पण देवाला काहीतरी वेगळेच हवे होते. जेमतेम वर्षभरातच राणी चा भाऊ समीर एका अपघातात मरण पावला आणि राणीच्या घराची हालत पोरक्या झालेल्या मुलासारखी झाली. समीर च्या जाण्याने आईने मोठा धक्का घेतला होता. ती दिवस रात्र फक्त छताला बघत बसे, ना बोले , ना चालणे . काही दिवसात ती अंथरुणात खिळली. अप्पा पण पाहिल्यासारखे बोलत नव्हते घरी. जणू भाऊ जात जात घरची सगळी आनंद पण घेऊन गेला होता आपल्याबरोबर. जवळचे सगळे नातेवाईक गेले आणि आता घरात फक्त राणी, आई आणि अप्पा राहिले . तिघेही जण आपले दुःख वाटू शकत नव्हते. याकाळात राजेश राणी चा खूप मोठा आधार बनला. तो तिच्या मागे भक्कम सावली सारखा उभा राहिला, पण हा आधार ती तिच्या आई वडिलांना देऊ शकत नव्हती आणि त्यामुळेच ते दोघे त्या दुःखाच्या वावटळ मध्ये वाहत जात होते. राणी नी सकाळी लवकर उठून अप्पांचा , तिचा डबा बनवावे , आईला अंघोळ घालून साडी नेसवून मग तिला भरावावे या सगळ्या गोष्टी आपसूकच ती करू लागली. अप्पाना बोलकं करायचे प्रयत्न करे, आईशी तासनतास बोले पण सगळे व्यर्थ. कधीतरी ते दोघे यातून बाहेर पडतील अश्या एका आशेवर ती जगत होती.
इकडे राजेश ला सुद्धा आता ऑफिस ला लागून २ वर्ष होत अली होत आणि तो आता चांगल्या हुद्द्यावर होता. त्याच्या घरचे त्याला रोज नवनवीन स्थळ दाखवत होते पण राजेश मात्र राणी चा होता. राजेश च्या आई चे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. त्यामुळे त्याच्या आजीने च त्याचा सांभाळ केला होता. बाबा कडक शिस्तीचे होते. त्यांच्या शब्दाबाहेर जाणे राजेश साठी शक्य नव्हते पण तरीही राणी साठी तो काहीही करायला तयार होता,म्हणून त्याने ठरवले होते की घर सोडावे लागले तरी चालेल पण राणी फक्त आणि फक्त माझीच असेल. राजेश ला राणीच्या घरची सर्व हालत माहिती होती आणि अशा अवस्थेत राणी ला तो गडबड करू शकत नव्हता,पण बाबाना आता कसे थांबवावे या विचारात तो होता. इकडे राणी ची हालत खूपच बेकार होती , या सगळ्यामध्ये लग्नच विचारच ती करू शकत नव्हती . एवढ्या वर्षात राजेश तिचा आत्मा बनला होता , एकवेळ राणी आपला विचार करणार नाही पण राजेश तिच्या विचारातून कधीच हलणार नाही अशी गत .
या सगळ्यात भरीस भर म्हणून राजेश च्या वडिलांनी राजेश ला दुपारी फोन करून बोलावून घेतले. राजेश ला वाटले असेल काहीतरी काम पण वडिल त्याला चक्क एका स्थळाकडे घेऊन गेले आणि जवळ जवळ साखरपुड्याची तारीख च नक्की करून आले.
राजेश आता पुरता अडकला होता , राणी बद्दल तो आताच सांगू शकत नव्हता आणि लग्न पुढे ढकलावे तर असे काहीच कारण नव्हते . या सगळ्या मध्ये तो पुरता अडकला होता . काही दिवसांचा कालावधी मिळाला तर हे सर्व प्रश्न सुटतील असे त्याला वाटले .
तेवढ्यातच त्याचा मेलबॉक्स वाजला . तो मेल बेंगलोर मध्ये असणाऱ्या सुरेश सरांचा होता. कामानिमित्त सुरेश सर आणि राजेश यांचे वरचेवर बोले होई आणि त्यांची पण राजेश वर खूप मर्जी होती . मेल मध्ये त्यांनी बेंगलोर मधल्या कामाबद्दल काळजी लिहिली होती आणि असच चालत राहिले तर बेंगलोरऑफिस बंद करावे लागेल अशी इशारा वजा सूचना हि दिली होती. . एव्हाना मेल सगळ्या वरिष्ठ लोकांना भेटला होता .
“आता या सगळ्यावर उपाय एकच!!” असे म्हणत राजेश ने टाळी वाजवली. हळूच केबिन बाहेर येऊन त्याने राणी ला बोलावले
“राणी मॅडम माझी जुनी अकाउंट्स ची फाईल सापडत नाहीये , तुम्ही प्लीज मला स्टोर रूम मधून तेवढी आणून द्या.” राणीला कळले कि काहीतरी आणीबाणी आहे आणि राजेश ला आताच बोलायचं आहे.ती चटकन उठली आणि स्टोर मधून जुजबी फाईल घेऊन राजेश च्या केबिन मध्ये गेली. दरवाजा लागला असल्याची खात्री होताच राजेश झटकन उठला आणि राणीला खुर्ची वर बसवले .तो म्हणाला “ राणी तुला माहितीये काल मला दुपारी घरी बोलवलं होत?”
“ हो तुझ्यावडीलांचं काहीतरी काम ” तिला अर्धवट तोडत राजेश बोलला,” काम नव्हता मला फसवून मुलगी दाखवायला घेऊन गेले ते आणि मला न विचारताच साखरपुडा पण ठरवलं. त्या लोकांसमोर मला काहीच बोलता नाही ग आलं राणी.” इतके बोलून राजेश राणीसमोर गुडघ्यावर बसला आणि तिच्या मांडीत डोकं ठेवून रडू लागला. राणी सुद्धा हतबल झाली . “ पण नाही हा साखरपुडा होणार नाही तू फक्त माझी राणी आहेस आणि मी फक्त तुझा आहे . मी एक योजना आखलीये आणि त्यासाठीच मी तुला इथेबोलावलं आहे.
काय असेल राजेश ची योजना?? काय त्याचे लग्न होऊ शकेल राणी शी?? यासाठी पुढे नक्की वाचा...
सलोनी पठाण
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा