" कसली योजना?” राणीने घाबरत विचारले. “ आताच मला बेंगलोर मधून सुरेश सरांचा मेल आलेला आहे तिथल्या ऑफिस च्या कामाबद्दल आणि त्यांना तेथे आता कामाचा दर्जा सुधारायचा आहे. तुला तर माहितीच आहे कि माझी आणि त्यांची नेहमीच बोलणं होत असत . तर मी या संधी चा फायदा घेणार आहे आणि स्वतःच बेंगलोर ला जायचं ठरवलं आहे!” “बेंगलोर ला? पण मग मी इथे कस काय ? आणि तुझे बाबा ? ” "मी बाबाना सांगेन कि माझं महत्वाचे काम आहे ,जाणं गरजेचं आहे . साखरपुडा पुढे आपोआपच पुढे ढकलला जाईल आणि आपल्या ला वेळ मिळेल. तोपर्यंत तू तुझ्या कुटुंबाला सगळं सांगा आणि त्यांना मनव. एकदा तुझे घरचे तयार झाले कि मी डायरेक्ट इथे येईन आणि दुसऱ्याच दिवशी आपण दोघे लग्नाच्या बेडीत असू. कशी वाटली माझी योजना?” “ अरे पण असं कस होईल ? तू एकटा तिथे कस राहणार आणि मी कशी राहणार ? मला हे नाही पटत आहे. तू नको जाऊ. आपण आजच तुझ्या बाबांशी बोलू,त्यांना सगळे सांगून टाकु .” “ राणी, तुला माहित नाहीये बाबा कसे आहेत! बाबाना आता जर सांगितले तर ते उलट मला काहीही ब्लॅकमेल करून हा साखरपुडा करायला भाग पाडतील . ते तुझ्याविषयी ऐकून तर नाहीच घेणार उलट नंतर मला तुला भेटणे हि अवघड होईल. तू नको घाबरू , पूर्ण आयुष्य एकत्र घालवायचं असेल तर काही दिवस दुरावा घ्यावाच लागेल. आणि तुला मी काही महिने दिलेच आहेत. तू तुझ्या बाबांना सांग त्यांना तयार कर कि मी लगेच इथे हजर.मी इथे राहिलो तर माझे बाबा आज ना उद्या दुसऱ्या कोणत्या तरी मुलीशी मला लग्न करायला लावतील त्यापेक्षा या योजनेने तुला पण हवा तेवढा वेळ मिळेल आणि मीपण निवांत राहू शकतो ” राणी काही केल्या ऐकत नव्हती तिला अनामिक भीती वाटत होती. अप्पा शी बोलणं आणि त्यांना राजी करणे आता महत्वाचे होतेत पण आईकडे बघुन तिला अपराधी वाटे. आपल्या आईच्या या अवस्थेत आपण संसार थाटण्याची गोष्ट करणे हा विचार तिच्या मनाला हजार यातना देई. पण राजेश कडे पहिले कि वाटे , हा किती समजूतदार आहे या, आपल्यावर एवढा जीव लावतो त्याला असं कास थांबवून चालेल.या सगळ्या घालमेल मध्ये राणी पुरती अडकली होती म्हणूनच राजेश तिला हवा तेवढा वेळ देत होता.
काही दिवसात राजेश ने सर्व वरिष्ठ वर्गाची खात्री पटवली कि तो बेंगलोर ला गेला तर नक्कीच सुधारणा होऊ शकते आणि २च दिवसात तो निघून हि गेला. जाताना ची रात्र जेंव्हा तो राणीला भेटला. दोघे कधीच एवढे दिवस दुर राहिले नव्हते. दोघांसाठीही हि वेळ खूप त्रासदायक होती. राजेश ने राणी ला घट्ट मिठीत घेतले. जसे कि त्याला पण राणीपासून दूर जायचे नव्हते. दोघांचा नाईलाज होता. तिचा हात आपल्या हातात घेऊन तो तिला फक्त एवढेच बोलला” राणी तू फक्त माझी आहेस आणि माझीच आहेस” तो जेंव्हा जेंव्हा असे म्हणे तेंव्हा नेहमीच राणी च्या हृदयात असंख्य फुले उमलत तिला आपण कुणासाठी तरी इतके खास आहोत हे ऐकून खूप आनंद होते. आपल्यावर हक़क़ गाजवणारा आपला नवरा हीच ओळख त्याने राजेश ची आपल्या मनाला करून दिली होती. या ओळखीनेच ती हे काही महिने काढणार होती.
पुढच्या महिन्यात प्राजु च लग्न होत त्यामुळे राणी सुद्धा आता जोमाने कामाला लागली होती. लग्नाच्या निमित्ताने प्राजु आणि ती दिवस दिवस भर खरेदी साठी जात . त्यानंतर राणी त्यांच्या घरी सुद्धा मदतीला जात होती. प्राजूच्या आईने तर राणी साठी छान पैठणी घेतली होती लग्नात घालण्यासाठी.
लग्नाच्या दिवशी सावळ्या रंगाच्या राणीवर मोरपंखी पैठणी अगदी खुलून दिसत होती. सर्वजण राणीलाच पाहत होते. राणी मात्र आतून खूप उदास होती . राजेश तिला पाहू शकत नव्हता. खूप सारे फोटो काढल्यानंतर आता राणी जाम कंटाळली होती. राजेश आता काय करत असेल या विचारातच तिचा समोरच्या व्यक्तीला धक्का लागला. “माफ करा हा .” “ अरे राणी तू ? ओळखली का मला ? मी सुंदर!!!” राणी थोडा वेळ गोंधळली . नंतर तिला आठवले हा तर आपला शाळेतला बालमित्र सुंदर. हा इथे कसा काय? “ “अरे आता तर ओळख लागली कि नाही?” “अरे हो हो ओळखला ना तू इथे कसा काय?” “ अरे ज्याचं लग्न आहे तो माझा खास मित्र पण तू इथे कसा काय?” “जिचं लग्न आहे ती माझी खास मैत्रीण.” झालं आता तिला बोलायला मस्त मित्र मिळाला होता, गप्पा रंगल्या कोण मित्र कुठे आहे कोणती मुलगी आता काय करते या सगळ्यांच्या बद्दल बोलल्यावर दोघांनी हि एकमेकांचा निरोप घेतला. खूप दिवसानंतर राणी आज इतका वेळ बोलली होती, खूप मोकळं वाटल होत तिला. काही काळ का होईना ती राजेश बद्दल विसरली.
प्राजु गेल्यानंतर मात्र राणी आता अप्पांची राजेश बद्दल बोलण्याचा प्रयत्न करू लागली. आता २ महिने झाले होते आणि तिकडे गेल्यापासून अगदी मोजके वेळा ते दोघे बोलले होते.राजेश तिथे गेल्यापासून कामाचा खूप बोझा त्यावर पडला होता, त्यातून हि तो राणी शी बोलायचं प्रयत्न करे , पण ऑफिस मध्ये कुणाला काही माहित नसल्याने त्यांना जास्त वेळ बोलता येत नसे. राणी कडे मोबाईल नव्हता आणि राजेश तिला ऑफिस मध्ये कॉल करत असे तेंव्हा आजूबाजूला सर्वजण असत,त्यामुळे इच्छा असूनही राणीला मनातले काही त्याला सांगता येत नसे. दोन्ही जीव एकमेकांसाठी तळमळत होते . दोघांना ही एकमेकांच्या आवाजावरून हे समजत होते .
राणीला आता हा दुरावा सहन होत नव्हता आणि तिने ठरवले कि आता वेळ घालवून नाही चालणार,लवकरच काहीतरी केलं पाहिजे. त्या रात्री जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे अप्पा अंगणात बसले होते. काही वेळाने राणी सुद्धा त्यांच्या बाजूला जाऊन बसली तसे अप्पा दचकले. त्यांना अपेक्षा नव्हती कि राणी यावेळी बाहेर येईल. “बेटा अजून झोपली नाहीस, उद्या ऑफिस नाही का? ” आप्पा काळजीने बोलले . “ नाही अप्पा आज झोप येत नाहीये म्हणून मग बाहेर आले थोडा वेळ” राणी बोलली पण राणीची अस्वस्था अप्पांच्या नजरेतून सुटली नाही. “तुला काहीतरी खात आहे राणी, काही तरी आहे का जे तुला खाताय ?” राणी गोंधळली पूर्ण तयारी करूनही तोंडातून शब्द फुटेना तेंव्हा मग अप्पाच बोलले
“मला कळतंय बेटा, तुला तुझ्या आईची चिंता आहे . पण तु नको घाबरु , मी कालच माझ्या एका मित्राच्या ओळखीच्या डॉक्टर कडे तुझ्या आईची सगळी रिपोर्ट पाठवली आहे. खुप चांगला डॉक्टर आहे तो ,मला खात्री आहे कि लवकरच तुझी आई , पहिल्यासारखी होईल. तू काळजी नको करू.” “ अप्पा आई तर होईल पण तुम्ही? मला तुमची सुद्धा तेवढीच काळजी आहे. दिवसेंदिवस तुम्ही अजून शांत होत आहेत, पाहिल्यासारखे बोलणे वागणे तुम्ही सोडून दिले. दादा गेला तसे तुम्ही दोघे सुद्धा माझ्यापासून दूर होत आहात . आधी मी माझ्या दादाला गमावला आणि नंतर तुम्ही दोघे माझ्या जवळ असूनही नाहीत. मला खूप गरज आहे हो बाबा तुम्हा दोघांची! खूप एकटी पडत चालले मी या सगळ्यात!! ” म्हणत राणी ने आपला चेहरा दोन्ही हातानी झाकला आणि रडू लागली.अप्पाना हे ऐकून धक्का बसला. या सगळ्या मध्ये त्यांनी कधी राणीचा विचारच केला नव्हता. राणी ची अवस्था पाहून त्यांना हि गहिवरून आले . आपला आलेला आवंढा गिळून ते बोलले , “मला माफ कर पोरी . आम्ही दोघी आमच्या दुःखात इतके बुडालो कि तुझा विचारच नाही केला . तुझा भाऊ,आमची पहिली संतान, खूप प्रेमाने वाढवले आम्ही त्याला . खूप लाड केले. त्याने सुद्धा आम्हाला भरभरून दिले. आम्ही केलेल्या संस्काराला तो पोरगा जागला . आमच्या शब्दाबाहेर नाही गेला कधीच. असा पुत्र गमावणे म्हणजे शरीरातून कुणीतरी आपला हृद्य जबरदस्ती हिसकावून घेऊन जाण्यासारखे . आमच्या दुःखास पारावार उरला नाही. आम्ही दोघे हि कोलमडलो . खरंतर आम्ही हे सहन नाही करू शकलो, कि समीर गेला. परिस्थिती चा स्विकार करू शकलो नाही आणि त्यामुळेच या सर्व दुःखाच्या समुद्रात आम्ही वाहवत गेलो. कळत नकळत तुझ्याकडे दुर्लक्ष केले. मनातल्या मनात समीर च्या जाण्याचे दोषी स्वतःला मानताना आम्ही दोघेही यामध्ये तुला पूर्णपणे विसरून गेलो. आम्हीच त्या दिवशी समीर ला बाहेर पाठवले, तो नाही म्हणत असतानाही जबरदस्ती त्याला मित्रांबरोबर पाठवले आणि हे सर्व होऊन बसले. पोटाचा पोर असं गमावणं खूप वाईट आणि त्याहून वाईट ते सत्य स्वीकारणं पोरी. तुझ्या बापाला ते जमाल नाही आणि मग तुझ्या आईला पण तेच दुःख अनावर झालं. पण आज तू मला जाणीव करून दिली कि जो गेला त्यामुळे जे आहे त्याकडेच आम्ही दोघे दुर्लक्ष करत होतो . आम्ही विसरलो कि तुलापण आमची तितकीच गरज आहे जितकी आम्हाला समीर ची होती. देवाने एक संतान हिरावली म्हणून आम्ही आमच्या दुसऱ्या संतान च्या जबाबदाऱ्या विसरलो.हे चूक आहे. राणी, तू आज माझे डोळे उघडलेस बघ.तू लहान पण आज किती मोठा धडा शिकवलंस ग पोरी.” म्हणत अप्पानी मला जवळ घेतले आणि तेही रडू लागले.
समीर गेल्यानंतर आज पहिल्यांदाच राणी आणि अप्पा एकत्र रडले , एकमेकांचं दुःख वाटून घेतले आणि क्षणातच ते दुःख कमी झाल्याची त्यांना प्रचिती आली. “ आता मी यातून बाहेर पडेन . जी चूक मी केली ती तुझ्या आईला पण नाही करू देणार , तिला लवकरच या सगळ्यातून मी बाहेर कडेन पोरी. विश्वास ठेव.”
जे बोलायचे होते त्याहीपेक्षा कितीतरी महत्वाचे बोलणे आज झाले होते. आज राणीने यशस्वीपणे या सर्वातून अप्पाना बाहेर काढले होते. दुःखाचे ढग आता हळूहळू का होईना राणीच्या आयुष्यातून किनार करत होते.
कुठेतरी आता सर्व काही लवकरच ठीक होईल हि आशा मनात घेऊनच राणी झोपायला गेली होती.
काय होईल पुढे जाऊन राणी चे? खरच सर्व गोष्टी ठिक होतील की अजुन बिघडत जातील?? राजेश खरच प्रामाणिक राहील?? नक्की वाचा पुढच्या भागात....
सलोनी पठाण.
