रमा जड काळीज घेऊन आईला बोलू लागते...
" तुला, बाबांना असंच वाटतं ना कि मी आमचं नातं टिकवण्याकरिता प्रयत्न केले नाहीत.मी वेगळं व्हायचा निर्णय तडकाफडकी घेतीये.तसं खरंच नाही आहे.
आमच्या चार वर्षांच्या संसारात मी प्रत्येक प्रकारे त्याच्या कुटुंबातल्या पद्धती, जेवणाच्या सवयी, सण-समारंभ सगळं समजून घेत स्वतःत बदल करत गेले".
"अगं, संसार म्हंटला की तडजोड हि करावीच लागते.आपण एक पाऊल मागे घेतलं तर काही आपण लहान होत नसतो".आई तिला समजावू लागली.
"संसार हा दोघांचा असतो मग फक्त स्त्रीनेच बदलावं का?ती तिच माहेर, माहेरची माणसं, स्वतःच नाव सारकाही मागे सोडून आयुष्याची नवीन सुरुवात करते.
त्यात तिला सासरकडच्यांनी समजून घ्यावं आणि नवऱ्याने आपली साथ द्यावी इतकीच माफक अपेक्षा होती. तीही पूर्ण झाली नाही.
याउलट प्रत्येक बाबतीत सासूबाई नुसतं टोचून बोलणार. काहीही आणि कसही केलं तरी चूकाच काढणार.कधी समजून सांगणं किंवा चांगलं बोलणं नाहीच की माझं कौतुकही नाही".हे बोलतच रमाच्या डोळ्यात पाणी तरळलं.

" नवऱ्याचं सारखं एकामागे एक अपेक्षा करणं.तुला हे आलं पाहिजे... ते शिकून घे. तुला सगळंच आम्ही म्हणतो तसचं आलं पाहिजे.
नुसत्या अपेक्षा. एक बदल करावा स्वतःत की दुसरी अपेक्षा आहेच असं सतत परीक्षा देणं आणि सगळ्या अपेक्षांवर खरं उतरणं मला कठीण झालय".आज रमा आईसमोर मनात साठलेलं भावनांचं काहूर व्यक्त करत होती.
नुसत्या अपेक्षा. एक बदल करावा स्वतःत की दुसरी अपेक्षा आहेच असं सतत परीक्षा देणं आणि सगळ्या अपेक्षांवर खरं उतरणं मला कठीण झालय".आज रमा आईसमोर मनात साठलेलं भावनांचं काहूर व्यक्त करत होती.
"माझ्यासोबत आता तुझ्या माहेरचे असे. त्यांनी जावयाला हे घ्यावं, असं करावं, तुला त्यांनी संस्कार देण्यात कमी पडलेत असं तुमच्याबद्दल बोलणं सुरु झालं तेव्हा मात्र ठरवलं.
या नात्यात काही प्रेम नाही, नुसत्या अपेक्षा उरल्यात".
या नात्यात काही प्रेम नाही, नुसत्या अपेक्षा उरल्यात".
घरात एकजण नाही ज्याला माझी किंमत जाणवेल. मी जॉब संभाळून सतत सगळ्यांचं माझ्यापरीनं करण्याचा प्रयत्न केला.पण आता बस्स..
थकले मी... जेव्हा अपेक्षांचं ओझं नात्यातल्या प्रेमापेक्षा आणि माणसांपेक्षा मोठं होतं तेव्हा वेगळं होण्याचा निर्णय मला घ्यावा लागला.
"आई... मला अजिबात मानसिक सुख शांती नाही कधीकधी विचार यायचे स्वतःला संपवावे.मग आई तुझा आणि बाबांचा विचार मनी आला आणि स्वतःला सावरलं".
शेवटी ठरवल मी माझ्या मनाशी, ह्या अपेक्षेच्या चौकटीतून बाहेर पडायचं आणि या सगळ्यावरून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
आई यावर रमाला समजावते, "हे सगळं पटतय मला तरीहि तू एकदा विचार करावास असं मला वाटतं...
तू तुझं वेगळं अस्तित्व निर्माण कर.तु उच्चशिक्षित आहेस तर त्याचा उपयोग कर.हि वाढत जाणारी अपेक्षांची चौकट झुगारून तुझी राहून गेलेली स्वप्न पूर्ण कर.तुझ्या आवडीचा छंद झोपसायला सुरुवात कर.स्वतःला ह्या सगळ्यात व्यस्त करून घे.
ते बोलतात त्या गोष्टी सोडून द्यायला शिकून घे त्यामुळे तुझं मानसिक स्वास्थ्य चांगले राहील".
शेवटी इतकंच म्हणेल...
"नातं तोडणं सोपं पण टिकवणं कठीण असलं तरी महत्वाचं असतं."

वाचकहो, हे आणि असे बरेच अनुभव आपल्याला आयुष्यात येत असतात. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे.प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यात प्रेम टिकवणं हे दोघांच्या हातात असतं. सासरच्या लोकांनी सुनेला समजून घेणही गरजेचं असतं. अपेक्षांचं म्हणाल तर त्या वाढत जातात पण त्या माणसापेक्षा मोठ्या नसाव्यात.अपेक्षांची हि चौकट भेदून स्वातंत्र्यपणे जीवन जगायचं हा प्रत्येकाचा हक्क आहे. शेवटी माणूस आणि नातं जपणं महत्वाचं नाही का?
तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा.
✍️©® सुप्रिया शिंदे महादेवकर.
✍️©® सुप्रिया शिंदे महादेवकर.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा