Login

स्वप्नपूर्तीची वाट

स्वप्नपूर्तीची वाट
तुझ्यासोबत चालायची
स्वप्नपूर्तीची वाट
प्रयत्नांसाठी सोसेन
संघर्षाची येणारी लाट

पाठिंबा भक्कम तुझा
सदा माझ्यापाठी असावा
द्वेष आणि अहंपणा संगे
कधीच आपल्यात नसावा

कधी हरल्यावर लढाई
हवा सावरायला आधार
डोके ठेवल्यावर खांद्यावर
सोडून द्यावा पूर्ण भार

तूच माझे जग आहेस
ते आनंदाने फुलवायचे
यशाचे शिखर गाठताना
अभिमानाने दोघांनी झुलायचे

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत.