Login

वाळूचा किल्ला

लेख वाळूचा किल्ला बालसाहित्य
वाळूचा किल्ला..!


बालपण जणू 'शिदोरी '
अनमोल भेट जीवनाची
अनोखा ठेवा आठवणीचा
अतूट सोबत आयुष्याची

आपले बालपण, आपल्या बालपणाच्या आठवणी कायमच्या मनात चिरकाल टिकून राहणाऱ्या असतात. त्या कधीतरी नकळत आठवतात. आणि मग पुन्हा त्या आठवणीमध्ये मन रमायला लागते. 'वाळू' हा नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होणारा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर, नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू साचलेली असते. मात्र याच वाळूला घेऊन कितीतरी आनंद देणाऱ्या बालपणीच्या आठवणी आनंद देत असतात.एक देखण असं वलय तयार होते. कितीही म्हटलं तरी सुद्धा त्या आठवणीमध्ये गुंतून रहावसं वाटते. बालपणीची एक आठवणं जवळपास सर्वांना आठवत असेलच, कधीतरी कोणाच्या घराचे बांधकाम करण्याकरिता ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणून टाकलेली वाळू म्हणजेच 'रेती' या रेतीवर खेळण्याची मौज मज्जा करण्याची बालपणीची आठवण आजही स्मरणात तशीच आहे. बालपणात वाळूपासून तयार केलेला वाळूचा किल्ला किंवा वाळू पासून तयार केलेले घर, कितीतरी किल्ले आपण बालपणात बनवली आहेत.आपण त्या वाळूवर बसून खेळ खेळलेलो आहोत. कोणाच्या घराचे बांधकाम असतांना, त्या ठिकाणी आणून टाकलेली वाळू लहान मुलांना जणू खेळण्यासाठी निमंत्रण देते. सर्व लहान मुले आवडीने त्या वाळूवर खेळायला जातात. मौज मस्ती धमाल करतात. कोणी वाळूमध्ये हात टाकून त्या हातावर वाळू टाकून दुसऱ्या हाताने झोपडीचा मस्त आकार देऊन मग हात हळूच त्यातून काढून सुंदर देखणं असं झोपडी किंवा घर तयार करतात. तर कोणी जस जमेल तस किल्ला, देऊळ बनवण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी वेळा वाळूपासुन घर, किल्ला बनवतांना कोसळतो ही पण पुन्हा पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न मात्र सुरूच रहातो. वाळूपासुन काही बनवण्याचा खेळ आनंद देऊन जातो. वाळूच्या कणांपासून मिळणारा आनंद मनाच्या कप्यात आठवणीत चिरकाल रहातो. बरेच बालपणीचे सोबती, मित्र मैत्रिणी वाळू मधले शंख, शिंपले गोळा करायचे, तर कोणी लहान मोठे गोल काळे दगड गोळा करायचे.आज इतक्या वर्षांनी जेव्हा ही कला प्रत्यक्ष बघायला मिळाली तेव्हा तो आनंद काही वेगळाच.आजही समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाळूवर चित्रकाम,नक्षीकाम केले जाते. जयंती, पुण्यतिथी असो किंवा व्हॅलेंटाईन डे किंवा खास अशा दिवसाच्या निमित्याने वाळूवर चित्रकला, त्यावर रेखाटन करणारे कलाकार, कलाप्रेमी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वाळूची कला म्हणजे वाळूचे कलात्मक स्वरूप होय. वाळूच्या सपाट भागावर रेखाचित्र तयार केले जातात. प्रामुख्याने सौंदर्याच्या कारणासाठी महत्त्वाचे आहे. वाळूवर किल्ले तयार केली जातात. वाळूपासुन सुंदर देखणा देखावा तयार केला जातो. वाळूवर तयार होणारे किल्ले चित्रकाम बघणाऱ्या प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वाळू चित्रकला ही कला आहे. बऱ्याच गोष्टी वाळूवर सुंदर कार्य करणाऱ्या कलाप्रेमी कडून शिकायला मिळते. त्यांचा उत्साह आनंद देऊन जातो. पुन्हा बालपणीच्या आठवणीत घेऊन येतो.

कोणी द्यावे परंतुनी
मज बालपणीचे क्षण
तो वाळूचा किल्ला
त्या कणात गुंतलेलं मन

©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला

0

🎭 Series Post

View all