Login

वर्षे येतात आणि जातात

Warshe
वर्षे येतात आणि वर्षे जातात...


वर्षें येतात हा हा म्हणता
निघून हि जाता....

कधी काही कटू अनुभव येतात
भरपूर शिकवून जाता....

कधी काही पेरलेले असता
फळ त्या प्रमाणे देऊन जाता.,..


कधी वय वाढवता
कधी अक्कल देऊन जाता....


पांढरे केस,पडके दात होतात
कधी काहीही डोक्यावर न ठेवता जाता....


आधी संकल्प मग सिध्दी ठरवता
मग संकल्प मग कारणे शोधता...

कधी हसू कधी आसू
कधी कटू कधी गोड आठवणीं ठेवून जाता...


नवीन वर्ष काही नवीन उर्मी भरतात
आपण काय करायचं आपल्या हाती देतात....

चला काही नवीन ध्येय ठरवा
करू पुर्ण जिद्द मनात बाळगा....

सौ भाग्यश्री चाटी सांबरे
1.1.2024