इतका वेळ ज्योतीचा घट्ट आवळलेला हात राजेशने जोरात झटकला.ज्योतीला खूप वेदना झाल्या.तशाही परिस्थितीत ती घाबरून उत्तरली,
“ हो..”
“ हो..”
“ आज रात्री मला नॉनव्हेज करून द्यायचं.समजलं? आणि त्यानंतर मला हवं ते मी तुझ्यासोबत करीन,बेडरूममध्ये..(कुत्सितपणे हसत) समजलं?”
(अजूनही ज्योती उत्तर देत नाही पाहून,अत्यंत रागिष्ट,मोठ्या सुरात..)
“ समजलं की नाही?”
“ समजलं की नाही?”
( प्रचंड घाबरत..)” हो.”
हॉलचा दरवाजा ताडकन आदळत राजेश घराबाहेर पडला.ज्योती मात्र आपल्या फाटक्या नशिबाला दोष देत ओक्साबोक्सी रडू लागली.
________
________
ज्योतीने सांगितलेला प्रसंग ऐकून पांडे मॅडम भावुक झाल्या खऱ्या पण तरीही आपले सोफेस्टीकेटेड ॲटीट्युड जपण्याचा त्या प्रयत्न करत होत्या.
ज्योती पुढे बोलू लागली,
“शिक्षित मुलगा म्हणून राजेशच्या स्थळाला माझ्या आई- वडिलांनी लगेच होकार दिला. त्याचे आईवडिल लवकर देवाघरी गेल्याने माझ्या आईवडिलांना त्याची दया आली. सुरुवातीला त्याच्या अत्यंत धोरणी,आदरयुक्त वागण्याने प्रभावित होत,त्यांनी इतर कुठलीही चौकशी न करता मला त्याच्या स्वाधीन केले.अंकिता, माझी लहान बहीण मात्र काहीतरी गौडबंगाल आहे हे ओळखून होती पण आईवडील त्यावेळी तिचं काही एक ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे माझी फसवणूक झाली.”

ज्योतीचा प्रसंग ऐकून पांडे मॅडमनी मोठा उसासा टाकला आणि शेजारी बसलेल्या मेघाकडे पाहत म्हणाल्या,
“ बरं.. आता तुम्ही सांगा तुमचा असा एखादा प्रसंग..”
मेघानेही कुठलेही आढेवेढे न घेता ज्योतीसारखाच एक प्रसंग सांगितला तो असा,
_____________________
“ऋषी,काय बनवू आज जेवायला?”मेघा म्हणाली.
“ बरं.. आता तुम्ही सांगा तुमचा असा एखादा प्रसंग..”
मेघानेही कुठलेही आढेवेढे न घेता ज्योतीसारखाच एक प्रसंग सांगितला तो असा,
_____________________
“ऋषी,काय बनवू आज जेवायला?”मेघा म्हणाली.
“ बनव तुला जे येतं ते..”
“ म्हणजे?”
“ म्हणजे मॅडम,तुला येतं तरी काय बनवायला? दिवसभर तर घरीच असतेस,तरीही काहीतरी शिजवायचं अन् मांडायचं पुढ्यात..”
“ ऋषी,नोकरी तू सोडायला लावलीस मला.. त्यामुळे घरीच तर असतेस असे तू मला कसे काय म्हणालास ?”
“ चुकलं हो मॅडम चुकलं.( मध्येच आपला आवाज उंच स्वरात चढवत )ए जास्त शहाणपणा करायचा नाही हां..मी तुझा नवरा आहे,तू माझा नवरा नाही.त्यामुळे मी सांगेन तेच करायचे,सांगेन तसेच कपडे घालायचे.सांगेन तेच अन्न शिजवायचं.जास्त डोकं नाही लावायचं,समजलं?नाही तर.”
ऋषीचे पुढचे बोलणे ऐकायच्या आता ती म्हणाली,
“ हो ठीक आहे..”
मेघाने फोन ठेवला.
“ हो ठीक आहे..”
मेघाने फोन ठेवला.
सततच्या कुरबुरींमुळे,नव्हे या मानसिक अत्याचारामुळे मेघाला मायग्रेनची डोकेदुखी सतावू लागली होती.त्यात ऋषीचे असे बोलणे ऐकून तिला मायग्रेन अटॅक आला आणि तिने तात्काळ गोळी घेतली.त्यामुळे तिला तात्पुरते बरे वाटले.
_________________
मेघा पुढे म्हणाली,
“असे रोजच घडू लागले तर काय करायचे आम्ही मुलींनी?”
_________________
मेघा पुढे म्हणाली,
“असे रोजच घडू लागले तर काय करायचे आम्ही मुलींनी?”
क्रमशः
भाग २ समाप्त..
भाग २ समाप्त..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा