शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त - भाग ४
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
पात्र परिचय:
सखू:किशाची आई
किशा: पाच जिगरी दोस्तांमधील एक
इतर जिगरी दोस्त: महाद्या,रम्या,बाळ्या, गोट्या
परी : किशाची बहीण
सखू:किशाची आई
किशा: पाच जिगरी दोस्तांमधील एक
इतर जिगरी दोस्त: महाद्या,रम्या,बाळ्या, गोट्या
परी : किशाची बहीण
स्थळ: किशाचे घर
मागील भागात आपण पाहिले की गोट्याला अजय सरांकडून शाळेच्या प्रांगणात मृतदेह आढळल्याचे कळते.त्यामुळे काही दिवस शाळा बंद ठेवायची असे अजय सर ठरवतात.आम्ही जिगरी दोस्त या कठीण काळात तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही गोट्या अजय सरांना देतो.आता पाहुया पुढे..
सखू सकाळची कामे आवरत होती. तिच्या डोक्यावर टिकली होती. तिचा चेहरा अगदी आनंदात होती. जसे काहीच झाले नाही अशा अविर्भावात ती झटपट कामे आटोपत होती.
तेवढ्यात किशा म्हणाला ,"आई,ए आई.."
सखु म्हणाली,"काय रे बाळा?"
किशा आईला ऐकू जावे म्हणून थोडेसे जोरात बोलला,
"काय करतेय तू? हा हार बघ ना फोटोसाठी.."
"काय करतेय तू? हा हार बघ ना फोटोसाठी.."
सखू किशाजवळ येत म्हणाली," अरे असं काय करतोस? मी काही हार वगैरे बघणार नाही.दे की देवाला तसाच घालून.."
सखू तिथून निघून गेली.
सखू तिथून निघून गेली.
किशा आश्चर्यचकित होत, भावूक होत, रडू लागला.
पाच जिगरी दोस्तांची टोळी म्हणजेच महाद्या ,रम्या, बाळ्या व गोट्या किशाच्या घरी आले. किशा रडतच होता. आपल्या मित्रांना दारात बघताच त्याने आपले अश्रू पुसले व स्वतःला सावरले.
पाच जिगरी दोस्तांची टोळी म्हणजेच महाद्या ,रम्या, बाळ्या व गोट्या किशाच्या घरी आले. किशा रडतच होता. आपल्या मित्रांना दारात बघताच त्याने आपले अश्रू पुसले व स्वतःला सावरले.
किशा दुरूनच आईला उद्देशून म्हणाला," आई, मी जरा बाहेर जाऊन येतो."
सखू म्हणाली,"लवकर ये.. तुझ्या बासाठी मी एक छान पदार्थ बनवणार आहे.आत्ताच नाही सांगणार तुला! आल्यावर बोटं चाखत राहशील."
किशा रडत रडतच बाहेर आला. पुन्हा आपले अश्रू पुसत तो सावरण्याचा प्रयत्न करत होता पण अश्रूंचा तीव्र आवेग आपल्या जिगरी दोस्तांसमोर सावरण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न फोल ठरला आणि तो गोट्याच्या गळ्यात पडून ओक्सबोक्सी रडू लागला.
किशा आपलं फुंदून रडणं पुन्हा सावरत म्हणाला,"पाहिलं ना तुम्ही सगळ्यांनी ,माझ्या आईची काय अवस्था झाली आहे ती? काय दोष होता माझ्या वडिलांचा? त्यांचं साधं सरळ असणं कोणाला बोचलं?"
तो पुन्हा फुंदून फुंदून रडू लागला.
तो पुन्हा फुंदून फुंदून रडू लागला.
रम्या म्हणाला ,"हे बघ किशा, तुझ्या कुटुंबाचा आधार म्हणजे तुझे बाबा गेले हा नियतीचा खेळ आहे; पण तू काहीही काळजी करू नकोस. आपण झालेल्या घटनेचा मागवा नक्कीच घेऊ.फक्त तू खचून जाऊ नकोस,तुझ्या आईला समजून घे, आधार दे."
बाळ्या म्हणाला," हो.तुझे वडील गेले ही आमच्यासाठी सुद्धा धक्क्याची बाब आहे."
किशा पुन्हा डोळ्यात पाणी आणून म्हणाला," अमानुषपणे खून करून शाळेत टाकला त्यांचा मृतदेह कोणीतरी.. त्यांचा चेहरा ओळखू सुद्धा येत नव्हता."
तेवढ्यात किशाची लहान बहिण परी,गोट्याजवळ आली.
परी थोडेसे बोबड्या स्वरात म्हणाली,"गोट्यादादा, बाबा कधी येणाल आहेत मी त्यांची कित्ती वाट पाहते आहे."
गोट्याने दुःखाने पाणवलेले डोळे लपवत तिला प्रेमाने जवळ घेतले.
परी थोडेसे बोबड्या स्वरात म्हणाली,"गोट्यादादा, बाबा कधी येणाल आहेत मी त्यांची कित्ती वाट पाहते आहे."
गोट्याने दुःखाने पाणवलेले डोळे लपवत तिला प्रेमाने जवळ घेतले.
महाद्या म्हणाला,"जे झालं ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं.त्यामुळे किशा, तू कशातून जातोय याची मला चांगलीच कल्पना आहे पण भरोसा ठेव मित्रा आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू.फक्त तू धीर धर, शांत संयमी राहा. तुझ्या आईला सांभाळ, तुझी जबाबदारी व्यवस्थित पार पाड."
किशा महादेवाच्या बोलण्याने शहारला. त्याला नवीन बळ आल्यासारखे वाटले .हे दुःख पचवून आपण आता धीट व्हायला हवे याची जाणीव त्याला झाली व त्याने आपले अश्रू पुसले.अत्यंत खंबीर मनाने त्याने महाद्याला हो असा इशारा करत मान डोलावली.
क्रमश:
भाग ४ समाप्त..
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
