शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त - भाग २
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
पात्र परिचय:
गोट्या, महाद्या:पाच जिगरी दोस्तांतील दोघे
महाद्याचे वडील: राम
महाद्याची आई: गंगा
महाद्याचे वडील: राम
महाद्याची आई: गंगा
स्थळ: महाद्याचे घर
मागील भागात आपण पाहिले की जिगरी दोस्तांपैकी एक असलेल्या महाद्याला शाळेच्या गेटमध्ये एक छिन्नविछिन्न मृतदेह दिसला आणि तो ग्लानी येऊन बेशुद्ध झाला.तेव्हा विनोद नावाच्या भल्या माणसाने परिस्थिती तसेच इतर जमलेल्या लोकांना सांभाळून घेत रामला म्हणजेच महाद्याच्या वडिलांना त्याला घरी घेऊन जायला सांगितलं. आता पाहुया पुढे..
राम घराच्या कुंपणाच्या आत शिरला.त्याने महाद्याला एका हाताने व्यवस्थित आधार दिला आणि म्हणाला,
"अगं ए गंगे.. (घरात गंगेला इकडे तिकडे शोधत)कुठे गेली आहे काय माहित?"
"अगं ए गंगे.. (घरात गंगेला इकडे तिकडे शोधत)कुठे गेली आहे काय माहित?"
आपल्याला कोणीतरी आवाज देत आहे हे ऐकून गंगा लगबगीने म्हणाली,
"आले आले.."
"आले आले.."
"काय हे? कधीचा आवाज देतोय." राम म्हणाला.
"अहो मागं गवत कापत होते. आवाजच ऐकू आला नाही तुमचा लवकर. काय हो आणि हे काय? महाद्या कसं काय आला एवढ्या लवकर घरी? शाळा नाही का आज?"
"महाद्या चक्कर येऊन पडला शाळेत."
"कसं काय? अरे देवा (महाद्याला जवळ घेत) माझ्या लेकराला कसं काय चक्कर आली? तो तर काही आजारी नाही,काही नाही." गंगा कळवळून म्हणाली.
"बरं झालं मी बाजूलाच शेतात काम करत होतो; म्हणून मग घरीच घेऊन आलो याला."
"बरं.आता त्याला चांगलं खाऊ पिऊ घालते आणि आराम करायला लावते.."
"पण बाबा, ते शाळेत मी पाहिलं ते.."
"काय पाहिलं तू?" गंगा अचंबीत होत, घाबरत आणि चिंतेच्या सुरात म्हणाली.
डोळ्यांसमोर मृतदेहाचे रक्ताच्या थारोळ्यातील चित्र आठवून महाद्या म्हणाला,"खून"
गंगा आश्चर्याने म्हणाली,"खून?"
राम देखील आश्चर्याने तरीही आश्वासकपणे म्हणाला," हो खून."
गंगा पुरती गोंधळली अन् म्हणाली,
" मला नीट सांगा.शाळेत नेमकं काय घडलंय?"
" मला नीट सांगा.शाळेत नेमकं काय घडलंय?"
राम चिडून म्हणाला,
" तुला जे सांगितलं, कळलं, तेच आणि तेवढेच पुरेसं आहे.आता यावर चर्चा नको पोरासमोर. आधीच झालेल्या घटनेने त्याला भीती वाटली आहे."
" तुला जे सांगितलं, कळलं, तेच आणि तेवढेच पुरेसं आहे.आता यावर चर्चा नको पोरासमोर. आधीच झालेल्या घटनेने त्याला भीती वाटली आहे."
गंगा आपले कुतूहल नियंत्रित करत म्हणाली," बरं, बरं ठीक आहे."
तेवढ्यात महाद्याच्या घरासमोरून जात असताना गोट्याने महाद्याच्या चपला गेटमध्ये पहिल्या आणि तो स्वतःशीच बडबडला, "याच्या चपला अजून इथेच? शाळेत गेला नाही हा? गेट उघडलं नाही याने? आत जाऊन बघतो म्हणजे मला कळेल.."
गोट्या महाद्याच्या घरात गेला. तिथे महाद्या व त्याचे आई-वडील बसलेले होते.
गोट्या म्हणाला,"अरे महाद्या, तू शाळेत गेला नाहीस अजून? एवढा का घाबरलेला आहेस? "
राम ठामपणे म्हणाला,
"आजपासून महाद्या शाळेत येणार नाही."
(गंगा व गोट्या आश्चर्यचकित झाले.)
"आजपासून महाद्या शाळेत येणार नाही."
(गंगा व गोट्या आश्चर्यचकित झाले.)
गोट्या म्हणाला,"पण का?"
राम पुन्हा एकदा ठाम निर्धाराने म्हणाला," मी सांगितलं ना महाद्याची शाळा बंद म्हणजे बंद.गपगुमान शेतीत लक्ष घालायचं.माझ्यासोबत शेतात यायचं.काम शिकून घ्यायची . गोट्या जाऊन सांग अजय सरांना."
चेहऱ्यावर असंख्य प्रश्नांचे भाव ठेऊन गोट्या म्हणाला," पण काका.."
राम गोट्याचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाला," बास..मला यावर अजून काहीही बोलायचे नाही.गंगा याला पाणी दे आणि इथून जायला सांग.महाद्याला सध्या आरामाची गरज आहे.."
गोट्या मनोमन विचार करत घराबाहेर निघाला.एवढे टोकाचे का बोलले काका? काय झाले आहे नेमके महाद्याला? शाळेत का नाही पाठवणार ते त्याला?
भाग २ समाप्त.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
