शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त - भाग ७
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मागील भागात आपण पाहिले की पाच जिगरी दोस्त एकमेकांना समजून घेत, अगदी एकजुटीने खुनाच्या तपासात मुळापर्यंत जाऊन,मित्राच्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून शपथ घेतात कारण ती त्यांच्या मैत्रीची देखील कसोटी बनलेली असते.आता पाहुया पुढे..
पात्र परिचय:
अजय सर: शाळेचे सर्वेसर्वा
बाबुराव: अजयचे वडील
पालक: सात आठ मोठी माणसं व पाच सहा चिमुकली
अजय सर: शाळेचे सर्वेसर्वा
बाबुराव: अजयचे वडील
पालक: सात आठ मोठी माणसं व पाच सहा चिमुकली
स्थळ: अजयचे घर,(फ्लॅशबॅकसाठी) शाळेचे व्यासपीठ
अजय सर त्यांच्या घरी होते. त्यांच्या मनात विचारचक्र फिरत होते. ते विचारांमध्ये स्वगत करू लागले,
‘शाळेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा कलकलाट व्हायला हवा..’
झालेली घटना डोळ्यांसमोर आठवून अजय सर पुन्हा भाऊक झाले व आपल्या बेडवर झोपायला गेले. त्यांना झोप लागली आणि स्वप्न पडले.
‘शाळेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा कलकलाट व्हायला हवा..’
झालेली घटना डोळ्यांसमोर आठवून अजय सर पुन्हा भाऊक झाले व आपल्या बेडवर झोपायला गेले. त्यांना झोप लागली आणि स्वप्न पडले.
त्यांच्या स्वप्नात फ्लॅशबॅक सुरू झाला.
आज शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे घाबरतच चिमुकली पावले शाळेच्या खोलीत आली. तिथे एक छोटेसे व्यासपीठ होते एक व्यक्ती तिथे बोलत होती, जी की शाळेतीलच एका पाल्याचे वडील होते.
एक पालक म्हणाले," मोहरळ या गावात याआधी कधीही शाळा न पाहिलेली मोठी माणसे आज आपल्या मुलांना शाळेत जाताना पाहून रडत आहेत, त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू खूप काही सांगून जात आहेत.आता मोहरळ गावातील प्रगती नवे शिखर गाठणार हा एकच विचार गावातील आम्हा सर्व पालकांना सुखावून जात आहे. म्हणूनच सर्वप्रथम मी शाळेचे संस्थापक अजय सरांना आजची सत्कारमूर्ती म्हणून शाल व श्रीफळ देऊ इच्छितो. मोहरळ गावातील बाबुराव या गरीब शेतकऱ्याचा अजय हा मुलगा असून तो शहरात जाऊन खूप शिकून आलेला आहे. बाबुरावांची गावाप्रती शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी ओळखून मी बाबूरावांचा देखील या ठिकाणी सन्मान करू इच्छितो."
बाबुरावांना देखील शाल व श्रीफळ देण्यात आले.
" इथे जमलेल्यापैकी कोणाला काही विचारायचे असल्यास विचारावे."
खाली बसलेल्या पैकी एक पालक उभे राहिले.
ते म्हणाले,
"खरं तर तू एवढा शिकलेला, होतकरू मुलगा.शहरात पैसे कमावणे सोडून तू इथे येऊन, शाळेतील मुलांना शिकवायचे का ठरवलेस? मला खरं आणि प्रामाणिक उत्तर दे."
"खरं तर तू एवढा शिकलेला, होतकरू मुलगा.शहरात पैसे कमावणे सोडून तू इथे येऊन, शाळेतील मुलांना शिकवायचे का ठरवलेस? मला खरं आणि प्रामाणिक उत्तर दे."
अजय सर म्हणाले, "काका, शहरात पैसा कमावून मी एकटाच पुढे जाऊ शकलो असतो परंतु माझ्या वडिलांच्या शिकवणीनुसार पैसा नव्हे तर संस्कार महत्त्वाचे आहेत; आपलेपणाचे संस्कार,जन्मदात्या मातीचे ऋण फेडण्याचे संस्कार! मी तर शिकलोय पण आपल्या गावाचे काय ?गावात शाळा नव्हती म्हणून वडिलांनी पाच-सहा किलोमीटर सायकल चालवून शहरातील शाळेत माझे नाव घातले.पुढे महाविद्यालयात शिक्षण घेताना मला करावी लागणारी कसरत मी कशी विसरू शकेन? म्हणून मग मी निर्धार केला आपल्या गावासाठी शाळा उभी करायची. शाळेद्वारे गावाला प्रगतीपथावर न्यायचे.पालकांच्या तसेच मुलांच्या हालअपेष्टा, कष्ट कमी करून शहरातील मुलांच्या तोडीस तोड बनवायचे."
सर्व उपस्थित पालक,पाल्यांनी अजय सरांच्या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू केला.
क्रमश:
भाग ७ समाप्त..
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा