Login

माझं काय सांगू बाई तुला? भाग -१

What Can I Say Lady
"आई ,मला ना तो मनीष मल्होत्राचा ४ लाखांचा घागरा हवा मला घेऊन देशील ना ! आणि हो एक ते वैदिक असता ना तिथे मस्त निळ्याशार रंगाची नव्वारी पण घेऊन दे आणि हो हळदीला आपण मस्त थिम ठेऊ सर्व बायका मस्त पिवळ्या नव्वारया घालतील आणि पुरुषवर्ग सदरे घालतील. अय्या! मी राहिले कि मला ना मस्त पिवळा घागरा घेऊन दे आणि हळद लावताना ती बांधणीची साडी घेऊन दे आणि हो अजून एक माझ्या मेहेंदीला सर्वानी डान्स बसवायचा बरं का ! अजून एक मला वाटत आपण ना मस्त हॉटेल बुक करू आणि मस्त थाटामाटात माझा लग्न करू काय वाटत?आणि हो आधीच सांगते मला माझ्या नवऱ्यासाठी पण डान्स करायचा तर मग एक मस्त नृत्यदिग्दर्शक पण लागेल … शेवटी माझा लग्न आहे माझा डान्स उत्कृष्ट हवा ना काय वाटत तुला ? "आई अग बोल ना काही . 

वर्षा बराच वेळेपासून आईला सगळी व्यवस्था सांगत होती कि लग्न कसे हवे? काय हवे ? 

आई मात्र गहू निवडण्यामध्ये व्यस्त होती . 

आई , अग मी तुझ्याशी बोलते मला सांगशील का काही ? .. आता मात्र वर्षा वैतागून विचारू लागली . 

वर्षा मॅडम , वडील काय करतात तुमचे ? नाही म्हणजे एवढ्या अपेक्षा तुमच्या मग तर तुमचे वडील पण अंबानी कडे काम करत असणार ना ! आणि हो मुलगा काय करतो ? कुठे कामाला ? आणि कधी भेटवता आम्हाला ? … आई हसत टोमणे मारत वर्षाला बोलू लागली.  

काय ग आई तू पण सर्व मूड च घालवून दिला .. जा गडे मला नाही बोलायचं वर्षा एवढं बोलून खोलीत निघून गेली . 

हो ना अजून नवऱ्याचा पत्ता नाही ! वय तर झाले पण नाही ! आणि स्वप्न बघून घ्या मॅडमचे जशा मोठ्या कलेक्टर होणार आहे . जा अभ्यास करा . … आई एवढे बोलून कामाला लागली . 

वर्षा सुद्धा आतल्या खोलीत येऊन बसली पण खोलीत पसारा इतका होता कि आईने पहिला असता तर परत कटकट केली असती म्हणून पहिले खोली आवरून घ्यावी असा विचार करत वर्षाने तिच्या कपाटापासून सुरवात केली .. 
आणि एवढ्यात कपाट खोलताच ती जोरात किंचाळली...
आई ! काय आहे हे ? इकडे ये बघु !
क्रमशः
( काय वाटतं वर्षाच्या अपेक्षा जास्त होत्या का? की आईची मस्करी योग्य होती ? आणि वर्षा अचानक का किंचाळली असेल? काय दिसले असेल तिला कपाटात ? बघु पुढच्या भागात )