भाग -२
तिची किंचाळी ऐकून आई धावत पाहायला आली कि नक्की झाले तरी काय आहे !
आणि बघते तर काय तिच्या एक एक साड्या मॅडम बाजूला फेकत होत्या .
काय ग दीदी ? काय झालं एवढा ओरडायला ? मी म्हंटल काय उंदीर वगैरे आला काय खोलीत ? आणि बघते तर मस्त माझ्या साड्या फेकण्याचे काम चालू आहे .
आई , तुला किती वेळा सांगितलं तुझ्या साड्या तिकडे ठेवत जा इथे माझ्याच कपड्याना जागा नसते आणि मस्त तुझ्या साड्या पण अजून ठेऊन देतेस . जा गडे या तिकडे घेऊन जा ! वर्षा वैतागून उत्तरली
अग , काहीच साड्या ठेवते बर का . सगळ्या कुठे आणते ग ? दे बाई जाते घेऊन आणि आता तू माझयाकडे ये माझ्या साड्यांसाठी मग बघ तुला कसा इंगा दाखवते. काही कार्यक्रम असला कि कशी लगेच मला लाडीगोडी लावतेस …
आई ,मला तुझी साडी देना . किती छान आहे ती आणि गोड गोड बोलून माझ्या ब्लाऊसपिस वर स्वतःच ब्लाउस पण शिवून घेते .थांब ग तू तू ये आता मग बघते. एवढे बोलून आई चालती झाली.
हो हो नको देऊ विकत घेईल मी अशा पण तुझ्या साड्या खूप ओल्ड फॅशन आहे. … वर्षा
इकडे वर्षाने कपाट खोलले आणि जणू कपड्यांचे दुकान समोर पडावे असे सर्व कपडे तिच्यासमोर येऊन पडले …
शी ,बाई किती हे कपडे कंटाळा आला नुसता पण एक सुद्धा चांगला ड्रेस राहिला नाही मला आता नवीन घ्यावेच लागतील … … वर्षा स्वतः शी उत्तरली .
हो का नवीन का ? ये ना पैसे देते का बघ ते आवर पहिले . पैसे तर झाडालाच येतात ना .
… कानोसा देत आई उत्तरली .
एवढ्यात वर्षा समोर एक निळ्या रंगाची जरीची साडी येऊन पडली .साडी तशी साधी होती पण जड होती आणि "जरी" ती तर एकदम खुलून दिसत होती तशीच ती साडी हाथात घेऊन वर्षा आईकडे गेली ..
आई , हि साडी कोणती ग ? म्हणजे सुंदर आहे पण मी कधीच नाही पहिली .
वर्षा चकित होऊन विचारत होती .
क्रमशः
( काय मग दररोजच्या आयुष्यातली मुलगी आणि आईची घालमेल कशी वाटली ? आणि काय वाटतं कोणती साडी असेल ही ? आणि आईला लक्षात तरी असेल का ही साडी ?
बघु पुढच्या भागात )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा