अय्या ! हि साडी कुठे भेटली तुला ? खूप हौशेने घेतली होती तेव्हा ! पण तुला आधीच सांगते खबरदार या साडीकडे बघितले तरी हि साडी तुला अजिबात मिळणार नाही . … आई उत्तरली .
अग , आई मी कुठे काय म्हणते मी तर फक्त विचारते कि हि साडी कधीची आहे . …. वर्षा .
अग , हि साडी माझ्या लग्नाची आहे . तुझ्या आजोबानी मला घेऊन दिली होती . … आई .
आई ,पण तू इतकी साधी साडी कशी घेतली ग ? म्हणजे बघ ना माझ्या पण किती अपेक्षा आहे ?
… वर्षां अगदी चकित होऊन बोलू लागली.
साधी ! माझं काय सांगू बाई तुला आता !
… आई हसत उत्तरली .
काय ग सांग ना हसते काय? … वर्षा उत्तरली.
अग , दीदी एक लग्नाचे ५ - ७ कपडे बघणारी तू ! एक लग्नासाठी लाखांचं बजेट देणारी तू! एक लग्नासाठी खर्चाचं माप ओलांडणारी तू! तुला काय कळेल एक ५०० रुप्याच्या साडीची किंमत आणि ४०००० च्या लग्नाची जाणीव . … हलकेच हसत आई उत्तरली.
काय ? आई , ५०० रुपयाची साडी ! अग ५०० रुपयांमध्ये तर आज एक साधा टॉप सुद्धा येत नाही .
आणि काय ४०००० चा संपूर्ण खर्च ! आई थट्टा नको करू ४०००० चा तर मी घागरा सुद्धा नाही घेणार !
… वर्षा उत्तरली .
अग , तेच तर तुला काय कळणार त्या गोष्टी . … आई .
आई , मला तुमच्या लग्नाची गोष्ट सांग ना . मी आधीच नाही ऐकली सांग ना .
… वर्षा उत्तरली .
आमच्या लग्नाची गोष्ट ! तर तुला सांगते तुझ्या आजोबांची परिस्थिती तशी जेमतेम होती पण मुलींना शिकवायला त्यांनी मागे पुढे नाही बघितले कधी ! त्या वेळी तुझी मोठी मावशी जास्त शिकली नाही मग बाबानी तिला शेतकरी कुटुंब बघितले . पण आम्ही बाकी तिघी शिकत होतो आणि मी राहिली दुसरी तुला सांगते तुम्ही आता एवढ्या अपेक्षा ठेवतात नवऱ्याविषयी पण त्याकाळी आजोबानी मी शिकत होती तर शेतकरी कुटुंबाचे मागणे कधी घरापर्यंत सुद्धा येऊ नाही दिले .
क्रमशः
( काय मग कशी असेल एवढ्या कमी बजेट ची तडजोड किंवा लग्न ? कसे ठरले असेल लग्न ? बघु पुढच्या भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा