Login

माझं काय सांगू बाई तुला? भाग - ४

What Can I Say Lady

तुला सांगते फक्त एकदा विचारलं त्यांनी मला,  

   मंदा , काय मग शेतकरी बघायचा कि नोकरीवाला ? आता आम्हाला काही कळायचं तर नाही एवढं पण मी विचार केला कि शेती पेक्षा नोकरी बरी .

त्यांनतर स्थळ यायची पण आजोबानी कधी घरापर्यंत येऊ नाही दिला. 

मग काही दिवसांनी एक स्थळ आले . नोकरीवाला मुलगा होता शिवाय नाशिक मध्ये नोकरी करत होता . घरची परिस्थती तर फार उत्तम पण एक अडचण होती ! 

काय अडचण ? … वर्षा उत्तरली . 


मुलाची परिस्थिती अगदी उत्तम होती . मोठा भाऊ म्हणजे तुझे काका त्यावेळेपासून वकिली पेशात होते. 

पण आई म्हणजे माझी सासू आणि तुझी आजी थोडी कडक होती . ती पण त्यावेळी खूप उत्तम घरातून आली होती . पण मी राहिली गरीबाची ! मग सासूबाईंना काही मी मान्य नव्हते पण तुझ्या बाबानी तुझ्या काकांकडे मागणे केले . कि मुलगी चांगल्या घरातली आहे . शिकते पण आहे मी शिकवेल तिला पुढे पायावर उभे करेल . 

भावाची मागणी बघून मग काका सुद्धा बघायला आले मला. घरची परिस्थिती सर्व काही एकूण बघून मुलींची घडवणूक बघून त्यांनी निर्णय घेतला कि सुनील साठी हीच मुलगी योग्य आहे.

पण तुझे आजोबा पण सरळ एकदम . त्यांना अंदाज तर होता मुलाची परिस्थिती खूप चांगली पण त्याकाळी दीदी हुंडा द्याची पद्धत होती आणि बाबांची काही ती ऐपत नव्हती मग काय बाबानी स्पष्ट सांगितले कि मी हुंडा देऊ शकणार नाही . 

आणि तुला सांगते तुझ्या बाबा आणि काका ना यावरून काही एक हरकत नव्हती . 

मग काकांनी मागणी सांगितली कि ठीक आहे , हुंडा नको पण लग्न काढून द्या तेवढ. 

यावर आजोबानी आकडा दिला कि ४०००० मध्ये मी मुलीच लग्न काढून देईल आणि याला सुद्धा दोन्ही भावांची मंजुरी आली . 

अशा पद्धतीने मग माझं लग्न पार पडलं होत .
तुला सांगते तुम्ही मुलींचं एवढं तेवढं असता मेकअप म्हण बारीक सारीक खरेदी म्हण...खूप गोष्टी असतात . 
माझ्यावेळी मेकअप सुद्धा माझ्या बहिणीनी करून दिला होता.
बापरे! आई खरंच . तुला एक प्रश्न विचारू का शेवटचा.
वर्षा उत्तरली.
क्रमशः
( कशी वाटली मग लग्नाची गोष्ट? पण काय वाटत काय प्रश्न असेल वर्षाचा आणि अजून एक पान तर बाकी आहे ..बघु पुढच्या भागात )