हो हो विचार ना . तेच मी विचार करते मॅडमना प्रश्न कसे नाही पडले ? … आई हसत उत्तरली .
आई, तू मला सर्व सांगितले .. बाबा .. काका .. सासूबाई .. घरची परिस्थिती पण तू मला हे नाही सांगितले कि या घरापर्यंत हे स्थळ गेलं कसा ? … वर्षा उत्तरली .
सांग बर तू ! कसं झालं असणार हे ! … आई .
आता हे बघ आई त्याकाळी तुम्ही प्रेम विवाह तर केला नसणार आणि आजच्या सारख्या ऑनलाईन साईट्स पण नव्हत्या तेव्हा ! मग काय तुम्ही काय ओळखत होते का एकमेकांना म्हणजे जवळ जवळ राहत असे का ? … वर्षा उत्तरली.
नाही ग वेडाबाई आमची गाव पण तर दूरदूर होती . त्यावेळी ना म्हणजे मी नंतर विचारलं होत तेव्हा तुमच्या बाबांनी मला सांगितलॆ होते कि ,
त्यांनी मला एका लग्नात बघितले होते म्हणजे ते आणि मी आमच्या एका मैत्रिणीच्या लग्नात गेलो होतो . ते वाटतं मुलाकडून होते आणि मी मुलीकडून आणि मग तेव्हा त्यांनी मला पहिले आणि मग विचारपूस करत हे स्थळ आले.
तुला सांगते दीदी , त्यावेळी प्रेमविवाह करणे खूपच अवघड . मुळात शाळा आणि कॉलेज मध्ये मुली जास्त जात नसे आणि १८ ची होईपर्यंत सुद्धा कधी कधी वाट नाही पहिली जायची त्या आधी सुद्धा लग्न होऊन जायची.. त्यांनतर ऑनलाईन साईट्स नव्हत्या मग काय यांच्याकडून त्यांच्याकडूनच स्थळ यायची .
बापरे ! आई अवघड होत कि मग ! …वर्षा उत्तरली .
हो मग तुम्हाला सोप्पं खूप झालं पण मग तुमच्या अपेक्षा पण खूप वाढल्या कि . … आई उत्तरली.
आणि त्यांनतर काय मग तुझ्या बाबानी दिलेला शब्द पूर्ण केला त्यांनी मला शिकवले माझंही शिक्षण पूर्ण झाले आणि आज तुझी आई प्राध्यापिका आहे .
बर आई मला तुमची गोष्ट तर फार आवडली खूप सुंदर होती . पण मग आता या साडीच काय करतेस ? म्हणजे तुझी इच्छा असेल तर मला एकदा माझ्या लग्नाच्या एका तरी कार्यक्रमाला हि साडी घालायची आहे . देशील का? …वर्षा परत आईला लाडीगोडी लावू लागली .
हो का ! खूप अवघड आहे ग तू ! घाल बाई घाल पण एका अटीवर .
… आई उत्तरली .
हो हो माहित आहे नीट वापर . वापरेल ग मी ! … वर्षा उत्तरली .
नाही ते तर तुला करावंच लागेल ! पण अट अशी कि हि साडी कायमस्वरूपी तुझ्याच कपाटात राहिल.
… एवढे बोलून आई हसत निघून गेली.
नाही ना आई ! हि चीटिंग आहे . आई…
वर्षा साडी ठेवत परत आईसोबत डोकं लावायला तत्पर झाली.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा