तो तिला सहजच खेटून गेला
त्याची भूक शमावयाला,
त्या एका स्पर्शाने पण,
तिचा आत्मा गोठून गेला..
त्याला सिध्द होत्या अनेक क्लृप्त्या,
तिला वश करण्याच्या,
डोळे तिचे उघडले तेव्हा,
जेव्हा तो सारे लुटून गेला..
त्याची भूक आधीच आंधळी,
त्यात पौरुष्याचा माज,
मग कोवळा जीव एकेक,
त्याची भेट चढून गेला..
किती जपले तिने स्वतःला,
या विकृत जगापासून,
घरात लपलेल्या श्वापदाने,
मग तिचा जीव कुरतडून नेला..
मूक निषेध आणि मेणबत्या निव्वळ,
न्याय कुणाचा करतील काय?
आघात झालेले तना-मनावर घाव ते भरतील काय?
कुठे जावे तिने लपाया?
कुठला कृष्ण तिने भजावा?
द्रौपदीचा पदर भरसभेत,
पुन्हा दुःशासन फेडून गेला...
त्याची भूक शमावयाला,
त्या एका स्पर्शाने पण,
तिचा आत्मा गोठून गेला..
त्याला सिध्द होत्या अनेक क्लृप्त्या,
तिला वश करण्याच्या,
डोळे तिचे उघडले तेव्हा,
जेव्हा तो सारे लुटून गेला..
त्याची भूक आधीच आंधळी,
त्यात पौरुष्याचा माज,
मग कोवळा जीव एकेक,
त्याची भेट चढून गेला..
किती जपले तिने स्वतःला,
या विकृत जगापासून,
घरात लपलेल्या श्वापदाने,
मग तिचा जीव कुरतडून नेला..
मूक निषेध आणि मेणबत्या निव्वळ,
न्याय कुणाचा करतील काय?
आघात झालेले तना-मनावर घाव ते भरतील काय?
कुठे जावे तिने लपाया?
कुठला कृष्ण तिने भजावा?
द्रौपदीचा पदर भरसभेत,
पुन्हा दुःशासन फेडून गेला...
हर्षदा सचिन गावंड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा