Login

प्रसंगातून बोध -२

सुख म्हणजे नेमके काय?
प्र-बोध-२

शीर्षक:-सुख म्हणजे काय?

माजी विद्यार्थी मेळावा निमित्त तब्बल ३० वर्षांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांच्या एका शिक्षकांनी प्रश्न विचारला,
"आजपर्यंत तुमच्या दृष्टिकोनातून सुख म्हणजे काय हे सांगाल का?"

"माझ्यासाठी सुख म्हणजे बँकेत प्रत्येक महिन्याला येणारा माझा पगार." एकाने सांगितले.

"पुस्तक वाचतांना मिळालेला एकांत तो क्षण म्हणजे माझे खरे सुख." गृहिणी असलेली एकजण म्हणाली.

"आपण इथे सर्व एकत्र आलो आणि त्यानिमित्ताने झालेली सर्वांची भेट म्हणजेच माझ्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाहणे हे खरे सुख!" शेवटी त्यांचे शिक्षक म्हणाले.

बोध:- प्रत्येकाची सुखाची परिभाषा ही वेगळी असते.

प्र-बोधकार विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all