Login

नसता जवळी तू

न्यारी तऱ्हा
नसता जवळी तू कधी
दिसे तूच स्वप्नी फक्त
आस भेटण्याची लागे
प्रेमदेवाची मी झाली भक्त

सुखाच्या ओंजळीत पुन्हा
प्रीतफुले हळुवार फुलती
एका नजरेच्या बाणाने
अधरांच्या कळ्या खुलती

विवादाने धीर गंभीरता
काही काळ येते जरा
शांत राहून प्रश्न सोडवण्याची
राया तुझी रे न्यारीच तऱ्हा

तुझ्या अलवार स्पर्शाने
स्तिमित होऊन गोठते अंग
पाहण्यास रूप रांगडे
नयन होतात त्यात दंग

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत.

फोटो सौजन्य: साभार गुगल
0

🎭 Series Post

View all