नाती सांभाळताना भाग -1

कौटुंबिक
" वसुधा मला तरी वाटतं एकदा तु ताईशी बोलावं.. "अमित बोलतो.

" ताई शि अहो पण त्या तयार होतील का ? नाही म्हणजे उगाच गैरसमज नको त्यांनी करुन घ्यायला. "

" अगं कसा होईल गैरसमज, माझ्या बोलण्यापेक्षा तुझं ति जास्त चांगल ऐकेल. शेवटी भावजय आहेस तु तिची आणि एक स्त्री म्हणुन तु उत्तम समजुन सांगशील." अमित बोलतो.

" बरं बरं, मि पाहते बोलुन. "

ताई म्हणजे सुप्रिया अमित ची धाकटी बहीण आणि वसुधाची नणंद. दोघीं मध्ये नणंद भावजय पेक्षा एक चांगली मैत्री होती.

अचानक झालेल्या अपघातात सुप्रियाच्या नवऱ्याचा मृत्यू होतो, लग्नाला जेमतेम दोन चं वर्षे झालेली. ऑफिस च्या मिटिंगसाठी बाहेर जातो म्हणुन सांगितलं आणि अपघात झाला.

सुप्रियाला नशिबाने मुल नव्हतं, जर आज असत तर कदाचित सुप्रियाला त्याला सांभाळण मुश्किल झालं असतं.

कारण घडलेल्या प्रसंगाने सुप्रिया स्वतःला सावरू शकत नव्हती, मग त्या तान्ह्या बाळाला कोणी सांभाळलं असतं.

नवऱ्याच्या अचानक जाण्याने सुप्रिया एकटी पडली होती, आणि रोज सासरच्यांचे टोमणे दोष लावणे चालुच होते.

जास्त त्रास तिला नवऱ्याच्या जाण्याने नाही तर तिला दिला जाणाऱ्या दोषाने होतं होता.

वसुधा च्या डोक्यात सुप्रियाला कायमच घरी आणणं सुरु होतं, सव्वा महिना होऊन गेला होता.

सुप्रियाच वय ही काही जास्त नव्हतं, तिने स्वतःचा विचार करावा असं वसुधा ला वाटतं होतं.

सुप्रिया चांगली शिकली होती, शिक्षण ही तिचं उत्तमं झालं होतं. आता जॉब चा विचार करावा असं वसुधा ला वाटतं होतं, जॉब स्वतःसाठी करावा घरच्यांनसाठी नाही.

वसुधा पुन्हा पुन्हा व्यवस्थित विचार करते आणि नवऱ्याला म्हणजेच अमित ला घेऊन सुप्रियाच्या सासरी जाण्याचं ठरवते.

दारात भाऊ आणि भावजय ला पाहुन सुप्रिया आनंदी होते, पण ति उठून त्यांना गळाभेटी करू शकत नसते.

सासुचं तोंड त्या दोघांना पाहुन उतरत, कुस्क्या तोंडाने ति त्यांना आत घेते.

दोघंही आत येतात, खुर्चीवर बसतात. वसुधा सुप्रिया कडे पाहते, सुप्रियाची हालत पाहुन तिला अतिशय वाईट वाटतं. तिच्या डोळ्यांतून पाणी येतं, पण ति पदराने हळूचं डोळे फुसते.

सुप्रिया एका कोपऱ्यात जमिनीवर बसलेली असते, पोटा जवळ पाय धरून ति उघड्या कपाळाने एकटक नवऱ्याच्या फोटो कडे पाहत असते.

" काय मग आता कसं येणं केलं ? " सुप्रियाची सासु वसुधा ला विचारते.

" सव्वा महिना झाला ना, तर सुप्रियाला घ्यायला. " वसुधा हळूच आवाजात बोलायला चालु करते..

सुप्रिया हळूच वसुधा आणि अमित कडे पाहते, तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी ति सोबत येण्यास स्पष्ट नकार देत होती...

वसुधा आवंढा गिळून तिच्या जवळ बसते, तिची सासु हे ऐकुन आधी काहीच बोलतं नाही.

" काय म्हणालात, घरी घेऊन जाणार. नवरा आत्ताच गेला आहे हिचा आणि हिला घरी जायचं आहे, कशाला..? " सासुचा आवाज कणखर होता.

वसुधा शब्द जपून जपून वापरत असते, कारण तिला वसुधा ला इथुन काही केल्या कोणत्याही परिस्थिती घेऊन जायचं होतं..

वसुधा बाई म्हणुन दोघींचं दुखं समजुन घेत होती, आईने मुलगा गमावला हे दुखं मोठं होतं पण त्याहून नवरा गेल्याच दुखं त्याहून मोठं होतं.

ति शांतपणे ही परिस्थिती हाताळत होती, अमित मात्र तिला सपोर्ट देत होता.

सुप्रियाला आई वडील नव्हते, वडील लहानपणीच गेले आणि आई तिच्या लग्नाच्या दोन वर्षे आधी गेली. पण वाहिनीने तिला खुप सांभाळून घेतलं होतं, एक आई बहीण आणि मैत्रीण बणुन तिला साथ दिली होती.

आणि आता ही वसुधा तेच करत होती," ह्यात सुप्रिया काहीच म्हणाली नाही, आम्ही स्वतःहुन हिला घ्यायला आलो आहोत. आणि तसं ही सव्वा महिण्यानी घरी घेऊन जाणं, ही सुद्धा एक पद्धतच आहे ना. " वसुधा शांत पणे तिच्या सासुला समजावते.

वसुधा तिच्या सासुला आधी काहीही न सांगण्याचं ठरवते.

" आई वडील दोघे ही नाही, एक करता भाऊ म्हणुन आम्ही तिला घ्यायला आलो आहोत.. "अमित बोलतो.

" काही दिवसांचाच प्रश्न आहे, आणुन सोडु की. मि समजु शकते तुमचं दुखं, पण हिचं दुखं सुद्धा समजुन घेणं तितकंच गरजेचं आहे ना.." वसुधा बोलते.

क्रमश..

🎭 Series Post

View all