गेल्या भागात आपण पाहिले की, नेहाचा अपघात होता होता वाचतो. पुन्हा तिचे विचार चक्र सुरू होते.
आता पाहू पुढे.
आता पाहू पुढे.
त्या प्रसंगामुळे नेहा घाबरली होती. ती घरी गेली.
आईला घरी आलेली पाहून राजने विचारले,
“आई, तू लगेच आलीस? तू सामान आणायला गेली होतीस ना?”
राजच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते.
ती देवासमोर जाते, जीव वाचला म्हणून देवाचे हात जोडून आभार मानते.
राज नेहाच्या पाठीमागेच उभा होता.
“अगं आई मी तुझ्याशी बोलतो आहे, तुझं लक्ष कुठे आहे?”
“अगं आई मी तुझ्याशी बोलतो आहे, तुझं लक्ष कुठे आहे?”
“राज, आज माझा जीव वाचला.” नेहा राजकडे वळत म्हणाली.
“काय?” राजने आश्चर्याने विचारले.
“हो राज, रस्त्यावर जाताना समोरून गाडी येत होती. माझे लक्ष नव्हते. तोच एका भल्या माणसाने मला खेचले आणि बाजूला केले. त्याच्यामुळेच माझा जीव वाचला.”
“अरे बाप रे! तू बरी आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना आई?”
“देवाच्या कृपेने काहीच झाले नाही राज, माझा जीव वाचला.” नेहा.
“आई तू आराम कर. आज तू काहीच काम करू नकोस. मी बाहेरून जेवण ऑर्डर करतो.”
“ठीक आहे.”
नेहा रूममध्ये जाते.
नेहा रूममध्ये जाते.
राजला नेहाची काळजी वाटत होती.
राज संध्याकाळी नेहाला चहा बनवून देतो.
नेहा दिवसभर शांत शांत होती.
रात्री सगळे जेवून झोपी जातात.
रात्रीचे बारा वाजले होते. दरवाजावर ठक ठक ऐकू येत होती. नेहा दचकून जागी होते. तिला त्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता.
ती स्वतःला चिमटा काढून पाहत होती, स्वप्न तर नाही ना ह्याची खात्री करून घेत होती.
ते स्वप्न नव्हते, तर खरोखर तो मुलगा नेहाचे दार वाजवत होता.
नरेश आणि राजही जागे झाले होते.
“आई, यश रडतो आहे. तो दार वाजवतो आहे. मी बघतो.” राज डोळे चोळत म्हणाला.
“राज, दरवाजा नको उघडूस.” नेहा राजचा हात घट्ट पकडत म्हणाली.
“नेहा, अगं ते पोरगं जोरजोरात रडतंय, त्याला गरज असेल काहीतरी.” नरेश म्हणाला.
“तुम्हाला माहीत आहे ना? त्याच्या आईला माणसं आवडत नाही. उगाच कशाला नको ती उठाठेव.” नेहा रागात म्हणाली.
“आई, अगं तो फक्त रडत नाही, तर तो आपले दारही वाजवतो आहे.” राज म्हणाला.
“वाजवू दे आपल्याला काय करायचे?” नेहा.
“नेहा, तू अशी काय वागतेस?.” नरेश.
“मी बरोबर वागते आहे, आपल्या भल्यासाठीच बोलते आहे. आजही त्या बाईचे तोंड पाहिले आणि माझा अपघात होता होता वाचला.” नेहा.
यश जोरजोरात रडत होता. राजचा जीव वर खाली होत होता.
पुढे काय होईल?
पुढे काय होईल?
क्रमश:
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा