“आई, मला बघू तरी दे तो काय म्हणतोय, त्याला आपली गरज असेल.” राज अगदी काकुळतीला येत म्हणाला.
“मी अजिबात दार उघडू देणार नाही म्हणजे नाही.” नेहा कडक आवाजात म्हणाली.
“नेहा, तुला समजतंय का तू किती विचित्र वागते आहेस? तू अगदी भ्रमिष्ट झाल्यासारखी वागते आहेस.” नरेश आवाज चढवत म्हणाला.
“हो झाली आहे मी भ्रमिष्ट, तुम्हाला काय विचार करायचा तो करा. काहीही झाले तरी मी दार उघडू देणार नाही.” नेहा दारा समोर हाताची घडी घालत म्हणाली.
“हो झाली आहे मी भ्रमिष्ट, तुम्हाला काय विचार करायचा तो करा. काहीही झाले तरी मी दार उघडू देणार नाही.” नेहा दारा समोर हाताची घडी घालत म्हणाली.
तोच बेल वाजते. वॉचमन जोरजोरात हाका मारत होता.
“आई, आता तरी उघडू दे दार.” राज म्हणाला.
नेहाने विचार केला, वॉचमन आहे म्हणजे काही जास्त भीती नाही.
“ठीक आहे, उघड दार.”
“ठीक आहे, उघड दार.”
राजने दार उघडले तसे, यश त्याला बिलगला आणि म्हणाला,
“माझी आई रडते आहे. खूप रडते आहे. लवकर चल ना दादा.”
“माझी आई रडते आहे. खूप रडते आहे. लवकर चल ना दादा.”
राजने वॉचमनकडे पाहिले.
“साहेब, आपल्याला ताबडतोब दवाखान्यात जावे लागेल. ह्या बाजूच्या मॅडमच्या छातीत खूप दुखते आहे. त्या वेदनेने तडफडत आहेत.” वॉचमन एका दमात बोलून गेला.
“साहेब, आपल्याला ताबडतोब दवाखान्यात जावे लागेल. ह्या बाजूच्या मॅडमच्या छातीत खूप दुखते आहे. त्या वेदनेने तडफडत आहेत.” वॉचमन एका दमात बोलून गेला.
“ठीक आहे.” नरेश म्हणाला.
“मॅडम, तुम्ही पण चला. त्यांच्यासोबत बाई माणूस असेल तर बरं होईल.” वॉचमन नेहाकडे बघत म्हणाला.
तिच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. नेहा देखील लगेच तयार झाली.
“राज, तू यश बरोबर थांब मी आणि बाबा जातो.” नेहा म्हणाली.
नेहा आणि नरेश तिच्या रूममध्ये गेले.
खरंच तिला खूप त्रास होत होता.
तिला पाहून नेहाला खूप दया आली. नेहाने तिचा हात पकडला आणि गाडीत बसवले. काही वेळात सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
डॉक्टरांनी तिला तपासले असता कळाले की तिला अटॅक आला आहे.
डॉक्टरांनी उपचार सुरू केले.
डॉक्टरांनी उपचार सुरू केले.
नेहा तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती.
तिला मनोमन स्वतःच्या वागण्याचा रागही येत होता,
‘केव्हाचा यश दरवाजा वाजवत होता आणि मी राजला दरवाजा उघडण्यासाठी मना करत होते.’
नरेशला नेहाची अवस्था कळत होती.
“नरेश, मी अशी कठोर कशी वागू शकते? तिला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.” नेहा रडक्या स्वरात म्हणाली.
“नरेश, मी अशी कठोर कशी वागू शकते? तिला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.” नेहा रडक्या स्वरात म्हणाली.
“नेहा, शांत हो. होतील त्या ठीक. फक्त एकच सांगेन आता तरी डोक्यातून ते सारे विचार काढून टाक.”
डॉक्टर बाहेर आले.
डॉक्टरांना पाहताच नेहा लगबगीने त्यांच्या जवळ गेली.
नेहाचे हृदय जोरजोरात धडधडत होते.
नेहाचे हृदय जोरजोरात धडधडत होते.
क्रमश:
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा