प्रेमाचा क्षत्रू कोण..? भाग -1

नक्की प्रेमाचा क्षत्रू कोण..?
" काय गं मीने अशी एकटीच काय खुश होते आहेस त्या मोबाईल मध्ये पाहुन. " अंतरा विचारते.

अंतरा आणि मीना ऑफिस च्या चांगल्या मैत्रिणीं, गेले दोन वर्षे त्या एकमेकींना चांगल्या ओळखतात.

" काही नाही गं, हा बघ अजित आणि माझा फोटो. " ति मोबाईल मधला फोटो अंतराला दाखवते.

फोटो पाहुन अंतराचा चेहरा पडतो.
" हा कधी काढला..? " अंतरा विचारते.

" अगं तुला म्हटलेलं ना आपल्या ऑफिस ची मागच्या महिन्यात ट्रिप गेली होती, तेव्हा काढला. छान आहे ना..? तुच नव्हती आली, अजित आणि मि फार मजा केली. " ति ऑफिस चे अनेक फोटो अंतराला दाखवते.

" हा अगं माझ्या घरी तुला माहित आहे ना, त्यामुळे नाही जमलं. " अंतरा बोलते.

तेवढ्यात अजित येतो, तो सरळ मीना च्या डेस्कजवळ जातो, " काय गॉसिप चालल्या आहेत दोघींच्या..? "

" अरे ति मीना फोटो दाखवत होती..!" अंतरा बोलायला जाणार तेवढ्यात मीना तिला मध्येच थांबवते.

" फोटो अरे वाह कोणाचे..? बघु.. " अजित फोटो पहायला मागतो.

मीना मोबाईल पाठी खेचते, " अरे काही नाही फॅमिली फंकशन बाकी काही नाही.. बरं चल मला खुप काम आहे. आपण नंतर बोलुया .. " आणि मीना विषय टाळते.

अजित निघुन जातो, अंतराला मीनाच्या वागण्याचं नवल वाटतं, " अगं तु फोटो दाखवायला का नाही म्हणालीस..? इतकं काय आहे त्या फोटोत..? "

" अगं काही नाही, सहज. " आणि मीना विषय टाळते.

मीना ला अजित बद्दल आकर्षण वाटतं, ति हळू हळू त्याच्यावर प्रेम करू लागते. म्हणुन तिने अजित सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचे फोटो काढते.

संध्याकाळ होते, अंतरा आणि मीना चं ऑफिस सुटतं.
अंतराला मीनाच सकाळ चं वागणं जरा सौंशयास्पद वाटतं, म्हणुन ति न राहुन पुन्हा तिला विचारते.

" मीने अगं तु अजित ला सकाळी का टाळलंस..? अगं ट्रिप चे फोटो मग तु त्याला नाही का म्हणालीस..? " अंतरा विचारते.

तेवढ्यात पाठून अजित बाईक घेऊन येतो, आणि त्यांना पाहुन बाईक थंबवतो.

" चला मग सोडु का..? " अजित विचारतो.

" हो.. चालेल की.. " मीना पटकन बोलते, आणि त्याच्या बाईक वर पाठी जाऊन बसते.

" अगं.. तु.. तु कुठे..? "

" अरे मला सोड की निदान स्टेशन तरी, मग मि जाईन माझी माझी ट्रेन ने. " मीना बोलते.

तो अंतरा कडे पाहतो, " नाही मि माझी रिक्षा ने जाईन, तु मीने ला सोड. " आणि ति रिक्षा थांबवते आणि बसुन घराकडे निघते.

रात्र होते अंतरा मोबाईल वर थोडा टाईमपास करत असताना, तिला अजित चा कॉल येतो. ति कॉल घेते, " आता ह्या वेळेला कसा केलास कॉल..?"

" तुला इतक्या रात्री कॉल करुन त्रास तर नाही ना दिला..? " अजित विचारतो.

" नाही रे, त्यात काय! मि सुद्धा काही महत्वाचं कामं नव्हती करत. पण आता कसा कॉल केलास..? काही महत्वाचं आहे का..? " अंतरा विचारते.

" तुला बाईक वर बसायला सांगितलेलं पण तु नाही बसलीस.. " अजित विचारतो.

" अरे त्यात काय झालं, आणि मीनेला बसायचं होतं तर मि तिला नाही कसं बोलणार..? शेवटी ति आपलीच मैत्रीण आहे ना.. " अंतरा त्याला समजावते...

हे ऐकुन अजित शांत बसतो, काही मिनिटे तो काहीच बोलतं नाही. फोन वरची शांतता बरंच काही सांगुण जात होती, पण दोघांनाही ते कळत नव्हते..

" काय रे काय झालं..? असा शांत का झालास..? "

" मला तुझं हे उत्तर येणार हे माहित होतं.. " अजित बोलतो.

" म्हणजे..? " अंतराला तो काय बोलतोय हे कळत नव्हतं..

बराच वेळ गोष्टी झाल्या नंतर, अजित फोन ठेवतो.

सकाळ होते अंतरा ऑफिसला पोहचते, ऑफिस आल्या आल्या मीना तिला मिठी मारते. ति फारच खुश दिसते, " अगं झालं तरी काय..? इतकी खुश आहेस ति, लग्न वगरे ठरलं की काय..? " अंतरा खांद्यावरची बॅग बाजुला ठेवते.

" छे गं लग्न वगरे काही नाही, मला ना तुला काही तरी सांगायचं आहे. पण आता नाही लंचला.. " मीनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते, कदाचित अंतराच्या मनातील शंका खरी होणार होती.

ति मीनाला दुखावू शकत नव्हती, " अरे वाह म्हणजे नक्कीच काही तरी झालंय.. " अंतरा बोलते.

"हो असं समज मि माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय तुला सांगणार आहे.. " मीना बोलते.

" खरंच.. मि तुझ्या निर्णयावर खुश असेन.. बरं चल आता कामाला लाग, नाही तर बॉस येऊन चांगलाच ओरडेल. " आणि दोघी हि कामाला लागतात.


क्रमश...

🎭 Series Post

View all