सुट्टीचे दिवस संपले, रिया आणि श्रेयस परत जाण्यासाठी निघाले. श्र्वेता आणि सारंग मात्र अजून काही दिवस राहू म्हणून थांबले. शामलने श्रेयस आणि रियाला सोबत टिफीन दिला. श्रेयस मुंबईला आणि रिया ह्यावेळेस काही कामा निमित्त मुंबई ला न जाता पुण्यास जायला निघाली.
जाताना श्रेयस शामलच्या पाया पडला, शामलला वाटले काल श्रेयसची जी कान उघाडणी केली आहे, त्यामुळे तो आता त्याच्या बाबांशी बोलेल, कमीतकमी जाताना येतो बाबा अस तरी म्हणेल, पण तसं काहीच झालं नाही.
तो गाडीत बसून निघून गेला, आणि विलासराव त्याच्या गाडीकडे ती दिसेनाशी होईपर्यंत बघत होते. शामल विलासरावांना बघत होती, त्यांच्या डोळ्यातलं पाणी तिच्यापासून लपले नव्हते.
शामल पण विचारात होती, अस का वागला आता हा? असा विचार करत ती घरात निघून गेली. श्र्वेता पण तीच्या मागोमाग गेली.
सारंग आजोबां सोबत झुल्यात बसला.
श्र्वेता: आई...
श्र्वेताने शामलला मागून हाक मारली.
शामल: काय ग काय म्हणतेस?
श्र्वेता: काल जे काही झालं त्यावरून अस वाटत होतं की श्रेयस आता बाबांशी बोलेल..पण.....
पण तसं काहीच झाल नाही.
शामल: खर सांगू मी पण हाच विचार करते आहे. असा का वागला असेल हा?
श्र्वेता: म्हणजे तुम्हाला पण नाही माहीत की काय कारण असेल...!
शामल: खरं सांगायचं तर नाही माहीत, मलाच तर प्रश्न पडलाय.
श्र्वेता: मग आता...?
काहीतरी विचार करून शामल म्हणाली...
शामल: हे बघ कस असतं ना, नाही म्हंटल तरी घाव जुना आहे, भरायला वेळ द्यायला हवा, आणि माणसाचा अहंकार पण त्याला वाकू देत नाही कदाचित असच काहीसं झालं असेल श्रेयसचे. वाट बघू जरा.
श्र्वेता: हो कदाचित असच असेल काही. नाहीतर मी बोलू का त्याच्याशी? विचारू का त्याला घरी पोहोचला की?
शामल: नाही, आता बोलणं बरोबर नाही, त्याला त्याचा विचार करूदेत. वाटलं तर काही दिवसांनी बोलू आपण, पण अता लगेच बोलणं योग्य नाही होणार.
श्र्वेता: हो ते पण आहे, ठीक आहे वाटच बघू आपण.
Hope for the best...
अस म्हणत दोघी पण स्वयंपाक घरात गेल्या.
पणडोक्यात तेच विचार चालू होते.
तिकडे श्रेयस मुंबईच्या दिशेने निघाला. पण त्याच्या ही डोक्यात विचारांचे काहूर होते.
तो स्वतःशीच बोलत होता...
मी अस कस वागलो सारंगशी? मला कसं समजलं नाही?
अस कस करू शकतो मी...?
अस वागून पुन्हा इतिहासाची पुनरावृत्तीच झाली असती, परत एक विलासराव आणि श्रेयस तयार झाले असते.
विलासरवांच्या आठवणीने त्याच्या मनात त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला.
बाबा पण कदाचित अशाच काही परिस्थीतीत असतील...
नाही म्हटलं तरी डॉक्टर म्हणजे खूप जबाबदारी आणि जोखीम असलेलं काम असतं.
मग आईने मला समजावल तसं त्यांना नसेल का समजावलं? नक्कीच असेल...
असेल तर मग तरी ते असे का वागत राहिले. ? असे अनेक प्रश्न त्याला पडत होते.
भूतकाळातील घटना त्याच्या डोळ्यासमोर फिरत होत्या....
त्याची गाडी १२० की. मि च्या स्पीड ने चालत होती..
डोक्यात विचारांनी थैमान घातले होते. काय चूक काय बरोबर कळत नव्हते.
दुपारची वेळ होती त्यामुळे रस्ता तसा मोकळा होता...
एक गाय रस्त्याच्या मधोमध उभी होती, पण त्याला विचारात ती दिसलीच नाही, अगदी जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आले की गाय उभी आहे समोर, त्यानी कच्चकन ब्रेक लावला. सुदैवाने काही दुर्घटना झाली नाही.
श्रेयस एकदम भानावर आला. पण भूतकाळातील एक घटना सर्रकन त्याच्या डोळ्यासमोर आली आणि त्याच्या अंगात चिर करून गेली, अंगाचा थरकाप होत होता... त्याला काही सुचत नव्हते, तितक्यात त्याला समोरच एक पेट्रोल पंप दिसला, त्यानी कशीबाशी गाडी तिथे नेली.
श्रेयसनी तिथे गाडी पार्क केली.. आणि खाली उतरला, त्याला घाम फुटून निघाला होता, त्यामुळे त्याचा शर्ट पूर्ण ओला झाला होता, पाय लटलटत होते.
त्यांनी गाडीतून एक पाण्याची बाटली काढली आणि गटागट पित होता, त्यामुळे त्याचा शर्ट अजूनच ओला झाला, त्यानी त्याच पाण्यानी तोंडावर ५-६ शिपके मारले.
थोड्यावेळ बाहेर उभा राहून, तो परत गाडीत जाऊन बसला. गाडीचा A/C लावला आणि डोळे बंद केले.
तो शांत होण्याचा प्रयत्न करत होता.
थोडावळ असाच गेला, मग त्याला बरे वाटू लागले, त्यांनी ठरवले की आता कसलाही विचार न करता गाडी सरळ त्याच्या मुंबई च्या घरी नेऊन थांबवायची.
त्यांनी गाडी सुरू केली, गाणें लावलें आणि परत पुढच्या प्रवासासाठी निघाला.
सुमारे तीन तासांनी तो घरी पोहोचला. त्यांनी लगेच श्र्वेताला फोन करून, सुखरूप पोहोचल्याचे सांगितले. . आईला सांग काळजी करू नकोस. असे ही सांगितले.
पण घडलेला प्रकार कोणालाच सांगितला नाही, उगाच काळजी करतील सगळे म्हणून नकोच सांगायला अस त्यानी ठरवलं.
श्र्वेताने शामलला श्रेयस चा निरोप दिला.
श्रेयसने रात्रीचे जेवणं केले, शामल ने दिलेला टिफीन संपवला. आता तो टीव्ही बघत होता पण त्याच मन काही रमत नव्हतं टीव्ही बघण्यात, मग तो झोपायला गेला पण त्याला झोप काही येत नव्हती, बराच वेळ तो असाच जागीच होता, राहून राहून डोक्यात विचार येत होते, शेवटी केव्हातरी उशिरा त्याला झोप लागली....
क्रमशः