Login

चूक कोणाची भाग ६

श्र्वेता विचार करत होती, तिने शामलला विचारण्या मागचा उद्देश हाच होता की, भूतकाळातील घटनान मधून

तिकडून ती व्यक्ती हॅलो हॅलो करत होती, शामल व विलासराव श्र्वेताला आवाज देत होते.

पण तिला काही सुचत नव्हतं...

फोन अजूनही सुरूच आहे हे लक्षात आल्यावर शामलने फोन उचलला...

शामल: हॅलो, कोण बोलतंय?

दुसरा आवाज एकून बोलणारी व्यक्ती श्रेयसची आई असावी असा अंदाज लावत प्रसाद बोलू लागला...

प्रसाद: काकू मी श्रेयसचा मित्र प्रसाद बोलतोय, त्याच्याच ऑफिस मध्ये कामाला आहे.

तुम्ही सगळे लवकर मुंबईला या, श्रेयसचा ॲक्सिडेंत झाला आहे. आम्ही त्याला जवळच्या हॉस्पिटलला घेऊन जातोय.

शामलच्या पायाखालची जमीनच सरकली, पण तिने लगेच स्वतः ला सावरलं.

शामल: जास्त लागलय का?

कोणत्या हॉस्पिटलला घेऊन जाताय?

प्रसाद: हो तसं बरच लागलय, इथे जवळच आहे एक हॉस्पिटल तिथे घेऊंनजातोय.

शामल: तू एक काम कर मी तुला सांगते त्या हॉस्पिटलला त्याला घेऊंनजा, बाकी मी बघते सगळं.

प्रसाद: पण काकू?

शामल: अरे ते पण जवळच आहे हॉस्पिटल, त्याच्या बहिणीचे आहे, त्यामुळे त्याला तिथेच ने.

शामलने प्रसादला हॉस्पिटलचे नाव व पत्ता सांगितला.

प्रसाद:. ठीक आहे आम्ही जातो तिथेच, तुम्ही पण या, तोपर्यंत आम्ही त्याच्याजवळ राहू. काळजी करू नका, वाटेल त्याला बरं.

असा म्हणत दोघांनी पण फोन ठेवला.

शामल ने लगेच रियाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

रियाचे हॉस्पिटल म्हणजे विलासरवांचे हॉस्पिटल, विलासराव मुंबईतच होते पण आता काही वर्षांपासून हॉस्पिटल रिया आणि अमेयच्या हवाले करून नाशिकला स्थाईक झाले.

विलासराव पण एकत होते. त्यांना ही सुचेनासे झाले होते पण श्र्वेता साठी हिमतीने काम करणे गरजेचे होते.

विलासराव आणि शामलने, श्र्वेताला समजाऊन हिम्मत दिली.

आणि लगेच सगळे मुंबईच्या दिशेने निघाले. विलासराव गाडी चालवत होते, शामल श्र्वेताला धीर देत, सारंगला पण सांभाळत होत्या, मधून मधून रियाशी बोलणे चालूच होते.

दुसरीकडे, प्रसादने विकासला म्हणजे त्यांच्या दुसऱ्या मित्राला, सांगितलेल्या प्त्यावर गाडी वळवायला सांगितले.

श्रेयस च्या डोक्यातून खूप रक्त येत होत, म्हणून प्रसाद ने त्याच्या डोक्यावर रुमाल घट्ट पकडुन ठेवला होता. पण तो सुधा पूर्ण रक्तानी ओला झाला होता, प्रसाद च शर्ट पण रक्तानी भिजला होता, कारच्या मागच्या सीट वर पण रक्त सांडत होत. प्रसाद आणि विकास सतत श्रेयसला आवाज देऊन उठवायचा प्रयत्न करत होते. एकंदरीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता.

शेवटी साधारण १५ मिनिटांनी ते श्रेयसला घेऊन रियाच्या हॉस्पिटलला पोहोचले.

रिया आणि अमेय आधीच सर्व तयारीत त्यांची वाट बघत होते. त्यांनी लगेच त्याला स्ट्रेचर वर टाकून तपासणी साठी आत नेले.

श्रेयसच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता, त्याचे डोक्यात काहीतरी रुतल होत हे त्यांच्या लक्षात आले, आणि त्यासाठी ऑपरेशन करावे लागणार होते. रिया बहीण असल्यामुळे सगळ्या formalities अगदी लगेच झाल्यात. आणि त्याला ओटी मध्ये नेण्यात आले.

त्याधी रीयाने शामलला फोन करून सांगितले.

इकडे शामल विलासराव आणि श्र्वेता यांचा जीव टांगणीला लागला होता. कसाबसा प्रवास पूर्ण करून साधारण 4 तासात ते हॉस्पिटलला पोहोचले.

रिया समोरच होती, श्र्वेता तिला बघून धावतच तिच्या कडे गेली.

श्र्वेता: रिया कसा आहे ग श्रेयस?

कुठे आहे तो...?

मला घेऊन चल त्याच्या कडे...

श्र्वेता रडत होती.

रिया तिला शांत करत म्हणाली...

रिया: श्र्वेता, आई बाबा काळजी करू नका, धोका टळला आहे, पण तो अजून शुध्दीवर नाही, शुद्ध यायला वेळ लागेल थोडा. मी घेऊन जाते तुम्हाला पण दुरूनच बघा त्याला. सध्या ICU मध्येच आहे तो, शुध्दीवर आला की मग शिफ्ट करू.

सगळ्यांनी त्याला काचेतून बघितलं. आणि इतक्यावेळ आवरून ठेवलेलं शामल आणि विलासरावांचे अश्रू घळाघळा, बाहेर आले.

रियानी त्यांना सावरलं.

प्रसाद आणि विकास तिथेच बसलेले होते, ते पण त्यांच्या जवळ आले.

रियांने सांगितलं की ह्यांनीच श्रेयसला आणले हॉस्पिटलला.

तसं विलासराव आणि शामलने हाथ जोडून त्यांचे आभार मानले. त्यांच्या कडे बघूनच लक्षात येत होतं की कशा परिस्थितीत त्यांनी श्रेयसला आणले होते.

प्रसाद आणि विकास: अहो काका काकू अस हात नका जोडू, आम्ही आमचं कर्तव्य केलं, आमचा पण मित्र आहे तो.

विलासराव: खूप उपकार केलेत तुम्ही मुलांनो.

पण हे सगळं झालं कसं?

प्रसाद: आम्ही ऑफिसमध्ये काम करत होतो. लंच ब्रेक नंतर एक मीटिंग होती 8th floor ला, त्यासाठी आम्हाला तिघांना पण जायचं होत. पण आज श्रेयस बोलला की लिफ्टनी न जाता आपण stair’s नी जाऊ, तसं आम्ही खाली उतरू लागलो, श्रेयस आमच्या 2-३ पायऱ्या पुढे होता, आणि मोबाईल मध्ये काहीतरी वाचत होता तितक्यात त्याचा पाय घासरला आणि तो घरंगळत गेला, भिंतीच्या साईड ने होता त्यामुळे रेलिंगला पण पकडता नाही आलं त्याला, आम्हाला कळायच्या आत तो शेवच्या पायरीवर पडला, त्यावेळेस तिथे ठेवलेल्या पॉट वर त्याचा डोकं आदळले, आणि...हे सगळं घडलं.

Ambulance ची वाट बघण्यात उशीर झाला असता म्हणून कार मधूनच घेऊन आलो त्याला.

शामल: पण पाय कसा काय घसरला त्याचा?

प्रसाद: तिथे पाणी सांडलेले होते ते दिसलेच नाही त्याला.

शामल आणि विलासराव रिया कडे बघत होते.

रिया: त्या पॉटचा तुकडा त्याच्या डोक्यात रुतला म्हणून खूप बल्डींग होत होत.. ब्लड द्याव लागलं त्याला. तो तुकडा ऑपरेट करून काढावा लागला...पण जास्त खोल नव्हता त्यामुळे मेंदूला काही इजा झाली नाही, आणि पायाला पण फ्रॅक्चर झालं आहे, पण ह्या दोघांनी वेळेत आणले नसते तर....

असं म्हणत रिया थांबली ..

सगळ्यांनाच कळत होतं की तिला काय म्हणायचंय.

प्रसाद आणि विकास त्यांचा निरोप घेऊन निघाले, आणि काही लागलं तर कॉल करा असं सांगितलं.

थोड्यावेळाने श्रेयस शुध्दीवर आला.

त्याला बघून सगळेच खुश झाले.

त्याचे मित्र पण त्याला भेटायला येत.

अजून 3-4 दिवसांनी डिस्चार्ज घेऊन घरी गेला.

त्याला नाशिकला घेऊन आले विलासराव आणि शामल.

श्रेयसला ऑफिस ने 1 महिण्याची सुट्टी दिली होती.

श्रेयस बेड वर झोपलेला होता.

त्याची प्रकृती चांगलीच सुधारत होती. आता नॉर्मल बोलत, खात होता.

विलासराव दुरूनच त्याच्या तब्बेतीचा अहवाल घेत. बारीक नजर होती त्यांची त्याच्या हालचालींवर.

डॉक्टर असल्यामुळे त्यांना सहज कळत होती त्याची प्रगती.

श्र्वेता काहीतरी विचार करून शामलला बोलली...

श्र्वेता: आई बाबा त्यादिवशी असं का बोलले की तुमचं नुकसान झालं?

शामल: अगं, माझं लग्न झालं तेव्हा आमची परिस्थिती बेताचीच होती, पण दोघांच्या मेहनतीने आम्ही २-३ वर्षात छान प्रगती केली, नंतर आम्हाला मुलं झाली, काही वर्ष सगळं छान चालू होतं. माझी practice पण सुरू होती, पण त्या घटनेने सगळ बदललं, मग मुलांना कमीत कमी एकाचा तरी वेळ मिळावा म्हणून मी प्रॅक्टिस बंद केली. मग मुलं मोठी झाली तेव्हा अधून मधून जाऊ लागले हॉस्पिटलला.

म्हणून त्यांना असं वाटत की माझं नुकसान झाल. पण हा निर्णय सर्वस्वी माझा होता. मी त्यांना त्याचा दोष नाही देत, पण ते स्वतः ला अपराधी मानतात.


 

श्र्वेता विचार करत होती, तिने शामलला विचारण्या मागचा उद्देश हाच होता की, भूतकाळातील घटनान मधून काही सापडतेय का की ज्यामुळे श्रेयस आणि विलासराव ह्यांच्यातला दुरावा कमी होईल.

तिला प्रयत्न करायचे होते की ज्यामुळे घराला पूर्ण पण यायला मदत होईल. ती कड्या जुळवयचा प्रयत्न करत होती.

श्रेयस ची तब्बेत पण बरी होत होती, डोक्याचा घाव भरत होता, पायाचे प्लास्टर मात्र होते.

शामल आणि सगळेच त्याची खूप काळजी घेत. रिया पण फोन करत असे.

असेच साधारण 20 दिवस गेले.

श्र्वेता अजून पण काही सुचतका जेणेकरून सगळं छान होईल असा विचार करत होती. कारण विलासरावांशी, श्रेयसचे वागणं काही बदलले नव्हते.

शामल पण विचारातच होती...

श्र्वेता: आई विचारायचं का श्रेयसला?

शामल: नको इतक्यात अजून, बरा वाटलं की विचारू आपण.

क्रमशः

प्रिय वाचक मित्रांनो,

पुढील भाग कदाचित थोडा मोठा असेल, कारण हा भाग अंतिम आणि निर्णयात्मक असेल.

तुम्ही विचार करत असाल की इतक्यात का संपते आहे कथामलिका...?

मी अजून लांबऊशकते ही कथामालिका, पण मला अस वाटत की, नात्यांमधील गुंता लवकर सुटावा, मग तो कथामालिकेतील असो वां खऱ्या जीवनातील.

ही कथामालिका मी व्ह्यूज मिळावे म्हणून नाही लिहितेय. माझा उद्देश हा आहे की, प्रत्येकानी समोरच्याला एक संधी द्यावी बोलण्याची ... बोलून प्रश्न सोडवण्याचा एकतरी प्रामाणिक प्रयत्न करावा.

आपण सगळेच समंजस आहोत पण कधी आपला राग, तरी कधी अहंकार आपल्याला सूचुदेत नाही. ह्या कथेतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न करतेय की संधी द्या, स्वतः ला, समोरच्याला.

ह्या कथामालिके द्वारे जर एका जरी नात्यातला गुंता सुटला किंवा, कोणी तो सोडवण्याचा प्रयत्न केला, स्वतः साठी किंवा दुसऱ्यासाठी, तरी मी समजेल की माझ्या कथेचे सार्थक झाले.

तुमची दाद माझ्यासाठी मोलाची आहे. कमेंट करायला विसरू नका.

धन्यवाद