तिचा पगार हक्क कुणाचा..?
भाग -3 अंतिम भाग..
ती किचन मध्ये येते, तिला स्वतःला ऑफिस ला आणि साक्षीला शाळेत जायची तयारी करायची असते..
ती निघायच्या गडबडीत असते, तेवढ्यात चेतन ला जाग येते.
ती त्याच्या पुढ्यात काही न बोलता लिंबू पाणी आणुन ठेवते, " डोकं जड झालं असेल पियुन घे.. " आणि ती साक्षीला उठवायला बेडरूम मध्ये जाते...
काही वेळाने, साक्षी आणि ती नाश्ता करायला बसतात, " मम्मा अगं स्कुल ची फी भरायची आहे आज.. " साक्षी तिला आठवण करुन देते..
" अरे देवा.. हो की.. टीचर ला सांग आज मम्मा येईल फी घेऊन.. " मुक्ता बोलते..
चेतन हे ऐकतो," म्हणजे आज पगार येणार आहे तर.. इथे नवऱ्याकडे एक रुपया नाही.. त्याचा विचार नाही कोणाला.. " चेतन तिला टोमन्याने सुनावतो.. पण मुक्ता त्याच्या कडे दुर्लक्ष करते..
" मम्मा...!" साक्षी जरा घाबरतचं मुक्ताला आवाज देते.
काही वेळाने मुक्ता, साक्षीला घेऊन स्कुल ला जायला निघते.
चेतन मुक्ताला थांबवतो, " मला ऑफिस ला जायचंय, काही पैसे असतील तर दे... " चेतन तिच्या कडे पैसे मागतो.
" सॉरी नाही ये माझ्याकडे.. " मुक्ता त्याला पैसे द्यायला साफ नकार देते.
" नाहीये म्हणजे..? काल पर्यँत तर तुझ्या कडे होते. काल तर गेलेली ना बाहेर फिरायला, मग आता का नाही.? " चेतन मुक्ताचं उत्तर ऐकुन तिच्यावर भडकतो..
" मम्मा चल ना उशीर होतोय.. " साक्षी बोलते.
" मि तुला उत्तर देणं गरजेचं नाही समजत.. " मुक्ता त्याला ठणकावून सांगते.
आणि साक्षीला ला घेऊन निघते.
दुपार होते, मुक्ताला ऑफिस ला जायच मन होतं नाही म्हणुन ती साक्षीला स्कुल ला सोडुन घरी येते.
चावीने दरवाजा उघडते, सोफ्यावर चेतन बसलेला असतो.
" हे काय ऑफिस ला नाही गेलास..? " मुक्ता त्याला प्रश्न करते.
तरी चेतन च्या तोंडून उत्तर येतं नाही, " मि तुला काही तरी विचारलं आहे चेतन..?" पुन्हा मुक्ता त्याला विचारते.
" नविन असल्या सारखी प्रश्न का विचारते.. तुला सकाळीच सांगितलं ना माझ्याकडे ऑफिस जायला पैसे नाही करुन.. मग पुन्हा पुन्हा तेच तेच का विचारते.. " चेतन बोलतो.
" पैसे नाही तर त्याला मि काय करू, पैसे उधळण्यापेक्षा ते जमवून ठेवायचे.. आणि तस ही तुझ्याकडे दारू पिण्यासाठी पैसे असतात, मग ऑफिस ला जायला का नाही..? " मुक्ता त्याला उलट विचारते..
" मि काय करायचं काय नाही हे तु नको सांगु मला.. तु जातेस ना जॉब ला..? मग पगार तर झाला असेल आज, मग दे पैसे मला.. " चेतन चं हे बोलणं ऐकुन मुक्ताचा रागाचा पारा वाढतो..
" माझा पगार त्यावर तुझा डोळा का..? तुझ्या सारखं नाही माझं, मला घर चालवायचं असत. माझ्यावर माझ्या मुलीची साक्षीची जबाबदारी आहे, तिचं शिक्षण सारं काही पाहायचं असत मला.." मुक्ता त्याला खडेबोल सुनावते.
पण त्याचा त्याच्यावर काहीच उपयोग होतं नव्हता..
" तुला काय म्हणायचं आहे, मि जबाबदारी घेतली नाही..? जे काय आहे ते तुच केलस..? " चेतन तिला विचारतो.
" हो तु कधी बाप म्हणुन जबाबदारीने वागलास का..? तुला साक्षीची फी तरी किती आहे, हे तरी माहित आहे का..? नाही ना.. " मुक्ता त्याला विचारते..
" ये बाई ग्यान देऊ नकोस, आणि ठेव तुझा पवार तुझ्याकडे.. " चेतन बोलतो..
" माझ्या पगारावर फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा हक्क आहे, तु गेलास तरी चालेल.. " मुक्ता बोलते..
आणि रागाने बेडरूम मध्ये जाऊन दार लावुन घेते..
आणि रागाने बेडरूम मध्ये जाऊन दार लावुन घेते..
स्त्री कितीही कमवत असली तरी तिला स्वतःच्या मनाने खर्च करण्याचा अधिकार नसतो.. तिच्या पगारात तिला अनेक गोष्टी निभावुन न्ह्यायच्या असतात.. घरची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते.. पुरुष कमावतो, जबाबदारी पण घेतो. पण आज ही काही ठिकाणी बायका घर सौंसाराची जबाबदारी घेताना दिसत आहे..
समाप्त..