Login

तिचा पगार हक्क कुणाचा..? भाग -1

कौटुंबिक कथा
तिचा पगार हक्क कुणाचा.. भाग -1

कथा काल्पनिक असुन त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही..

"मुक्ता अगं इतकी टेन्शन मध्ये का आहेस..? " मुक्ताची ऑफिस ची मैत्रीण आशा तिला विचारते..

" काही नाही गं, तुला तर माहिती आहे ना पगाराचा विषय आला की चेतन कसा वागतो ते.. मला तर बाई काहीचं सुचत नाही आहे. " मुक्ता मनातली काळजी आशाला बोलावून दाखवते.

" ह्म्म्म ते तर आहेच.. नवऱ्याने किती ही कमावल तरी आपण त्याच्या कडे मागु नये.. पण त्याने मात्र आपल्या पगारावर, आपल्या कमाईवर हक्क तेवढा दाखवायचा.. " आशा बोलते.

" त्याला फक्त नुसतं रोज दारू च्या नशेत यायचं, आहे नाही तेवढा पैसा दारूपाठी उधळत बसायचा.. इतकं मात्र करता येतं... " मुक्ता बोलते.

मुक्ता मनातल्या साऱ्या गोष्टी आशा जवळ बोलावुन दाखवत होती, आशा तिची खास मैत्रीण.. मुक्ता किती ही काळजीत असली तरी ती आशा जवळ स्वतःच मन मोकळ करत होती.

संध्याकाळ होते मुक्ता थकून भागुन घरी येते, आणि सोफ्यावर बसते..

ती आज फार थकलेली असते, " आलीस.. थकलेली दिसते फार... " चेतन तिचा नवरा तिची विचारपूस करतो..

तिला आश्चर्य वाटतं, " हे काय इतक्यात घरी आलास..? " ती घड्याळात पाहते.. घड्याळात संध्याकाळचे सात वाजलेले असतात..

" हो.. घरी आलो तर काही प्रॉब्लेम आहे का तुला..? लगेच झाला का त्रास..? " चेतन मुक्ताशी वाकड्यात बोलतो..

" छे बाई मला कशाला काही होईल त्रास, तुला लवकर पाहुन मि सहज विचारलं.. " मुक्ता बोलते.

आणि ती किचनमध्ये पाणी प्यायला जाते, इथे चेतन तिच्या बॅग मध्ये काही तरी रापत असतो..

तेवढ्यात ती बाहेर येते, चेतन ला बॅग मध्ये रापताना पाहुन ती त्याच्यावर भडकते, " हे काय.. बॅग मध्ये काय शोधतोयस..? " आणि ती बॅग त्याच्या हातुन काढून घेते..

" पैसे.. आणि काय शोधणार.. " चेतन तिला वाकड्यात उत्तर देतो...

" कसले पैसे...? आणि माझ्या बॅग मध्ये कशाला शोधतो आहेस..? जॉब ला जातोस पगार तर होतो ना.. मग ठेवायचे शिल्लक.. आल्या आल्या उडवायचे नाही.. " मुक्ताचा रागाचा पारा चढलेला असतो..

" ये बाई,, तुला नसेल द्यायचे तर तसे सांग.. उगाच फुकटच ग्यान मला नको देऊस.." आणि चेतन चप्पल घालुन घराच्या बाहेर निघुन जातो.

तेवढ्यात मुक्ताच लक्ष तिच्या मुलीवर म्हणजे साक्षी वर जातं, साक्षी फार घाबरलेली दिसते..

मुक्ता तिला पाहुन शांत होते, ती साक्षीला जवळ घेते, " काय गं काय झालं..? इतकी घाबरली का आहेस..? " मुक्ता विचारते.

साक्षी तिला गच्च मिठी मारते, मुक्ता कसं बस तिला शांत करते...

" मम्मा तु आणि पप्पा का असे भांडतात..? आणि पप्पा असा का वागतो..? " आज पहिल्यांदा साक्षीने तिला प्रश्न केला होता.

तिचा प्रश्न अगदी खरा होता, कारण तिला आता सगळं हळू हळू कळायला लागलं होतं. ती मोठी होतं होती, त्यामुळे मुक्ताला सतत तिची काळजी वाटतं होती.

" अगं नाही गं, कुठे काय.. आम्ही फक्त बोलतं होतो.. " मुक्ता तिला समजावते..

मुक्ता तिचं मन बदलवण्याचा खुप प्रयत्न करते.

रात्र होते, रात्रीचे अकरा वाजतात तरी चेतन काही घरी आलेला नसतो..

ती त्याला अनेक कॉल लावते, पण त्याचा काही फायदा नसतो.. तो तिचा एक ही कॉल घेत नाही.

काही वेळ मुक्ताचा डोळा लागतो आणि दारावरती जोर जोरात थाप पडते.

ती गडबडून जागी होते, बेडरूम चा दरवाजा लावुन ती हॉल च दार उघडते..

चेतन दारूच्या नशेत असतो त्याला धड उभं ही राहायची शुद्ध नसते.

ती दार उघडुन बाजूला होते, तिची अजिबात मनस्थिती नसते..

तो आत येतो, त्याला साधं उभं ही आणि चालता ही येतं नव्हतं.

आणि येऊन तो सोफ्यावर आडवा होतो..