Login

तिचा पगार हक्क कुणाचा..? पार्ट -2

कौटुंबिक कथा
भाग -2

तिचा पगार हक्क कुणाचा..?

******************************************
" नाही झेपत तर मग प्यायची कशाला..? आलेला पगार सगळा असा उडवायचा.. कसली जबाबदारी नाही आणि कसली जाण ही नाही.. " मुक्ता बडबड करत होती.

पण त्याच्या काना पर्यँत काहीच जात नव्हतं, त्याला शुद्धचं नव्हती.

ती आत जाते आणि बेडरूम चा दरवाजा लावून घेते, निरागस साक्षीच्या डोक्यावरून ती हात फिरवते.

सकाळ होते, मुक्ता स्वयंपाक घरात सगळी आवरा आवर करत असते.. आज रविवार असतो, त्यामुळे कामाला सुट्टी असते.

तेवढ्यात चेतन ला जाग येते, " आई गं... आई... डोकं नुसतं भणभणतंय.. " रात्रीचे कपडे, आणि पायात चपला ही तशाच असतात..

तो स्वतःला सावरत उठतो, मुक्ता किचनमध्येच असते, " लिंबू पाणी देशील तर बरं होईल.. " तो तिच्या कडे लिंबू पाणी मागतो..

ती त्याच्या कडे रागाने पाहते आणि त्याला लिंबू पाणी करुन देते..

चेतन शुद्धीत असल्यामुळे तिला त्याच्याशी वाद नाही पण स्पष्ट बोलायचं होतं.. तिच्या डोळ्यांन समोरून कालचा साक्षीचा चेहरा जात नसतो..

आणि बाप म्हणुन त्याला जाणीव करुन द्यायची होती..

" काल इतकं पियुन यायची गरज होती का..? " मुक्ता त्याला प्रश्न करते..

" सकाळी सकाळी हा विषय घेऊन यायची गरज आहे का..? " चेतन बोलतो..

तो डोक्याला हात लावुन बसलेला असतो..

" का नको..? बाप म्हणुन तुला काही जाणीव आहे की नाही..? जबाबदारी आहे की नाही..? " मुक्ता पुन्हा त्याला खडसावुन विचारते.

" मला माझी जबाबदारी बरोबर कळते, तु नको सांगु मला. " चेतन तिला उत्तर देतो.

" नाही कळत तुला, आणि कळलं असत तर हा असा पैसा उडवला नसता तु.. आणि हे घर मि कामाला जाते म्हणुन चालत तुझ्या पैशावर नाही चालत.. समजलं..!" मुक्ता बोलते.

" तु आता मला शहाणपणा शिकवणार..? " चेतन बोलतो.

" हो शिकवणार, स्वतःचा तर उडवतोस वर माझा आलेला पगार तोही उडवतोस.. बस झालं खुप सहन केलं तुझं, आता नाही.. माझ्यावर माझ्या मुलीची साक्षीची जबाबदारी आहे.. तुला नाही कळणार कधीच, ती जबाबदारी काय असते ती.. " मुक्ता बोलते.

चेतनवर मुक्ताच्या बोलण्याचा काहीचं असर होतं नव्हता, त्याला जे हवं होतं तेच तो करत होता..

संध्याकाळ होते, " मम्मा आज आपण बाहेर जाऊया का..? मला ना छान बाहेरचं खाण्याचं मन होतंय.. प्लीज.. "
साक्षी तिला बोलते.

" हो नक्की... तु सांगशील तिथे जाऊया... " मुक्ता बोलते..

चेतन साक्षीचं बोलणं ऐकतो, " अरे वाह... चला तर मग आपण तिघे ही जाऊया.. मस्त साक्षीला हवं तिथे फिरुया.. चालेल ना साक्षी.. " चेतन बोलतो..

चेतन चं हे बोलणं ऐकताच साक्षीचा भीतीने चेहरा पडतो, " नाही नको पप्पा... मला तुझ्यासोबत नाही जायचं.. "

हे ऐकताच चेतन ला राग येतो, " का गं..? मि का नको..? "
चेतन विचारतो..

" मला तुझी भिती वाटते, तु सतत मम्मा सोबत भांडतो. मला मम्मा सोबत जायचंय, तुझ्या सोबत नाही.. " आणि ती मुक्ताला गच्च मिठी मारते..

रात्रीचे आठ वाजतात, मुक्ता दारावरची बेल वाजवते पण चेतन काही दरवाजा खोलत नाही...

ती त्याला कॉल ही करते पण तो नेहमी प्रमाणे तिचा कॉल घेत नाही..

" काय झालं मम्मा...? " साक्षी विचारते.

" काही नाही बाळा, मला वाटतं पप्पा घरी नाही.." आणि मुक्ता बॅग मधुन चावी काढुन दरवाजाचा लॉक उघडते..

हॉल ची लाईट लावते, आणि पाहते तर घराचं सामान अस्थाव्यस्थ पडलेलं असत.. तिला अतिशय राग येतो पण ती कसाबसा राग शांत करते..

साक्षी गार झोपी जाते, मुक्ता त्याची वाट पाहत नेहमी सारखी बसलेली असते.

तिचा डोळा लागतो आणि सकाळ होते.. ती गडबडून जागी होते.. " हे देवा सकाळ झाली... चेतन आला की नाही..? " ती धडपडत बाहेर हॉल मध्ये येते..

चेतन सोफ्यावर आडवा झालेला असतो..घड्याळात आठ वाजलेले असतात..