नवे शहर,नवे कॉलेज आणि नवे फ्रेंड्स, याबरोबरच आयुष्यातील नवीन उद्दिष्टे .. या सर्व गोष्टीत रूळायला सुमीत व स्नेहलला थोडासा वेळ लागला पण हळूहळू रोजचे रूटीन सुरू झाले . स्नेहल व सुमीतला काही नवीन फ्रेंड्स पण मिळाले होते. काही अगोदरचे ही फ्रेंड्स होते. यातील एक दोन जणांना सुमीत व स्नेहलच्या प्रेमाविषयी माहिती होते. या दोघांचे प्रेम यशस्वी व्हावे अशी त्यांची इच्छाही होती. आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत होते.एवढे सर्व चांगले असले तरी सुमीत व स्नेहल सर्वांसमोर एकमेकांशी जास्त बोलत नव्हते.स्नेहलला हे पटत नव्हते. सर्व फ्रेंड्स सोबत असताना आपणही फ्रेंड्स सारखेच बोलू शकतो ना ? असे ती सुमीतला म्हणायचीही. पण सुमीत सर्वांसमोर तिच्याशी बोलतही नव्हता आणि ती त्याच्याशी बोललेली त्याला आवडतही नसे. त्यामुळे फक्त सुमीतवरील प्रेमामुळे स्नेहलही सर्वांसमोर त्याच्याशी बोलत नव्हती.
सर्वांसमोर एकमेकांशी न बोलणारे दोघेही फोनवर मनसोक्त बोलायचे.
स्नेहलशी फोनवर बोलता यावे म्हणून सुमीत गर्ल्स होस्टेलच्या फोनवर तिला फोन करायचा. कॉलेजमध्ये समोर भेट होऊनही स्नेहलशी न बोलणारा सुमीत, तिच्याशी दिवसातून एकदा तरी बोलावे म्हणून बॉईज होस्टेल च्या बाहेर जाऊन स्नेहलला फोन करायचा. प्रेमात पडणारे खरचं वेडे असतात का ? असा प्रश्न स्नेहलला पडायचा.
सुमीतच्या वेडेपणावर हसणारी स्नेहल स्वतः ही सुमीतच्या प्रेमासाठी वेडी झालेली होती. दिवसातून एकदा तरी तो दिसावा, त्याच्याशी फोनवर तरी बोलणे व्हावे. असे तिला वाटायचे. त्याचा फोन यायला उशीर झाला तरी कावरीबावरी व्हायची.

कॉलेज परिसर खूप मोठा व निसर्गरम्य होता. होस्टेलही कॉलेज परिसरातच होते.
या निसर्गरम्य वातावरणात दोघांनी एकत्र बसावं, खूप गप्पा माराव्यातं ..असं दोघानांही खूप वाटायचं. पण मनात असूनही ते या गोष्टीचा आनंद घेवू शकत नव्हते.
अभ्यासाबरोबर कॉलेज व होस्टेल जीवनाचा आनंद घेता घेता कॉलेजची दोन वर्षे संपत आली होती.स्नेहलसाठी स्थळे येऊ लागली होती.तिच्या आईवडिलांना वाटले की, एखादे चांगले स्थळ आले आणि स्नेहलची पसंती मिळाली की लग्न ठरवू .
आता तर काहीही कारण सांगता येणार नाही, खरे कारण घरात सांगायलाच हवे. असे स्नेहलने ठरवले होते आणि सुमीतनेही त्याच्या घरात सांगावे. असे तिला वाटले.
आपण मनात अनेक चांगल्या गोष्टी ठरवतो, भविष्याची चांगली स्वप्ने पाहतो आणि त्यासाठी प्रयत्नही करतो. पण काही गोष्टी आपल्या हातात नसून नियतीच्या हातात असतात. असेच काहीसे स्नेहलच्या बाबतीत घडत होते.

कॉलेजला दोन दिवस सुट्टी होती म्हणून स्नेहल घरी आलेली होती.ती घरी आली की,सुमीत तिला फोन करायचा आणि तीही त्याच्या फोनची आनंदाने वाट बघायची.
आताही नेहमीप्रमाणे ती त्याच्या फोनच्या प्रतिक्षेत होती आणि फोनची रिंग वाजली. तिला खूप आनंद झाला व त्या आनंदातच तिने फोन रिसीव्ह केला. पण पलिकडून सुमीतचा आवाज नव्हता, वेगळाच आवाज येत होता.

"हॅलो, स्नेहल मी संदिप बोलतोय." --- संदिप
"हॅलो,बोल ना संदिप,काय झाले?"---स्नेहल
"अगं, सुमीतच्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच ते गेले. खूप वाईट झाले." ---संदिप
संदिप हा सुमीतचा चांगला मित्र होता आणि त्याला सुमीत व स्नेहलच्या प्रेमाविषयी माहिती होते. स्नेहलही त्याला चांगली ओळखत होती. म्हणूनच त्याने तिला फोन करून ही बातमी सांगितली.
संदिपने सांगितलेली दुःखद बातमी ऐकून स्नेहलला खूपच वाईट वाटले. अशा दुःखाच्या प्रसंगी आपण सुमीतला जाऊन भेटावे,त्याचे सात्वन करावे. त्याच्या घरातील व्यक्तिंनाही भेटावे. असे तिला मनातून खूप वाटत होते. पण जाणे शक्यही नाही, हे ही तिला माहित होते.
'घरात काय सांगावे? खरे सांगितले तर खूप सारे प्रश्न विचारले जातील आणि काहीतरी खोटे कारण सांगितले तर चेहऱ्यावरील हावभाव आणि बोलणे पाहून मी खोटे बोलत आहे. हे घरातील नक्कीच ओळखून घेतील आणि तिथे गेलीही व सुमीतला दुःखी पाहून मला माझ्या भावनांना आवर घालता आला नाही, माझे वागणे पाहून त्याच्या नातेवाईकांनी आमच्याबद्दल काही गैरसमज वगैरे केला तर..आणि इतकी वर्षे सर्वांपासून लपवून ठेवलेले प्रेम उघडकीस येईल आणि सुमीतला तर हे अजिबात आवडणार नाही.'

एवढा सारा विचार करून स्नेहल सुमीतला भेटायला न जाता घरीच राहिली.ती शरीराने जरी घरीच होती ; पण तिचे मन सुमीतच्या काळजीने त्याच्याकडेच धाव घेत होते. त्याच्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आणि मी त्याच्याजवळ नाही..मग काय अर्थ आपल्या प्रेमाला? संकटाच्या वेळी, दुःखाच्या वेळी मदत करतं, धीर देतं ..तेचं खरं प्रेम! आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. पण इतरांना, समाजाला, घरातील लोकांना का घाबरतो? प्रेम तर पवित्र असत ..मग तरीही प्रेमाला वाईट का समजले जाते ?सुमीतचे माझ्यावर व माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे तरीही आम्ही आमच्या प्रेमाचा मोकळेपणाने आनंद घेऊ शकत नाही. मनात सतत एक भीती वाटत असते. लोक काय म्हणतील? घरातील व्यक्तींना काय वाटेल ? मनात अनेकदा अपराधीपणाची भावना का येते? आपले प्रेम, आपली भावना पवित्र, निर्मळ असली तरी आपण कुठे चुकत आहोत का? असे का वाटत असते? असे अनेक प्रश्न स्नेहल स्वतःलाच विचारत होती.
सुट्टी संपल्यावर स्नेहल होस्टेलला गेली. कॉलेजला जाण्यासाठी मन तयार होत नव्हते पण जाणेही गरजेचे होते त्यामुळे ती कॉलेजला गेली. तिथे जाताच सुमीतच्या आठवणीने तिचे मन रडू लागले.तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. जोपर्यंत सुमीतशी बोलणे होत नाही, त्याची भेट होत नाही तोपर्यंत तिला चैन पडणार नव्हते. ती त्याला फोन करू शकत नव्हती पण त्याचा तरी आपल्याला फोन येईल अशी भाबडी आशा ती बाळगून होती.
सुमीतच्या वडिलांच्या निधनाने,सुमीत व स्नेहलच्या फ्रेंड्स ग्रुप मध्ये सर्वांनाच खूप दुःख झाले होते. हसरा खेळता ग्रुप खूप शांत व उदास झाला होता. परीक्षा जवळ येत असल्याने, सर्वजण अभ्यासाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत होते.दुःख तर झालेच होते पण अभ्यास करणेही गरजेचे होते. सर्वजण सुमीतच्या येण्याची वाट पाहत होते.परीक्षा जवळ येत असल्याने सुमीतही लवकर येणार होता. एकीकडे सुमीतच्या येण्याची वाट पाहणारी स्नेहल, सुमीत आल्यावर त्याला कसे सामोरे जायचे? हाही विचार करत होती. आणि तो क्षण लवकरच आला..

रोजप्रमाणे स्नेहल आपल्या मैत्रीणी सोबत होस्टेलवरून कॉलेजकडे चालली होती. कॉलेजच्या गेटमध्ये प्रवेश करणार ..तेवढ्यात तिला सुमीतही त्याच्या मित्रांसोबत येताना दिसला.तो दिसताक्षणीच त्याला जाऊन भेटावे,मिठी मारावी. असे स्नेहलला वाटले.पण प्रत्यक्ष तसे करणे शक्य नाही ..असे तिला वाटले. आणि आपल्या मनावर,भावनांवर ताबा ठेवत ती वर्गात गेली. थोड्या वेळात सुमीतही वर्गात येऊन बसला. दोघांची पुन्हा एकदा नजरानजर झाली. दोघांच्याही मनात,डोळ्यात खूप सारे भाव होते,प्रश्न होते.नेहमी हसतमुख असणाऱ्या सुमीतचा दुःखी चेहरा पाहून स्नेहलला वाईट वाटत होते.
लेक्चर्स संपल्यावर सर्व फ्रेंड्स आपल्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी जमले..सर्वांनी सूमीतची विचारपूस केली. स्नेहलनेही 'कसा आहेस? असे कसे झाले? काळजी घे ..वगैरे बोलून सुमीतचे सात्वन केले. बोलायचे तर खूप होते पण सर्वांसमोर एवढे बोलू शकत नव्हती.
सुमीतशी एकटे भेटू तेव्हा खूप बोलू. असे तिने ठरवले.तशी संधी मिळावी यासाठी ती प्रयत्नही करू लागली. भेट होण्यापूर्वी अगोदरसारखे फोनवर बोलणे झाले तरी खूप बरे होईल.
मला जशी त्याच्याशी बोलण्याची ओढ लागली आहे तशीच त्यालाही माझ्याशी बोलण्याची ओढ लागली असेल ना? सुमीतचे माझ्या वर खूप प्रेम आहे. तो मला त्याच्या मनातील सर्व सांगतो. आताही त्याचे मन दुःखी आहे तर तो मला सर्व सांगून दुःख हलके करेल. तो मला नक्की फोन करेल. अशी आशा स्नेहलला होती.

क्रमशः
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा