Login

Wife On Rent !! पार्ट 4

समलैंगिक प्रेम कथा
गच्चीवर गार वारा सुटला होता. कार्तिकने त्याच्या उबदार हातात आर्यनचा मऊशार नाजूक हात घेतला होता. मग कार्तिक त्या हाताचे चुंबन घेतो.

"हेच माझ्या पिल्लुचे हात जे माझ्यासाठी शायरी लिहितात!" कार्तिक

"मी शायरी तुझ्यासाठी नाही लिहीत. मी स्वतःसाठी लिहितो. तुझ्यावर शायरी लिहिताना माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा येतो आणि हृदयात आनंद भरतो. माझा स्वार्थ आहे त्यात!" आर्यन

"तू किती पुस्तकी बोलतो आर्यन!" कार्तिक

कार्तिक आर्यनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जवळ खेचतो.

"आता कौतुक पुरे. मॅटर सांग." आर्यन

"यार. माझा बाप हरामी आहे. लहानपणी बाबा शनिवारी रविवारी आम्हाला सोडून जायचे. मी खूप रडायचो. पण आई म्हणायची की बाबा बिजनेससाठी जातात. पण तस नव्हते. बाबा त्यांच्या रात्री रंगीन करत होते. मी टिन एजमध्ये आलो. आईचा मोठा अकॅसिडेंट झाला. ती कोम्यात गेली. मी घरी एकटाच असायचो. बाबा त्यांच्या जीवनात व्यग्र असायचे. मी झोपलेल्या आईशी बोलत बसायचो. आई लहानपणी म्हणायची की चंद्र आपला मामा असतो. म्हणून मी असच गच्चीवर बसून चंद्राशी बोलायचो. एक दिवस घरी बाबा लवकर आले. सोबत एक तरुणी होती. त्यांची अससिस्टंट. मी आनंदाने धावत खाली गेलो. कारण पहिल्यांदाच बाबा लवकर आले होते. पण जे दिसले ते दिसायला नको होते. बाबा दुसऱ्या बाईसोबत जवळीक साधत होते. त्याक्षणीच बाबा माझ्या नजरेतून उतरले. नंतर मी बाबांशी बोललो. तर त्यांनी त्यांच्या कृत्याचे समर्थन केले.

"तुझी कोम्यात आहे. माझ्याही शारीरिक गरजा आहेत. असली मर्द आपल्या शारीरिक गरजा कधीच तरसत बसत नाहीत. तुझ्याएवढं असताना मी शाळेत एका मुलीला किस केले होते." बाबा मला हसत म्हणले.

आमच्यात भांडण पेटत गेले. ज्या घरात माझे वडील माझ्या आईला धोका देत होते तिथे मी कस राहू. श्वास गुदमरत होता. शेवटी काही वर्षाने घर सोडले. आई कोम्यातून बाहेर आली. पण बिचारीला काहीच कल्पना नव्हती की तिचे कुटुंब तर कधीचे तुटून गेले होते. मी आईला अधूनमधून भेटायला जायचो. घरी जाणे टाळायचो. आई हार्टची पेशंट आहे. म्हणून तिला बाबांचे सत्य कधी सांगितले नाही. बाबांनी माझ्यासाठी मुलगी शोधलीय. बाबा मला ब्लॅकमेल करत होते की जर मी लग्न नाही केले तर आईला सत्य सांगतील. आई आताच बरी झालीय. तिला मला कसलाच त्रास द्यायचा नाही. ही श्रीमंती वैभव आतून किती पोकळे आहे कळून चुकले मला. बाबांना टाळण्यासाठी मी खोटे बोललो की माझे लग्न झाले म्हणून!" कार्तिक

"अरे पण आता कुठून आणणारे बायको ?" आर्यन

"बघू रे. एकदा बाबांना विश्वास बसू दे माझे लग्न झाले ते की मग कायमची किटकीट मिटली. " कार्तिक

"उद्यापासून शोध सुरू करू वाईफ ऑन रेंटचा. चल आता खाली. थंडी खूप आहे. " आर्यन

"मी आहे ना." कार्तिक आर्यनला जवळ खेचून मिठी मारतो.

सकाळी आर्यन पीठ मळत असतो. कार्तिक जस्ट उठलेला असतो आणि किचनमध्ये जाऊन हळूच आर्यनला मागून मिठी मारतो. मग आर्यनच्या हातावर हात ठेवून पीठ मळतो. आर्यनच्या खांद्यावर कार्तिकची हनुवटी येते. आर्यन पण एक बोट ओल्या पिठात टाकून कार्तिकच्या नाकावर लावतो. कार्तिक हसतो आणि आर्यनच्या मानेचा चावा घेतो.

मग बेल वाजते.

"कोणे सकाळी सकाळी रोमान्स बिघडवायला!" कार्तिक चिडून म्हणतो.

मग दार उघडतो. तर एक निळा फ्रॉक घातलेली , गोरी , क्युट लहान मुलगी अचानक उडी मारून कार्तिकच्या काघेत जाते.

"बाबा. " ती कार्तिकला किस करते.

हे पाहून आर्यन डोक्यावर हात मारतो आणि कार्तिक तोंड नकारार्थी हलवत रडकुंडीला येतो.