आर्यन आणि दिव्या दोघे खाली जातात. टॅक्सी बुक केलेली असते पण तिला यायला अजून वेळ असतो. दिव्या आणि आर्यन गार्डनच्या बेंचवर बसतात. आर्यन एक फोटो काढतो. त्यात कार्तिक-आर्यनच्या सर्व फोटोंचा सुंदर कोलाज असतो. आर्यन त्या फोटोवरून हात फिरवतो. नकळत त्या अश्रू येतात आणि ते फोटो फेमवर पडतात. दिव्या आर्यनच्या खांद्यावर हात ठेवते.
"तू इतके प्रेम करतो मग का दूर करतोय त्याला ?" दिव्या
"प्रेम करण्यासाठी योग्य जेंडर पण पाहिजे ना. मुलगी असतो तर मी सोडले नसते त्याला. पण कदाचित स्त्री पुरुषानेच केलेले प्रेम दिसायला छान दिसते. समलैंगिकाना प्रेमाचा अधिकारच नसतो कदाचित. तो ऋचासोबत खूश आहे हे समाधान राहील. आयेशाच्या रूपात त्याला लेकीचे सुख भेटत आहे. ह्या सर्व गोष्टी मी कधीच देऊ शकलो नसतो. शायरी कविता करून संसार चालत नसतो. त्यासाठी स्त्रीच हवी. " आर्यन
भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी आर्यन नकळतपणे मोबाईलवर कविता टाईप करू लागतो..
अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
संवाद न होता स्पर्शच बोलू लागले
सर्वांसमोर मिठी मारता आली नाही
व्यक्त कराया मुखवटा फेकला नाही
संवाद न होता स्पर्शच बोलू लागले
सर्वांसमोर मिठी मारता आली नाही
व्यक्त कराया मुखवटा फेकला नाही
अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
डायरीच्या पानात ते कैद जाहिले
दोघांची कहाणी दोघातच राहिली
प्रेमास गुन्ह्याची का उपमा भेटली ?
डायरीच्या पानात ते कैद जाहिले
दोघांची कहाणी दोघातच राहिली
प्रेमास गुन्ह्याची का उपमा भेटली ?
अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
समाजासमोर गुडघे त्याने टेकविले
वासनेच्या दलदलीत ते कुठे हरवले
माझे प्रेम मलाच का नाही गवसले ?
समाजासमोर गुडघे त्याने टेकविले
वासनेच्या दलदलीत ते कुठे हरवले
माझे प्रेम मलाच का नाही गवसले ?
अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
तुला अन मला लक्षातही न आले
का पारंब्यापरी जीवन नशिबी आले
शरीरे वेगळे होताना हृदय का रडले ?
तुला अन मला लक्षातही न आले
का पारंब्यापरी जीवन नशिबी आले
शरीरे वेगळे होताना हृदय का रडले ?
अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
एका रात्रीत ते मातीमोल जाहिले
समाजांच्या नजरेला इतके घाबरले
शापित माझे प्रेम तडफडतच मेले..
एका रात्रीत ते मातीमोल जाहिले
समाजांच्या नजरेला इतके घाबरले
शापित माझे प्रेम तडफडतच मेले..
~ आर्यन ✍️
◆◆◆
"ए कार्तिक. मला पाणी आणून दे!" ऋचा कार्तिकला हलवत म्हणते.
"मी काही तुझा नोकर नाही रात्रीच्या दोनला तुला पाणी आणून द्यायला!" कार्तिक डोळे चोळत म्हणतो.
"आणून दे नाहीतर उद्या सगळं खरखर सांगेल.मला भीती वाटते!" ऋचा
कार्तिक अंगावरील आयशाचा नाजूक हात काढतो. मग बाहेर किचनकडे जात असतो. हॉलची लाईट चालूच दिसते आणि टेबलावर आर्यनची डायरी उघडलेली असते. कार्तिक त्या डायरीकडे जातो. डायरी वाचून कार्तिकचे डोळे पाणावतात. त्याची नजर घड्याळाकडे जाते. तो धावतच खाली जातो.
एव्हाना टॅक्सी आली होती. दिव्या आणि आर्यन टॅक्सीत बसले. कार्तिक धावत पार्किंगमध्ये पोहोचतो. तिथून "आर्यन" असा आवाज देत गेटपर्यंत पोहोचतो. कार्तिकला टॅक्सी जाताना दिसते. तो टॅक्सीमागे धावतो. दिव्याला आवाज येतो. ती टॅक्सी थांबवते. आर्यन आणि दिव्या दोघे टॅक्सीतून उतरतात. कार्तिक तिथपर्यंत पोहोचतो आणि दमल्यामुळे मोठमोठे श्वास घ्यायला लागतो.
"कुठे चालला होता ?" कार्तिक
"हे बघ मला जावे लागेल. अर्जेंट आहे. " आर्यन
"चूप!" कार्तिक मोठ्याने ओरडतो.
आर्यन दचकतो.
"तू पण चूप!" कार्तिक दिव्याला ओरडतो.
"पण मी काही बोललेच नाही!" दिव्या घाबरत म्हणली.
"तू सामान काढून ठेव. आर्यन तू चलच माझ्यासोबत!" कार्तिक आर्यनचा हात पकडून सोसायटीच्या गार्डनकडे खेचतो. मग आर्यनला बेंचवर बसवतो.
"स्वतःला "कुछ कुछ होता है" चा काजोल समजतो का ? एकदा पण विचार नाही केला की माझे काय होईल. मला रोज सकाळी शायरी कविता कोण ऐकवणार. " कार्तिक
"ऋचा आहे ना. ती ऐकवेल. मला कवाब में हड्डी नाही बनायचे!" आर्यन
"अरे यार ते मी असच म्हणलो होतो ते!" कार्तिक
"ऋचा मला हसत होती. आयशाने मला माझ्याच बेडरूममधून बाहेर काढले. तुला एकदा तर समजलं की मला किती त्रास होतोय या सर्वांचा. तुझे आईवडील तुझी बायको तुझी मुलगी. माझे काय ? मी काय करतोय इथे ?" आर्यन
"यार आईला संशय येत होता म्हणून खोटखोट रोमान्स केला." कार्तिक
"ठिके. उद्या जर डीएनए टेस्टमध्ये आयशा तुझी मुलगी निघाली तर काय करायचे मी ? तुमचा संसार बघत बसायचा का ?" आर्यन
"मी प्रेम नाही करत ऋचावर. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. हे बघ आर्यन. प्रेमकहाणी पूर्ण होण्यासाठी नेहमी एकत्र येणे किंवा लग्न करणे गरजेचे नसते. राधा-कृष्ण यांचे पण लग्न नाही झाले. तरी त्यांच्या प्रेमाचे दाखले आजही देतो ना आपण. प्रेम पवित्र भावना असते आणि त्याची पवित्रता सिद्ध करण्यासाठी कसलेच मापदंड नसतात. जर आयशा खरच माझी मुलगी असेल तर मी तिला मुलगी म्हणून स्वीकारेल. " कार्तिक
"आणि ऋचा ? तिचे काय करशील ? असेही कधी न कधी वेगळे व्हायचेच आहे ना आपल्याला. मी पण लग्न करेल. तुला पण कधी न कधी करावे लागेल. मग आताच वेगळे होऊ. म्हणजे पुन्हा त्रास होणार नाही." आर्यन
"यार अस तुटलेले हृदय घेऊन वेगळे नाही होणार आपण. सोबत इतके सुंदर क्षण जगलोय तर मग शेवट पण सुंदर करू ना. मला एकदा तुझ्यासोबत मनभरून गप्पा तर मारू दे. एक शेवटची सुंदर रात्र तर सोबत घालवू. मनसोक्त तुझ्या कविता तर ऐकू दे. तू मला प्रेम करायला शिकवले आहे मग प्रेमाचे शेवटचे क्षण अस घाईत नाही जगायचे मला." कार्तिक
"लेखक मी आहे पण पुस्तकी तू बोलतोय!" आर्यन
"तुझ्याकडूनच शिकलोय. सॉरी यार दिलसे. तुला खूप काही बोललो. तुझ्या प्रेमाला समजूनच नाही घेतले. तुला दुखावत राहिलो. भांडण होऊनही तू आईवडिलांशी खोट बोलताना मला साथ दिली. मला तुझे म्हणणे पटतंय. दोघांनाही लग्न करावेच लागेल. आईवडिलांसाठी नाहीतर समाजासाठी. पण म्हणून आपण आपले प्रेम कधीच संपू नाही द्यायचे. प्रत्येक यश आणि पार्थच्या नशिबी आशियाना नसतो जितके क्षण सोबत राहू त्यालाच आशियाना बनवू!" कार्तिक
मग आर्यन कार्तिकला घट्ट मिठी मारतो. दुरून हे दृश्य पाहत असलेल्या दिव्याचे पण डोळे पाणावतात. तिने टॅक्सी थांबवलेलीच होती. ती कार्तिक आणि आर्यनकडे येते.
"मला तुमच्या दोघांच्या डोळ्यात प्रेम स्पष्टपणे दिसत होते. खूप छान वाटले तुमचे गैरसमज दूर झाले ते बघून. पण मला आता जावे लागेल. फ्लाईट आहे. जगासाठी तुम्ही कितीही खोटी नाते उभा करत असाल तरी या सर्वात एक नाते खरे आहे ते म्हणजे तुमच्या प्रेमाचे नाते. कीप इट अप!" दिव्या
"तू पण रहा ना!" आर्यन
"डॅडला मला भेटण्याची इच्छा झालीय. म्हणून जातेय. जमलं तर येईन भेटायला." दिव्या
"थँक्स!" कार्तिक दिव्याला मिठी मारतो.
दिव्या जाते. कार्तिकला शिंक येते. आर्यन त्याला मारतो.
"तुला थंडी सहन होत नाही मग बान्यानवर धावत येण्याची गरज होती का ?" आर्यन
"स्वेटर घालेपर्यंत तू गेला असता म्हणजे ?" कार्तिक
"चल आता!" आर्यन
घरी गेल्यावर आर्यनने कार्तिकला हळदीचे दूध करून दिले. दिव्या आणि आर्यन ज्या खोलीत रहायचे त्या खोलीत कार्तिक आणि आर्यन गेले. मग कार्तिकने बेडरूमचे दार लावले. गार वारा सुटला होता. कार्तिकने आर्यनला उचलून बेडवर टेकवले. कार्तिकने स्वतःचा उबदार हात आर्यनच्या पायावर फिरवला. मग आर्यनच्या दोन्ही हातावर स्वतःचे हात टेकवून आर्यनच्या कपाळावर किस केले. मग हळूच आर्यनच्या मिटलेल्या डोळ्यावर स्वतःचे ओठ टेकवले. आर्यनचे ओठ ओठात घेतले. आर्यन पण कार्तिकला घट्ट बिलगला. ती सुंदर रात्र दोघानी एकमेकांच्या गुलाबी मिठीत काढली.
सकाळी आर्यन सवयीप्रमाणे लवकर उठला. त्याच्या अंगावर कार्तिकचा हात होता. किती चुकीचा विचार केला आपण. माझी इकडची स्वारी अजूनही तशीच आहे. ती बदलली नाही. माझे प्रेम कसोटीत खरे उतरले. आर्यन स्वतःशीच म्हणला. मग काय डायरी घेतली आणि झोपलेल्या कार्तिकच्या निरागस चेहऱ्याकडे बघत म्हणला.
कुछ इंसान फ़रिश्ते होते है
खुदा के नायाब तोफे होते है
प्यार का मतलब वो समझाते है
जमीन पे रहके जन्नत से रूबरू करवाते है...!!
खुदा के नायाब तोफे होते है
प्यार का मतलब वो समझाते है
जमीन पे रहके जन्नत से रूबरू करवाते है...!!
~आर्यन✍️
ऋचा उठलेली असते. आर्यन आणि ऋचा घर साफ करतात. हळूहळू सर्वजण उठतात. मिस्टर जिंदलची कुरबुरी अधून मधून चालुच असतात. सर्वजण नाश्ता करत असतात. ऋचाने खमंग पोहे बनवले असतात.
"दिव्या कुठेय ?" मिसेस जिंदल
"काल तिच्या वडिलांचा अचानक फोन आला. सो रात्रीच जावे लागले!" आर्यन
"तू नाही गेला सोबत ?" मिस्टर जिंदल
"नाही. माझी महत्वाची मिटिंग होती!" आर्यन
"आमचा मुलगा तर काय काम करतो कुणास ठाऊक!" मिस्टर जिंदल टोमणा मारतात.
तेवढ्यात बेल वाजते. कार्तिकच्या मनात परत धडकी भरते. तो मनातल्या मनात गाणे गातो.
बेल वाजली बेल वाजली
संकटांची चाहूल लागली
कोण आलं असेल दारात
धडकी भरते सतत मनात
संकटांची चाहूल लागली
कोण आलं असेल दारात
धडकी भरते सतत मनात
बेल वाजली बेल वाजली
नाटक करायची वेळ झाली
खोटे बोलू लोकांना फसवू
नवीनच नाते नव्याने बनवू
नाटक करायची वेळ झाली
खोटे बोलू लोकांना फसवू
नवीनच नाते नव्याने बनवू
बेल वाजली बेल वाजली
आता कुणाची वेळ आली
नवीन नवरा नवीन बायको
मान्य करा सर्व प्रश्न कायको
आता कुणाची वेळ आली
नवीन नवरा नवीन बायको
मान्य करा सर्व प्रश्न कायको
बेल वाजली बेल वाजली
पाहुणा की पाहुणी आली
बँड आता वाजणार आहे
हाऊसफुल शो ठरत आहे
पाहुणा की पाहुणी आली
बँड आता वाजणार आहे
हाऊसफुल शो ठरत आहे
बेल वाजली बेल वाजली
उत्तरे शोधा आता प्रश्नांची
खोटे लपवायला खोटे बोलतोय
नात्याचा गुंता अजूनच वाढतोय
उत्तरे शोधा आता प्रश्नांची
खोटे लपवायला खोटे बोलतोय
नात्याचा गुंता अजूनच वाढतोय
बेल वाजली बेल वाजली
नौका काढा सुनामी आली
शेवट काय मज ठाऊक नाही
मनी आपोआपच सुचत राही
नौका काढा सुनामी आली
शेवट काय मज ठाऊक नाही
मनी आपोआपच सुचत राही
आर्यन दार काढतो आणि समोरची व्यक्ती पाहून त्याला शॉकच बसतो..
"राम राम मंडळी" समोरून आवाज आला.
आवाजात गावठी ढंग होता. प्रौढ व्यक्तीचा आवाज होता. आर्यनसमोर एक बाज होती. बाजमागे गुलाबी फेटा , पांढरी धोती , पांढरा कुर्ता आणि त्यावर काळे जॅकेट असा गावातील पोशाख घातलेला , पिळदार मिशी असलेला व्यक्ती उभा होता.
"बाबा तुम्ही ?" आर्यन
"म्या बी हाय!" एक हिरवी नववारी साडी नेसलेली स्त्री समोर येते.
"आई तू पण ?" आर्यन
"आणि मी पण.." हरीश भाऊ समोर येतो.
आता आर्यन बेशुद्धच होणार असतो. आर्यन सर्वाना आत बोलावतो. क्षणभरात हॉलमध्ये खूप पसारा होतो. आर्यनचे बाबा म्हणजे गणपतराव पाटील हॉलमध्ये बाज टाकतात. आणि त्यावर बसतात.
"रामराम!" गणपतराव मिस्टर जिंदलला म्हणतात.
"हॅलो!" मिस्टर जिंदल
"कार्तिक कोण आहेत हे ?" मिसेस जिंदल दबक्या आवाजात म्हणतात.
"आर्यनचे आईवडील बहुतेक!" कार्तिक
मग गणपतराव मागून हवा सोडतात. सगळीकडे दुर्गंध पसरतो.
"ह्या आजोबांनी हवा सोडली!" आयशा हसते.
"ए चूप..अस म्हणतात का मोठ्याबद्दल!" कार्तिक आयशाला हलकेसे मारतो.
मिस्टर आणि मिसेस जिंदलला वास असहनिय होतो आणि ते आत बेडरूममध्ये पळतात. बाकीचे मास्क घालतात. कार्तिक स्प्रे मारतो.
"माफ करा. यांच्या भट्टीची जरा प्रॉब्लेमच आहे!" आर्यनची आई लक्ष्मीबाई म्हणते.
"काही हरकत नाही काकू. प्रवास ठीक झाला ना ?" कार्तिक
"त्ये जाऊ द्या. आधी मला सांगा तुम्ही लग्न का केलं ? आणि वर एक पोरगी पण हाय!" गणपतराव आर्यनकडे रागाने बघत म्हणतो.
"बाबा मी कुठे लग्न केलं ?" आर्यन आश्चर्यचकित होऊन म्हणतो.
"खोट नको बोलू. काका मी स्वतः आर्यनच्या बायकोला पाहिले आणि मुलीला पण. ही जी मुलगी आहे ना तीच आर्यनची मुलगी आहे!" हरीश म्हणला.
"ही आर्यनची मुलगी आहे का ? ये ना आपल्या आजीच्या मांडीवर बस!" लक्ष्मीबाई आयशाला बोलावते.
आयशा पण मांडीवर जाऊन बसते. लक्ष्मीबाई आयशाचे लाड करते.
"अहो तुमच्या मुलाने न सांगता लग्न केलं. पोरगी झाली तरी सांगितले पण नाही. आणि तुम्हाला काहीच कस वाटत नाही ?" गणपतराव चिडतात.
आर्यन कार्तिककडे बघतो आणि कार्तिक भिंतीकडे बघतो.
"बोल की गाढवा. तुला लहानाचे मोठे केलं आणि इतका बी हक्क नाही व्हय आमचा ?" गणपतराव
"हरीशने गावी जाऊन त्याच्या घरी सांगितले आणि हळूहळू पूर्ण गावात बोभाटा झाला की तू लग्न केलंय आणि तुझी पोरगी बी हाय म्हणून!" लक्ष्मीबाई
"मी सांगते!" ऋचा
खोलीतून एक मराठी नारंगी पैठणी , नाकात नथ , कपाळाला चंद्रकोर घातलेली ऋचा बाहेर येते. तिचे सौंदर्य पाहून गणपतराव आणि लक्ष्मीबाई थक्क होतात.
"सासरेबुवा पाया पडते!" ऋचा
"सुखी रहा पोरी.!" गणपतराव
"सासूबाई पाया पडते!" ऋचा
"अगदी नक्षत्रावाणी हायस बघ. गावात एवढी सुंदर सुन कोणाची बी नसलं. " लक्ष्मीबाई बोटे मोडत म्हणतात.
"सुनबाई मला तुम्ही भोळ्या वाटतात. आमच्या गावात सुनेला शब्द बी बोलत नाहीत. तिला लक्ष्मी मानत्यात. पण ह्या गाढवाला लई मारणारे मी आज!" गणपतराव
"आयशा तू आत जा!" ऋचा
मग आयशा आत जाते.
"आव नातीसमोर काय बोलताय!" लक्ष्मीबाई
"सासरेबुवा. माझे लग्न आर्यनच्या मित्रासोबत ठरले होते. पण साखरपुडा झाल्यावर त्यांनी हुंडा मागितला. माझ्या वडिलांना हुंडा द्यायला जमेना. भर मांडवात कार पाहिजे म्हणून अडून बसले. माझे वडील रडू लागले. गयावया करू लागले. मी ज्या समाजातून आले तिथं एकदा मुलीचे लग्न मोडले की दुसऱ्यांदा कुणीच सोयरीक जमवत नाहीत. त्यांनी भर मांडवात हुंड्यासाठी माझी सोयरीक मोडली. माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला. आर्यनने खूप मदत केली. बाबांनी मरताना आर्यनला माझ्या मुलीशी आजच लग्न कर असे वचन मागितले. मग आम्ही लग्न केलं. ही मुलगी आयशा माझी लहान बहिण आहे. आई लहानपणी वारली म्हणून मलाच मम्मी म्हणते आणि आर्यनने हिला बापाचे प्रेम भेटावे म्हणून "बाबा" म्हणायला सांगितले!" ऋचा
"काका ही तर "मन उधाण वाऱ्याचे" सिरियलची स्टोरी आहे. मला खोटे वाटत आहे सर्व. पण तुम्ही आम्हाला सांगितले का नाही ? घरात फोटो का नाहीत लग्नाचे ?" हरीश
"इतक्या घाईत फोटो काढायचे सुचले नाही. खऱ्या आठवणी फोटोत कैद पण होत नाहीत!" ऋचा
"ए हऱ्या. तुझे लफडे सांगू का ? त्या गंगूसोबत उसाच्या शेतात जायचा त्ये. मला विश्वास हाय आर्यनवर. पोराने बापावानी मुलीच आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवले. मला गर्व हाय पोरावर!" लक्ष्मीबाई
"खर असेल हे तर मला पण मान्य आहे. आज बी शहरात हुंडा घेत्यात लोक. मी तर गावातपण हुंडाबंदी आणली. पोरी लक्ष्मी असत्यात आणि तिच्यापासून हुंडा का घ्यायचा!" गणपतराव
"मी जातो काका. माझी मिटिंग आहे!" हरीश भाऊ
हरीश निघून जातो. आर्यन त्याच्याकडे रागाने बघत असतो. मग आर्यन बेडरूममध्ये जातो. हरीशचा सर्व गैरसमज मिस्टर आणि मिसेस जिंदल यांना सांगतो.
"काका काकू. माझे आईवडील थोडे रागीट आहेत. म्हणून आम्हाला नाटक करावे लागणार आहे. जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत ऋचा माझी बायको असेल!" आर्यन
"अरे पण खरखर सांगायचे ना दिव्या बायको आहे म्हणून!" मिस्टर जिंदल
"गावात सगळीकडे बोभाटा झालाय. आईवडीलांना कापण्याची खूप सवय आहे. राग आला की सरळ काहीपण कापतात. तुम्हीपण थोडे दूरच रहा. " आर्यन
इकडे कार्तिक गणपतराव आणि लक्ष्मीबाईला बोलतो.
"काका काकू काय सांगू आता. माझा मोठा भाऊ होता. माझ्यासारखा दिसायचा. माझी मोठी वहिनी सॉरी वहिनी होती. ऋचासारखीच होती. माझी मोठी पुतणी म्हणजे पुतणी. आयशासारखीच होती. पण नियतीने असा डाव साधला की एका अपघातात सर्वांचा मृत्यू झाला. माझे आईवडीलांना खूप मोठा धक्का बसला. ते मलाच माझा मोठा भाऊ समजू लागले. आणि ऋचाला माझी बायको. तर त्यांच्यासाठी मी त्यांचा मोठा मुलगा , ऋचा माझी बायको आणि आयशा माझी मुलगी आहे. म्हणून मी आणि ऋचा नवरा बायको असल्याचे नाटक करतोय जोपर्यंत आईवडील घरी आहेत तोपर्यंत!" कार्तिक रडू लागला.
"काही कळलं का हो ?" लक्ष्मीबाई
"पूर्ण नाही. पण पोराचे आईवडील मानसिक धक्क्यात दिसताय. त्यांना वाटतय की ऋचा त्यांचीच सून आहे आणि आयशा त्यांचीच नात आहे!" गणपतराव
"बाळा तू रडू नको. आम्ही तुझ्या आईवडीलांना कायबी बोलणार नाही!" लक्ष्मीबाई पदराने कार्तिकचे अश्रू पुसतात.
मिस्टर-मिसेस जिंदल आणि गणपतराव-लक्ष्मीबाई एकमेकांना काहीच बोलत नाहीत आणि दूरदूरच पळतात. गणपतराव वास सोडत असतात त्यामुळे कार्तिक मार्केटमधून नवीन स्प्रे आणि मास्क आणतो. रात्री एका खोलीत मिस्टर आणि मिसेस जिंदल , एका खोलीत ऋचा आयशा आणि एका खोलीत गणपतराव आणि लक्ष्मीबाई झोपते.
@रात्रीच्या दोन वाजता
स्थळ : गच्ची
"हे बघा. पॅनिक होऊ नका. मी लॅपटॉपवर पिपिटी बनवली आहे!" आर्यन
"काही दिवसापूर्वी लाईफ काय होती आणि आता काय होती." कार्तिक
"ऋचा तुला काय गरज होती ग माझी बायको बनण्याची. दिव्याला दिले होते ना पैसे भूमिकेचे!" आर्यन
"अरे माझी लहानपणीपासूनची फॅन्टसी होती की कार्तिक आणि आर्यनची बायको बनण्याची. वेड्या हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. मला त्याच दिवशी त्या हरीशच्या चेहऱ्यावरून संशय आला. काहीतरी रायता पसरला आहे म्हणून. आणि दिव्याला कुठून आणणारे ? अस पण गावात पसरले मीच बायको आहे म्हणून!" ऋचा
"आणि ती मराठमोळी साडी कुठून आली ?" कार्तिक
"ड्रेसवर चटणी सांडली होती म्हणून. ती साडी सापडली. आणि नवीन सासऱ्यांना इम्प्रेस पण करायचं होतं!" ऋचा
"वाह. तुला जमतंय बर हे सर्व. असो. आता ऐका.
माझे आईवडील गणपतराव-लक्ष्मीबाई यांच्यासाठी माझी बायको ऋचा आणि मुलगी आयशा. मिस्टर आणि मिसेस जिंदल साठी कार्तिक-ऋचा-आयशा असा परिवार आहे. तर माझे आईवडील दिसले की मी आणि ऋचा "चोरीचा मामला मामाही थांबला" करणार. आणि जिंदल कपल दिसले की कार्तिक-ऋचा "चोरीचा मामला मामाही थांबला" करणार. आयशा मला आणि कार्तिक दोघांना बाबा म्हणेल. कुणाला काही शंका ?" आर्यन
माझे आईवडील गणपतराव-लक्ष्मीबाई यांच्यासाठी माझी बायको ऋचा आणि मुलगी आयशा. मिस्टर आणि मिसेस जिंदल साठी कार्तिक-ऋचा-आयशा असा परिवार आहे. तर माझे आईवडील दिसले की मी आणि ऋचा "चोरीचा मामला मामाही थांबला" करणार. आणि जिंदल कपल दिसले की कार्तिक-ऋचा "चोरीचा मामला मामाही थांबला" करणार. आयशा मला आणि कार्तिक दोघांना बाबा म्हणेल. कुणाला काही शंका ?" आर्यन
"दिव्या ?" कार्तिक-ऋचा एकसुरात म्हणतात.
"ती काय येत नाही. आउट ऑफ सिलाबस प्रश्न नका विचारू." आर्यन
मग सर्वजण खाली झोपायला जातात. तीन दिवस असेच मस्त नाटक चालते. तिसऱ्या दिवशी पुन्हा बेल वाजते. हृदयात धडकी भरते. आर्यन दार काढतो.
"नवरोबा" दिव्या आर्यनला मिठी मारते..
गणपतराव लक्ष्मीबाईकडे , लक्ष्मीबाई मिस्टर जिंदलकडे , मिस्टर जिंदल मिसेस जिंदलकडे , मिसेस जिंदल कार्तिककडे , कार्तिक आर्यनकडे आणि आर्यन भिंतीकडे बघून रडायला लागतो.
"नवरोबा" असे बोलून दिव्या आर्यनला मिठी मारते.
पण सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात.
"काय झाले ? मी माझा रोल बरोबर करत आहेत ना ?" दिव्या दबक्या आवाजात आर्यनला म्हणते.
"हो ग. पण आम्हीच रोल बदलले आहेत!" आर्यन
"म्हणजे ?" दिव्या
"आता तू माझी नाही कार्तिकची बायको आहेस!" आर्यन
"तुम्ही सतत माझा नवरा का बदलता ? एक काय तो फिक्स करा ना!" दिव्या
दिव्या लगेच दूर होते.
"तिरकी. बायकोबा मी इथे आहे. ते काय आहे माझ्या बायकोची नजर थोडी तिरकी आहे आणि म्हणून कधी कधी आर्यनलाच नवरा समजते!" कार्तिक हसत म्हणतो.
"लक्ष्मी. मी पागल झालो तर माझी प्रॉपर्टी आयशाच्या नावावर कर!" गणपतराव
"आणि माझी पण!" मिस्टर जिंदल
"काय ग बाई ? आपला नवरा कोण हे पण धड कळत नाही आजकालच्या पोरींना. " लक्ष्मीबाई
"सेम पिंच. मी पण हाच डायलॉग मारला होता!" मिसेस जिंदल
"जाऊबाई आत चला ना स्वयंपाक करू!" दिव्या ऋचाला म्हणते.
"हो चला ना! लोक वाढलेत त्यामुळे खूप स्वयंपाक करायचा आहे!" ऋचा
दिव्या लगेच किचनमध्ये पळते. स्वयंपाकघरात दिव्या विचारात पडते.
"तू कार्तिकची बायको होतीस ना मग आर्यनची कशी झाली ?" दिव्या
ऋचा सर्व हकीकत सांगते.
"अरे देवा. इतका रायता पसरला आहे. त्यात अजून एक रायता पसरणारे!" दिव्या
ऋचाला घाम फुटतो.
"म्हणजे ? प्लिज आम्ही अजून वादळांना तोंड देण्याच्या मनस्थितीत नाही!" ऋचा
"माझा मामा येणारे उद्या रात्री!" दिव्या
ऋचा रडायला लागते.
"मी आर्यनला माझा बॉयफ्रेंड बनवला आहे!" दिव्या
"अग पण काय गरज होती!आधीच कमी रायता पसरला आहे का ?" ऋचा
" माझा मामा आणि माझे डॅड माझे लग्न लावून देताय. म्हणून मी खोटेखोटे बॉयफ्रेंड आहे म्हणून सांगितले!" दिव्या
"अरे यार. जाऊद्या. आज रात्री गच्चीवर मिटिंग करू आणि डिस्कस करू!" ऋचा
तो दिवस असाच जातो. रात्री दिव्या , ऋचा आणि आयशा एकेठिकाणी झोपतात. झोपलेल्या आयशाच्या केसांवरून ऋचा हात फिरवत असते.
तिचे डोळे पाणावतात. तिच्या मनात भावना उफाळून येतात.
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
सहन करून सारे तुझे भविष्य घडवणार
सोनेदागिने नाही मजपाशी तुला द्यायला
ताकद अन हिंमत देईल जगाशी लढायला
सहन करून सारे तुझे भविष्य घडवणार
सोनेदागिने नाही मजपाशी तुला द्यायला
ताकद अन हिंमत देईल जगाशी लढायला
मला ही वाटते ग तुला परीसारखे जपावे
नशीबच माझे फुटके त्याला काय करावे
जे माझे झाले ते तुजसंग न होऊ देणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
नशीबच माझे फुटके त्याला काय करावे
जे माझे झाले ते तुजसंग न होऊ देणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
लोक जरी मजसंगे खेळले वारंवार
तरी मी तुला खेळणी आणून देणार
हट्ट मी विसरले तरी तुझे हट्ट पुरवणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
तरी मी तुला खेळणी आणून देणार
हट्ट मी विसरले तरी तुझे हट्ट पुरवणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
तुझ्यासाठी मी बघ राजकुमार शोधणार
तुला तुझ्या आईची आठवणही न येणार
आई विसरशील इतके सुख तुज देणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
तुला तुझ्या आईची आठवणही न येणार
आई विसरशील इतके सुख तुज देणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
दुर्दैवी आईची सावलीही तुझ्यावर न पडो
तुझ्या सुखाला कुणाचीही नजर न लागो
तुझ्या आनंदासाठी तुझी आई जगणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
तुझ्या सुखाला कुणाचीही नजर न लागो
तुझ्या आनंदासाठी तुझी आई जगणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
"एक विचारू ? आयशा कार्तिकचीच मुलगी आहे का ?" दिव्या
"कळेल लवकरच. तुला एक विचारू का ?" ऋचा
"उद्या मला काही झाले तर आयशाला बघशील का ग ? म्हणजे तिला आईचे प्रेम दे अस नाही पण किमान तिची मैत्रीण बनून तरी संपर्कात राहशील ना ?" ऋचा
"अग अस का बोलत आहेस तू ? तू कुठे जाणारे ?" दिव्या
"जीवनाचा काय भरोसा आज आहे उद्या नाही!" ऋचा
"ए वेडी. अस काही नाही बोलू प्लिज. आणि मावशी म्हणून मी आयशाचा नेहमी लाड करेल. आर्यनचा मेसेज आलाय चल गच्चीवर!" दिव्या
दोघी गच्चीवर जातात.
गच्चीवर कार्तिक-आर्यन आधीच असतात.
ऋचा-दिव्या आल्यावर मिटिंग सुरू होते. आर्यन लॅपटॉप उघडतो.
"गड्यांनो. काही काळजी करू नका. पॅनिक होऊ नका. मी पीपीटी बनवली!" आर्यन
"ऑफिसमध्ये हेच करतोस का ? पीपीटी बनवत बसतोस का ?!" कार्तिक आर्यनला टपलीवर मारत म्हणतो.
"गप रे. प्रॉपर प्लॅनिंग असावी लागते!" आर्यन
"काही फायदा नाही. उद्या रात्रीपर्यंत माझे मामा येणारेत. माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला!" दिव्या
"अग मी घराबाहेर भेटव ना तुझ्या बॉयफ्रेंडला!" आर्यन
"अरे येड्या तू आहेस माझा बॉयफ्रेंड!" दिव्या
"मी कधी झालो तुझा बॉयफ्रेंड ? मी तर नवरा होतो ना. यार मला न विचारता बॉयफ्रेंड नका बनवू!" आर्यन
"आणि तुम्ही न विचारता माझा नवरा बदलता ते ? प्लिज माझी मदत करा. नाहीतर माझे लग्न लावतील ते लोक!" दिव्या
"यार परत पीपीटी बनवावी लागेल!" आर्यन
"काय चाललंय आयुष्यात. लहानपणी जितकं घरघर खेळलो नसतील तितकं खेळावे लागत आहे." कार्तिक
"झोपा आता. मामा आल्यावर बघू काय करायचे ते." आर्यन
सर्वजण झोपायला जातात.
सकाळी कार्तिक जिम करत असतो. आर्यन फ्रेश होऊन ऑफीसला जाण्यासाठी तयार होतो.
गणपतराव तिथे येतात.
"वाह कार्तिकराव. मस्त बॉडी हाय तुमची. मला पण व्यायामाचा लई नाद आहे!" गणपतराव
"अच्छा. छान!" कार्तिक
"मला तर पहिलवान पोरग हवं होतं पण कुठून आर्यनसारख लाजाळूच झाड निपजले कुणास ठाऊक. विहीरीत पोह म्हणलं तर शर्ट बी काढत नव्हतं. नुसतं पोरींवाणी हातवारे करायच. बायल्या होत. लग्न बी करेल की नाही धास्ती वाटायची. " गणपतराव हसत म्हणले.
आर्यन हे ऐकतो. त्याला मनोमन वाईट वाटते. बेडरूममध्ये जाऊन एकटा बसतो. किचनमध्ये लक्ष्मीबाईला ऐकू जाते. त्यांनाही मनोमन वाईट वाटते. ऋचा आणि दिव्या पण तिथेच असतात.
"माझा आर्यन पहिलवान नसलं. चारचौघात बोलत बी नसेल जास्त. पण माणूस म्हणून लई चांगला हाय. एकटा बसला असेल आता खोलीत. " लक्ष्मीबाई पदराने डोळे पुसतात.
आर्यन खोलीत एकटाच बसला असतो. बालपण डोळ्यासमोर तरळून जाते. लहानपणीपासून आर्यनला एकही मित्र असतो. एकदा तर नीट पुरुषांप्रमाणे चालत नाही म्हणून बाबानी पायाला चटके पण दिले असतात. आपण का असे आहोत हे प्रश्न नेहमी सतावत असे ? का आपण चारचौघाप्रमाणे मुलांमध्ये मिसळू शकत नाही ? का असे मुलींसारखे हावभाव आहेत ? खूपदा तो स्वतःला चापट मारून घेत. खूपदा तर आत्महत्या करण्याचा विचारही आला. हे सर्व आठवताना नकळतपणे डोळ्यात कधी पाणी आले आर्यनला कळले देखील नाही. तेव्हा कुणीतरी खांद्यावर हात ठेवला आणि आर्यन भानावर आला.
"आयशा. तू इथे काय करत आहेस बच्चा ?" आर्यन आयशाला मांडीवर बसवतो.
आयशा आर्यनचे अश्रू पुसते.
"तू कसाही असलास तरी माझा बेस्ट फ्रेंड आहेस!! मी तुला बाबा म्हणू आजपासून ?" आयशा आर्यनला मिठी मारत म्हणते.
"हो ना. मी माझ्या परीसाठी आज चॉकलेट केक आणेल!" आर्यन
आर्यनच्या चेहऱ्यावर हसू येते आणि तो आयशाला किस करतो.
आर्यन बाहेर येतो आणि ऑफीसकडे जातो. कार्तिक गणपतरावाना डायरी दाखवत असतो.
"कोण आहे इतका मोठा कवी ? किती सुंदर कविता केल्या आहेत!" गणपतराव
"काका. आर्यनची डायरी आहे ही. तो खूप भारी कवी आहे!" कार्तिक
आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य येते. कार्तिक आर्यनला पाहून लगेच डोळा मारतो.
"हम्म. छंद पकडून पकडून मुलींचाच !" गणपतराव डायरी फेकत म्हणतात.
आर्यनला वाईट वाटते.
लक्ष्मीबाई बाहेर येतात.
"बाळा तुझ्या आवडीची भेंडीची भाजी आहे. " लक्ष्मीबाई मायेने आर्यनच्या गालावर हात फिरवते.
"थँक्स आई. खूप दिवसांनी तुझ्या हातचे खायला भेटेल!" आर्यन
असे बोलून आर्यन निघून जातो. थोड्यावेळाने कार्तिक , मिस्टर जिंदल पण बाहेर पडतात.
ऑफिसच्या ब्रेकमध्ये कार्तिक आर्यनला व्हिडीओ कॉल करतो.
"बोला इकडची स्वारी..!!" आर्यन
"वाईट वाटले ना तुला!" कार्तिक
"नाही रे. बाबा तसेच आहेत. मी कधी त्यांच्या नजरेत कौतुकास्पद झालो नाही. त्यांच्या नजरेत आधीही नालायकच होतो आणि कदाचित पुढेही राहणार. " आर्यन
"सोड रे. हे बापलोक असेच असतात. सलीम-अकबर , अजातशत्रू-बिंबिसार अगदी प्राचीन इतिहासापासून पिता पुत्राचे कधीच पटले नाही!" कार्तिक
"सही है!" आर्यन हसतो.
"असच हसत रहा. बाय! पटकन किस दे!" कार्तिक
आर्यन आजूबाजूला बघून चोरून फ्लाईनग किस देतो.
इकडे गणपतराव पोटभर जेवण करून दुपारी झोपी जातात.
ऋचा सर्व स्त्रियांना हॉलमध्ये एकत्र करते.
"आता आपण प्राणायम करू!" ऋचा
"त्यापेक्षा टीव्हीवर एखादा चित्रपट लाव ना!" लक्ष्मीबाई
"त्यापेक्षा शॉपिंगला जाऊ!" दिव्या
"बेटा आता या वयात कस करु प्राणायाम?" मिसेस जिंदल
"आपण स्त्रिया कुटुंबातील सगळ्यांची काळजी करतो. मग थोड्या वेळ स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर ? शॉपिंग मुव्ही याने तर करमणूक होईल पण प्राणायामने मन आणि शरीर दोघांना फायदा होईल!" ऋचा
मग ऋचा प्राणायम शिकवते. चिमुरडी आयशा पण प्राणायाम करु लागते. प्राणायाम करून सर्वजण फ्रेश होतात.
चारला थोड ऊन उतरल्यावर सर्वजण गच्चीवर जातात. गच्चीवर सर्वाना समलैंगिक लोकांची प्राईड मार्च जाताना दिसतो.
"काय आहे बाई हे ?" लक्ष्मीबाई
"आजकालचे मुले हो. जी गोष्ट लपवायला हवी ती उघडपणे सांगताय. " मिसेस जिंदल
"आंटी त्यात लपवण्यासारखे काय आहे ? समलैंगिक असणे नैसर्गिक आहे. कुणी ठरवून किंवा चॉईस म्हणून समलैंगिक बनत नाही." दिव्या
"यात काहीजण तृतीयपंथी पण दिसताय. पण काही चांगल्या घरची मुले आणि मुली पण दिसताय. " लक्ष्मीबाई
"ही एलजीबीटी कम्युनिटीची प्राईड आहे. लेस्बियन म्हणजे अश्या स्त्रिया ज्या स्त्रियांवर प्रेम करतात. गे म्हणजे असे पुरुष जे पुरुषांवर प्रेम करतात. बायसेक्सउल म्हणजे दोन्ही लिंगाविषयी आकर्षण असलेले आणि ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी. " ऋचा
लक्ष्मीबाईच्या डोळ्यात पाणी आले.
"काय झाले ?" दिव्या खांद्यावर हात ठेवून म्हणली.
"काही नाही. माझ्या मामाचा मुलगा असाच होता. थोडा बायकी. साड्या नेसवून द्यायचा. माझ्या लग्नाला त्यानेच नेसवून दिली. म्हणला ताई सुखाने रहा. बाप लई झोडायचा त्याला. लग्नानंतर समजल त्याने विष पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत लिहिले मी बायल्या आहे आणि कधीच मर्द बनू शकणार नाही. माझा मावसभाऊ जिता रहायला पाहिजे होता. तो इथं असता तर त्यालाबी आधार भेटला असता! " लक्ष्मीबाईला रडू कोसळले.
पण दिव्या आणि ऋचाने सावरले.
"मिसेस जिंदल तुम्हाला काय वाटते ?" ऋचा
"माझा कार्तिक नॉर्मल आहे सो मी विचारच का करू ? आणि माझे मत आहे की ठिके असेल हे सर्व नैसर्गिक पण मग जे करायचे ते बेडरूममध्ये करा. लोकांना ओरडून का सांगताय ?" मिसेस जिंदल
"कारण लोकांनी स्वीकारावे म्हणून. भारतात आजही समलैंगिकांना लहानपणीपासून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. भावनिक कोंडमारा इतका असतो की तुम्ही कधी विचार पण करू शकत नाही. " ऋचा
"हम्म. असू दे ना. आपल्याला काय ?" मिसेस जिंदल.
मग सर्व स्त्रिया खाली जातात. संध्याकाळी हॉलमध्ये सर्वजण जमलेले असतात. आर्यनने आयशासाठी चॉकलेटचा केक आणला असतो. बेल वाजते. कार्तिक आणि आर्यनच्या हृदयात धडकी भरते.
आर्यन दार उघडतो. एक प्रौढ व्यक्ती उभा असतो. कपड्यावरून तर मोठा बिजनेसमॅन मीटिंग सोडून आलाय अस वाटत असते.
"आर्यन राईट ?" मामा
"या मामा!!" आर्यन चक्क मामाचे पायाच पडतो.
"पप्पूराव आलाय की काय ?" गणपतराव लक्ष्मीबाईकडे म्हणतात.
पप्पूराव म्हणजे लक्ष्मीबाईचा सखा भाऊ आणि आर्यनचा मामा.
"नाही हो. त्याची म्हैस पोटूशी हाय. तो न्हाय यायचा!" लक्ष्मीबाई
इकडे मामा खूश होतो. दिव्या पण दरवाज्यापाशी जाते.
"मामा..मीट माय बॉयफ्रेंड आर्यन!" दिव्या आनंदाने
म्हणते.
म्हणते.
"खूप शांत आणि संस्कारी वाटतोय!" मामा
"आत या ना मामा!" दिव्या
मग मामा आत येतो.
"अरे बापरे इतकेजण एकाच घरात ?" मामा हसतो.