Login

माझ्यासाठी येशील का?

Waiting For Her Lover

विरक्त झाल्या साऱ्या आशा

प्रफुल्लित तू करशील का ?


मृत झाल्या संवेदनांना

नव्या जाणिवा देशील का ?


थिजुन गेल्या स्वप्नांना

चैतन्याचा स्पर्श देशील का ?


कोमेजून गेल्या जीवनाला

नवी उमेद देशील का ?


अंधार दाटता दाही दिशांना

सूर्य होऊनी येशील का ?


अविरत तुझी वाट पाहते

सांग साजणा येशील का ?


तुझ्याच साठी अखंड झुरते

माझ्यासाठी येशील का ?

      ,,,,,,,,,योगिता मिलिंद नाखरे