येशील ना परत
हा प्रश्न आहे गहन
क्षण जातो जड
विरहाचे व्हावे दहन
हा प्रश्न आहे गहन
क्षण जातो जड
विरहाचे व्हावे दहन
कामाच्या निमित्ताने
सतत असतोस दूर
म्हणून माझा नेहमी
निघतो तक्रारीचा सूर
सतत असतोस दूर
म्हणून माझा नेहमी
निघतो तक्रारीचा सूर
आठवणींचा सुगंध
विचारातून सुटतो
तू नसता जवळी
हुंदका कंठातून फुटतो
विचारातून सुटतो
तू नसता जवळी
हुंदका कंठातून फुटतो
आताचा जरी रुसले
तरी पाहीन तुझीच वाट
सोबतीने नव्याने घालू
प्रीतसंगमाचा घाट
तरी पाहीन तुझीच वाट
सोबतीने नव्याने घालू
प्रीतसंगमाचा घाट
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत.
फोटो सौजन्य साभार गुगल