दसरा दिवाळीचे दिवस जवळ आले की कुसुमताईंना खरेदीचे वेध लागत होते. पण आतातर कुठला सण सुध्दा नव्हता. पण तरीही त्या एकदम तयारीत होत्या.
"अहो, ऐकलं का? त्या विनायक रोडवर म्हणे मस्त नवीन माॅल उघडला आहे. आपण आजच जायचे का?"
"आता मध्येच कशाला खरेदी." दामोदरराव
"अहो, एकदा जाऊन तर बघू. नाही पटलं तर परत येऊ."
कुसुमताई काही ऐकणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यामुळे दामोदरराव कसेबसे तयार झाले. तसेही दोघेही रिटायर्डमेंट लाईफ जगत होते. मुले त्यांच्या पासून दूर असल्याने दोघेही आनंदाने जगत होते.
हो नाही करता करता दोघेही माॅल मध्ये पोहोचले. मला मोठा आणि भव्य दिव्य माॅल बघून दोघांचेही भान हरपले.
"चला आधी लेडीज विभागात जाऊया. म्हणजे मला एक एक कपडा नीट बघता येईल."
मग काय कुसुमताईंनी कपडे निवडायला सुरूवात केली. सलवार कमीज, ट्रॅक पॅन्ट ,टी शर्ट..... मग गेल्या चेंजिग रुम मध्ये. सगळ्या कपड्यांचा ढीग माझ्या हातात देऊन मोकळ्या झाल्या.
मग खरी सुरुवात झाली. एक सलवार कमीज घेतला आणि घालून बाहेर आल्या.
"अहो, हा ड्रेस मला कसा दिसतोय? "
"माझी आश्चर्य कारक नजर. आजपर्यंत कधीही न विचारलेला प्रश्न."
"छानच आहे की."
"बर थांबा ... "
दोन चार मिनिटात परत कपडे बदलले. "आता हा जिन्स कसा दिसतोय?"
" आता तू पण जिन्स घालणार.'
"हो का नाही."
"आता हे टी शर्ट बघा."
"हा पण छान आहे."
पण तिचे समाधान होत नव्हते. एकानंतर एक दहा पंधरा कपडे तरी चेंज करून झाले. चेंजिग रुमच्या बाहेर दामोदरराव मात्र पुतळ्या सारखे उभे होते. प्रत्येक वेळी त्यांच्या कपाळावर आठ्या पडत होत्या. पहिल्यांदाच खरेदीच्या वेळी कुसुमताई असं काही करत होत्या. एवढं सगळं करूनही कुसुमताईंचे समाधान झालेच नाही. कारण एवढ्या सगळ्या मधून त्यांना एकही ड्रेस आवडला नाही. हे मात्र विशेष. त्यात बाहेर बसलेली असिस्टंट तर जाम हसत होती.
" कुसुम काय घेतलं आहे? कोणते कपडे निवडले?"
"नाही ओ अजून तरी. मला अजून निवडायचे आहे. "
"म्हणजे.....!"
"तुम्ही थांबा. मी येते आत्ता."
असे सांगून गेलेल्या कुसुमताई जवळपास पंधरा मिनिटांनी हातात नवीन कपडे घेऊन आल्या. परत तोच कार्यक्रम. कपडे घालायचे. कोणते चांगले दिसत नाही म्हणून तर काहींची किंमत जास्त म्हणून रिजेक्ट केले जात होते. आजुबाजुचे लोक तर मला असे बघत होते. जसं काही आकाशातून एखाद्या एलियन अवतरला आहे.
"कुसूम आता पुरे ... साडी नेसणारी माझी कुसुम अशा प्रकारचे कपडे घालणार?"
"अहो, काही होत नाही. परिस्थिती नुसार बदलावे माणसाने. आता फक्त पाच दहा मिनिटे."
असं म्हणता म्हणता एक तास झाला. शेवटी म्हणाली चला आता. मला यातलं काहीच आवडलं नाही."
"मग हे काय होत? आता पर्यंत जे कपडे बघीतले , घालून बघीतले."
"अहो, त्याला म्हणतात. 'विंडो शॉपिंग.'
"आता हे काय नवीन? विंडो शॉपिंग म्हणजे मला नाही कळलं."
"तुम्ही आधी चला बाहेर मग सांगते."
"कुसुम पण तुझ हे वागणं बरोबर नव्हे. तू एवढे कपडे पसंत केले आणि विकत काहीच घेतले नाही. या वयात असं शोभत का?"
"अहो, यालाच तर म्हणतात विंडो शॉपिंग आणि या वयात म्हणजे? माझ वय जरी वाढल तरी असं कुठ लिहील आहे का? "
"खरतर ना तुमच्या बायकांच काही कळतच नाही मला. काय तर म्हणे विंडो शॉपिंग केली. हातात तर खरेदीच्या बॅग सुध्दा नाही."
"अहो, जे आवडल ते बघायच, वाटल्यास घालून बघायच आणि नको असेल ते परत ठेवून द्यायचे. यामुळे आपल्यला कपड्यांचा ब्रॅन्ड कळतो, क्वालिटी कळते, रेंज कळते, पोत कळतो आणि आपण त्या कपड्यात कसं दिसतो ते सुद्धा कळत. शिवाय आपण फोटो सुध्दा काढू शकतो."
"अग पण का असे?"
"अहो, यालाच तर म्हणतात विंडो शॉपिंग."
"हे तुला कधी कळल?"
"हे मला सुध्दा आत्ता आत्ता कळलं आहे. हल्ली आम्ही मैत्रिणी ऑनलाईन शॉपिंग करत असतो. किंवा बघत असतो. तसेच हे सुद्धा आहे. पण याची सुरुवात १७व्या , १८शतकातच युरोप मध्ये झाली आहे. हल्ली तर याचे वेडच आहे. म्हणजे बाहेर पडून काही क्षण आनंदाने घालवायचे. घरातील कामांपासून थोडी विश्रांती, आनंद आणि विरंगुळा म्हणून आपण हे करू शकतो. अशा ठिकाणी काहीही कम्पल्सरी नसते. खरेदी केलीच पाहिजे असा नियम नसतो. "
"मग हे आमच्यासाठी सुध्दा असेलच ना."
"मग हे आमच्यासाठी सुध्दा असेलच ना."
"अर्थातच."
"मग आता काय? पुढची विंडो शॉपिंग करायला कधी यायचे आणि कुठे जायचे?"
वयाचे भान हरपून दोघेही विंडो शॉपिंगला लवकरच परत येऊ . असे म्हणत ते माॅलच्या बाहेर पडले.
©® अश्विनी मिश्रीकोटकर