पंख-1

मराठी हृदयस्पर्शी कथा
"आई पप्पा मला इथून घेऊन जा.."

आपल्या लेकीचा रडवेला सूर बघून आई वडिलांच्या काळजात धस्स झालं. लगेच गाडी काढली आणि लेकीच्या घरी दोघे गेले. रात्रीचे 12 वाजले होते. घरातले सर्वजण झोपले होते आणि लेक एकटीच हॉल मध्ये रडत बसली होती. तिने बॅग उचलली आणि ती गाडीत जाऊन बसली. तिचे आई वडील वाट बघत होते की घरातून कुणीतरी बाहेर येईल, काहीतरी बोलेल..पण कितीतरी वेळ कुणीही आलं नाही..

"झोपायची वेळ आहे, सगळे झोपले असतील.."

आई म्हणाली तसं बाबांनी दार लोटून घेतलं आणि गाडीत सर्वजण बसले. गाडीत बसताच दरवाजा जोरात आपटण्याचा आवाज झाला. आई वडिलांना कळलं की कुणीतरी जागं होतं पण बाहेर आलं नाही.

राधा म्हणाली,

"पाहिलंत? अजून काय पुरावा हवाय तुम्हाला?"

बाबांनी गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने ते निघाले. रात्रभर सर्वांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळ झाली, सर्वांनी आवरून घेतलं आणि आई बाबा तिच्या खोलीत गेले.

"राधा काय झालं नक्की सांगशील का?"
"आई बाबा, तुम्हाला फोनवर कित्ती वेळा मी सांगितलं आहे, परत तेच तेच का सांगू?? रोजची कटकट असते, क्षुल्लक गोष्टीवरून. हे इथेच का, ते तिथेच का, हे असं नको ते तसं नको..बरं ऐकून घेते, सुधारणा करते तर नवीन काहीतरी शोधून काढतात..सासुचं तोंड अखंड चालू असतं.. ते ऐकून नवऱ्याचं डोकं फिरतं आणि सगळं माझ्यावर उलटतं...

*****

🎭 Series Post

View all