"बाबा तुम्हाला आठवतं? दहावीला असताना तुम्ही मला हिरो होंडा शिकवायचा चंग बांधलेला...मी घाबरायचे, पण तुम्ही म्हणायचे की मुलींनाही सगळं यायला हवं..मग माझ्यातली भीती काढली आणि मला गाडी शिकवली...तेव्हापासून माझ्यात आत्मविश्वास तयार झाला...
आई तुला आठवतं? कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा होती, तेव्हा तू मला सांगितलं की समोरच्याचा मुद्दा खोडून काढायचा असेल तर आपल्याकडे प्रगाढ ज्ञान हवं..मला चार पुस्तकं वाचायला लावलीस...मला भातुकलीचा खेळ खेळताना तुला राग यायचा, तू म्हणायचीस हेच करणार का आयुष्यात? मग मला अभ्यासाला बसवायचीस...
बाबा, मला गणितात कमी गुण मिळाले तर किती ओरडला होता तुम्ही? पुढे जाऊन घरीच बसणार का असा टोमणा दिलेला...एक दिवस कॉलेज बुडवलं तर किती बोलायचे तुम्ही मला..विसरलात??"
"बाळा ते वेगळं आणि हे वेगळं.. इथे तुझा संसार आहे, तुझी माणसं आहेत..त्यांना सांभाळायचं हीच आता तुझी प्राथमिकता.."
"वा बाबा वा ! मग तुम्ही मला हे आधीपासूनच का नाही शिकवलं? का मला अभ्यासाला लावलं? आई तुही मला आधीपासूनच घरातली सगळी कामं, स्वयंपाक का नाही शिकवलास? मला सांगायचं होतं की पुढे जाऊन तुला हेच करायचं आहे, तेव्हा पुस्तकं बाजूला ठेव आणि घरातल्या चार गोष्टी शिकून घे...बाबा, तुम्ही का शिकवलत मला? माझ्यात आत्मविश्वास आणला, उंच भरारी घ्यायची स्वप्न दाखवली आणि आता ती स्वप्न दाखवून पंखच छाटू पाहताय?"
आई बाबा स्तब्ध झाले, लेकीचं म्हणणं अगदी काळजाला भिडलं... शब्दन शब्द खरं बोलत होती ती..
आई वडिलांनी अखेर ठरवलं, लेकीला अश्या नरकात पाठवायचं नाही...
बऱ्याच दिवसांनी तिचा नवरा नाक घासत दारात आला, कारण आता त्याच्या डोळ्यावरची पट्टी उतरली होती,
आई बाबांनी निर्णय सर्वस्वी राधावर टाकला...
राधाने विचार केला, आणि भलीमोठी नियमांची आणि अटींची यादी त्याच्याकडून स्टॅम्प पेपरवर साइन करून त्याच्यासोबत वेगळी निघाली...
बाबा म्हणाले, "आपलं नाणं खरं होतं... आपण उगाच अकलेचे तारे तोडत होतो.."
"खरंय... एखाद्याला उंच भरारी घ्यायचं स्वप्न दाखवायचं, तसं बळ त्यात भरायचं आणि भरारी घ्यायची वेळ आली की क्षुल्लक माणसांसाठी तिचे पंख छाटून टाकायचे...हा घोर अन्याय आहे...अश्यावेळी त्या पक्ष्याला काय यातना होत असतील हे दिसलं आपल्याला...या यातना मरणाहून कठीण...!!"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा