साथ मैत्रीची...

साथ मैत्रीची... आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी कधी हसणारी, कधी रुसणारी, कधी भांडणारी पण ??

साथ मैत्रीची...

आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

कधी हसणारी, कधी रुसणारी, कधी भांडणारी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

कधी चुकले तर हक्काने रागवणारी

कधी रुसले तर हसुन बोलणारी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

मैत्रिच्या नात्याने साथ दयावी

आपुलकीच्या नात्याने हाक दयावी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

प्रेमाने टिकावी विश्वासाने जपावी

हे मैत्रिचे नाते कायम बहरावी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

आयुष्यात अशी एक मैत्रिण हवी

जी कायम सोबत रहावी

पण आयुष्याच्या वाटेवर ‍मैत्रिची साथ हवी