Login

नारी: त्यागाची मूर्ती

नारी
शीर्षक :- नारी(अभंग)

निर्मितीस असे l बनुनी कारण l
दुःखाचे तारण l ती स्त्रीशक्ती ll१ll

हळवी भावना l त्यागाची ही मूर्ती l
बनते ही स्फूर्ती l तिचं आई ll२ll

ही पाठराखीण l स्वार्थी भाव नसे l
हात हाती असे l ती भगिनी ll३ll

अशी रागावते l बदले क्षणात l
वसते मनात l म्हणे सखी ll४ll

थोडीच चिडकी l बाबा लाड करेl
संगे वेळ सरे l असे लेक ll५ll

जीवनात येते l सखी लावी माया l
झिजवी ती काया l बने पत्नी ll६ll

परिपूर्ण अशी l सर्वांवर भारी l
काम करे सारी l तिचं नारी ll७ll

© विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
फोटो सौजन्य साभार गुगल

🎭 Series Post

View all