Login

स्त्री - एक कर्तव्य!

मातृत्व पेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ
कोरोनाचे दिवस असल्यामुळे देशात सगळीकडे लोक डाऊन लागले होते.... कोणीही आपल्या घराच्या बाहेर पडू नये अशी सक्तीची मॉर्निंग देण्यात आली होती...... अशावेळी डॉक्टर्स, बैठकीय अधिकारी, पोलीस असे काही देशाचे कर्तृत्ववान नागरिक होते जे लोकांच्या सेवेसाठी स्वतःच्या जीवाची परवाना करता बाहेर पडत होते...

लावण्या ही देखील अशीच एक स्त्री होती जी पेशाने डॉक्टर होती.... लहानपणापासूनच तिला लोकांची सेवा करण्याची आवड होती.... तिच्या वडिलांनाही तिचा हा गुण खूपच आवडत होता... आपल्या वडिलांच्या साथीने तिने मोठी होऊन वैद्यकीय शिक्षण घेतले आणि डॉक्टर म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामावर रुजू झाली......

हॉस्पिटलमध्ये काम करत असतानाच तिने आपल्या वडिलांना सांगून एक छोटी डिस्पेंसरी चालू केली होती... त्यात ती गरिबांचा इलाज अगदी मोफत करत होती..... तिच्या वडिलांनाही आपल्या मुलीच्या या कर्तुत्वाचा खूप अभिमान वाटत होता.... पुढे तिचे लग्न झाले... लावण्या नुकतीच मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी राहिली होती.... सहा महिन्याचे मूल आपल्या पदरात असताना देशात लागलेले लोक डाऊन पाहता तिचं मन लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या काळजीपोटी तळमळू लागले..... टीव्हीवर लोकांच्या मृत्यूची न्यूज ऐकून तिला खूप वाईट वाटू लागले....

घरात बसून तिची होणारी तळमळ बघता तिच्या नवऱ्याने ही तिला साथ देण्याचे ठरवले.... नवऱ्याच्या साथीने लावण्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला..... अशावेळी तिचा नवरा घरी तिच्या बाळाचा संभाळ करत होता...... हे सगळं करताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.... तरीही ते दोघे नवरा बायको आपापल्या परीने प्रयत्न करत होते....

लावण्याने कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे महागडे इंजेक्शन ही आपल्या डिस्पेन्सरीमध्ये मागून घेतले आणि ज्या गरीब लोकांकडे पैसे नाहीत... अशा गरीब लोकांचा इलाज ती आपल्या क्लिनिकमध्ये मोफत करत होती..... तिने आपल्यासोबत एक टीम बनवली आणि आजूबाजूला चाळी मधल्या लोकांपर्यंत कोरोनावर असलेले उपचार कसे करायचे याबाबत त्यांना मार्गदर्शन करत होती..... सगळ्या लोकांना इम्युनिटी पावर कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन करत होती.... लोकांची सेवा करण्यात ती इतकी बिझी झाली होती की कधी कधी तिला आपल्या घरी जायलाही वेळ मिळत नव्हता.....

" लावण्या अग तुला काहीच कसे वाटत नाही... आपल्या सहा महिन्याच्या मुलाला घरी सोडून तू अशी कशी काय करू शकतेस ? तू जरी डॉक्टर असलीस तरी आता तू एक आई पण आहेस.... " तिची एक मैत्रीण तिच्याकडे पाहून तिला बोलत होती....

" मला माहित आहे की मी एक आई आहे आणि आता यावेळी माझ्या मुलालाही माझी गरज आहे, पण माझ्या देशातली ही लोकं अशा संकटात अडकलेले असताना मी माझे कर्तव्य विसरू शकणार नाही... मला लोकांची सेवा करायची होती म्हणूनच मी डॉक्टर झाले आणि आता जेव्हा या देशाला माझी गरज आहे, तेव्हा मी फक्त माझ्या मुलाचा विचार करून चालत नाही.....

एक स्त्री जशी आपल्या मुलाची आई होऊ शकते , तशीच ती या देशाची ही आई होऊ शकते... देवाने पण स्त्रीलाच हा वरदान दिला आहे कि ती आपल्या उदरात एक जीव सांभाळू शकते.... आज जेव्हा या देशावर अशी वेळ आली आहे तेव्हा मी फक्त माझ्या मुलाचा विचार करण्यापेक्षा या देशातील सगळ्या नागरिकांचा विचार करणे मला माझे कर्तव्य वाटते.... आज या कोरोनामुळे जे मृत्यूमुखी पडत आहे तेही त्यांनी देखील आपल्या आईच्या पोटातून जन्म घेतला आहे , त्यामुळे आज फक्त आपल्या मुलाची आईने बनता या देशाची आई बनून आपला कर्तव्य निभवणे हेच माझं धर्म आहे असे मला वाटते... " लावण्याचे हे बोलणं ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच तिच्यावर अभिमान वाटू लागतो...

तीच्या सोबत असलेले इतर डॉक्टर, नर्सेसही तिच्या सोबतीने देशातील लोकांची सेवा करू लागतात.... या महामारीतून लोकांना वाचवण्यासाठी आतोकात प्रयत्न करू लागतात ... लावण्या तिची टीम मिळून त्यांच्या विभागातल्या खूप जणांना कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त करतात. ..

काही दिवसानंतर जेव्हा सगळं व्यवस्थित झाल्यावर तिच्या विभागात असलेले नगरसेवक तिचा सत्कार करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करतात तेव्हा लावण्या त्या सत्कारात आपल्या लहान मुलालाही घेऊन येते.... लावण्याचे वडील आणि तिचा नवरा ही अभिमानाने तिच्याकडे पाहत असतात.... तिचा होणारा सत्कार पाहून सगळे आनंदाने टाळ्या वाजवू लागतात.... लावण्यप्रमाणेच या काळात अनेक महिलांनी आणि पुरुषांनी पुढे येऊन देशाची सेवा केली आहे...

स्त्रीला उगाच जननी म्हटले जात नाही, जेव्हा वेळ येते तेव्हा ती या देशाची ही जननी बनायला तत्पर असते.....